Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान योजना

पोकरा योजने अंतर्गत नव्या बाबीला अनुदान Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान योजना

Zero tillage farming
Zero tillage farming pocra

सध्या राज्यात राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

राज्यातील मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड,मानसूनचे उशिरा आगमन व वेळेपूर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई ( पिण्यासाठी, जनावरासाठी, पिकांसाठी), पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे,यामुळे अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होने अशे परिणाम दिसून येत आहेत.

याच बरोबर बदलत्या हवामाना मुळे जमिनीची सुपीकता देखील घटत चालली आहे. या बदलत्या हवामानामुळे जमिनीच्या सुपिकतेचा रहास होत चालला आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी संवर्धित शेती पद्धती अवलंबिल्यास जमिनीच्या संवर्धना बरोबर उत्पादन खर्चा मध्ये लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले परिणामी Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान ही बाब पोकरा Pocra yojana प्रकल्पाअंतर्गत राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान योजनेचा मुख्य उद्देश

प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान अंतर्गत एसआरटी तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता वाढवणे पावसातील खंड तसेच अति पाऊस या दोन्ही परिस्थितीत पिकाला अनुक्रमे पाण्याचा ताण सहन करण्यास आणि पाण्याचा निचरा करण्यास सक्षम करणे.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान वापर वाढून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे अशे काही हे प्रकल्प राबविण्याचे मुख्य उद्देश आहेत.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान फायदे

१. मातीच्या सुपीक थरांमध्ये उलथापालथ होत नाही.
२. सेंद्रिय पदार्थाची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत होते.
३. सातत्याने सेंद्रिय गरबाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
४. पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलद गतीने वाढते.
५. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते.

६. विपुल प्रमाणात जमिनीमध्ये गांडूळांचा आजचा संचार सुरू होतो.
७. जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते.
८. मातीचे तापमान नियंत्रित राहते.

९. मातीच्या कणांची रचना सुधारते.
१०. जमिनी भेगाळयाचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते.

१३. बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहील याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो.

१४. एकरी रोपांची संख्या नियंत्रित केल्यामुळे बियाण्याची बचत होते.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान लाभार्थी निवड

प्रकल्प गावातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
शेतकरी गट, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प गावातील सर्व शेतकरी सदस्य.
या योजनेत लाभार्थ्यास किमान अथवा कमाल जमीनधारणेची राहणार नाही.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान

शून्य मशागत zero tillage farming (एसआरटी) तंत्रज्ञान प्रोत्साहन या बाबीसाठी अनुदानाची गणना सलग दोन हंगामामध्ये एकाच प्लॉटवर तंत्राचा अवलंब केल्यानंतर करण्यात यावी.
अनुदानसाठी पात्र क्षेत्राची कमाल मर्यादा प्रति दोन सलग हंगाम साठी ५ हेक्‍टर प्रति शेतकरी प्रमाणे संपूर्ण प्रकल्प कालावधीसाठी राहील.

अनुदानाची कमाल मर्यादा: रु. २०००/- प्रति हेक्‍टर प्रति २ हंगाम (रु. ८००/- प्रती एकर) आणि कमाल रु. १०००० प्रति लाभार्थी असे अनुदान राहील.

मात्र नांगरणी, कुळवणी, यांत्रिकी अथवा बैलाच्या सहाय्याने पेरणी केल्यास तसेच पिकांची काढणी मुळासकट उपटून केल्यास सदर अनुदान देय राहणार नाही.

सदर घटकांतर्गत कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, इतात तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, हरभरा, इतर कडधान्ये, भुईमूग, सूर्यफूल, मोहरी, जवस, तीळ, इतर तेलबिया, कांदा, भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देय राहील. हळद, आले, बटाटा, रताळे, गाजर असा पिकांचा जमिनीखाली वाढणारा बहुतांशी भाग काढण्यासाठी जमिनीची मोठी खांदणी करावी लागत असल्याने या पिकांमध्ये शून्य मशागत तंत्र वापरणे उचित नाही, म्हणून सदर पिके प्रस्तुत घडकाअंतर्गत अनुदान पात्रतेतून वगळण्यात आलेली आहे.

तसेच विदेशी भाजीपाला जसे ब्रोकोली, लाल कोबी, बेबीकॉर्न टोमॅटो यासारख्या पिकाची सुद्धा सदर तंत्रज्ञानाने लागवड करणे शक्य असून यासाठी अनुदान देय राहील.

Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान अंतर्गत अटी सूचना

गादी वाफा तयार करणे पहिल्या हंगामात फक्त गादीवाफे तयार करून घ्यावेत गादी वाफे याचा आकार 4.5 फूट रुंद व अर्धा फूट उंच असा असावा

टोकण पद्धतीने लागवड करणे गादीवाफ्यावर बियाण्यांची टोकण करावी त्यावेळी बियाणे व खते एकत्रपणे टाकावीत

तणनाशकाची फवारणी पिकाची लागवडी नंतर व उगवणीपूर्वी शिफारशीत तणनाशक फवारावे उभ्या पिकातील तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास शिफारस केलेली निवडक तणनाशके वापरावीत कोणत्याही परिस्थितीत तणे उपटू नये, तर त्याची कापणी करावी आणि धसकटे व मुळांचा भाग तसाचं ठेवावा

काढणीच्या वेळी पिके कोणत्याही परिस्थितीत जमिनीतून उपटू नाये, तर त्यांची कापणी करावी आणि धसकटे व मुळांचा भाग तसाच ठेवावा.

त्याच वाफ्यावर पुढील पिकाची लागवड पहिल्या हंगामात वाफे न मोडता अगोदरचे पीक कापल्यानंतर त्यावर तन नाशकाची फवारणी करून पुढील पिकांची टोकण करावी गरज पडल्यास वाफेचे डागडुजी करावी.

कोणत्याही परिस्थितीत नांगरणी, कुळवणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे करण्यात येऊ नयेत.

शून्य मशागतीमुळे जमिनीमध्ये गांडूळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढल्याने जमिनी भूसभूशीत राहतात.

https://youtu.be/B7NwAhD6hvo

1 thought on “Zero tillage farming – शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान योजना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: