Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीर

अधिसूचना जारी ! Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीर, पहा काय होणार फायदा, अर्जाचा नमुना सर्व माहिती सविस्तर.

Abhay Yojana 2022

Abhay Yojana 2022 पार्श्वभुमी

राज्यात कोरोना काळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला या संकटातून, अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( Budget Maharashtra 2022) अभय योजना राबविण्याची घोषणा केली होती.

या योजनेला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूरी ही मिळाली होती, अखेर या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – अभय योजना ( Abhay Yojana2022 ) ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या योजनेची अधिसूचना जारी झाल्याने आता राज्यातील उद्योग, व्यापार क्षेत्राला सवलत दरात टप्प्या टप्याने कर थकबाकी भरण्याची आणि चिंतामुक्त होण्याची संधी उपलब्ध निर्माण झाली आहे.

मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा उद्देशाने शासनाने दि. 1 एप्रिल 2022 रोजीच्या आदेशानुसार शास्तीच्या कपातीची ही योजना जाहीर केली आहे.

Abhay Yojana 2022 ही योजना दि. 1 एप्रिल 2022 , ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ( आठ महिने ) कार्यान्वित राहणार आहे.

राज्यात आतापर्यंत शासनामार्फत सन 1994-95 , 1997 , 1998 , 2004 व 2019 या वर्षामध्ये माफी योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु नव्याने आलेली ही अभय योजना ही, मुद्रांक शुल्काच्या तुटींच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे.

Abhay Yojana 2022 ठळक वैशिष्ट्ये

या योजनेची ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत.

  • या योजनेच्याअधिसुचनेसोबतच्या परिशिष्टामध्ये नमुद दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची -1 च्या अनुच्छेदांतर्गत आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमाच्या कलम 31 च्या पोट – कलम 4 च्या खंड ( दोन ) , कलम 32 अ च्या पोट – कलम 2 आणि पोट – कलम 4 च्या पहिल्या परंतुकानुसार तसेच कलम 39 च्या पोट कलम 1 च्या खंड ( ख ) च्या तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही, अटी व शर्तीच्या अधीन राहून , 10 % पर्यंत कमी केली आहे
  • ही तरतूद दि . 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी असून दि . 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी 50 % कमी केली आहे. रोजी किंवा त्यापूर्वी निष्पादित करण्यात आलेल्या उक्त नमुद संलेख तथा दस्तांनाच लागू असेल.
  • या आदेशाखालील उक्त कपात, ज्या प्रकरणी , चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी उक्त अधिनियमाची कलमे 31, 323, 33, 33अ, 46, 53( 1अ ) व 53 अ यांच्या तरतुदीं अन्वये 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी , पक्षकारावर किंवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे अशा प्रकरणीच केवळ लागू असेल.
  • या आदेशाखालील उक्त कपात , ज्या प्रकरणी , उक्त अधिनियमाच्या तरतुदर्दी अन्यये , कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरिक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल, सदर माफी योजना ही मुद्रांक तुट व शास्तीची वसूली सुरू आहे अशा प्रकरणांना लागू करण्यात आली आहे.

ज्या प्रकरणात मुद्रांक चुकविल्याबाबत वसुलीची अथवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु झाली आहे अशा प्रकरणांना दंड सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

Abhay yojana या योजनेद्वारे विभागात सुरू असलेली दंड प्रकरणे , न्यायालयीन प्रकरणे कमी करून मुद्रांक व नोंदणी विभागाचा या कामकाजात जाण्याच्या वेळेत बचत करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा मानस आहे.  या माफी योजनेत मुद्रांक शुल्कावरील दंड रक्कमेत सवलत दिली आहे .

तथापि , दस्तावरील मूळ मुद्रांक शुल्काच्या तुटींची पूर्ण रक्कम शासनजमा करणे बंधनकारक आहे.

या योजनेचा लाभ घेतांना अर्जदारास विनाशर्त न्यायालयीन प्रकरण मागे घेणे बंधनकारक आहे.

हे तुम्हाला माहीत आहे का ?

याच प्रमाणे ज्या प्रकरणात विभागाने मुद्रांक शुल्क तुटीबाबत आदेश अंतिम केला आहे, अथवा नोटिस दिली आहे त्या रकमेप्रमाणे मुद्रांक शुल्क तूट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यांनंतर कोणतेही अपील अनुज्ञेय असणार नाही.

याकरिता सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तूट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करून या दंड सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शासन आदेश येथे पहा

शासन आदेश

सध्या या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज आहेत, लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

Abhay Yojana 2022 अर्जाचा नमुना

PDf साठी येथे क्लिक करा

Abhay yojna 2022 योजनेच्या अधिक माहिती साठी, कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकार यांचे कार्यालयात संपर्क साधावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: