National livestock mission ( NLM 2022 ) शेवगा लागवडी साठी अनुदान, अर्ज सुरु
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत जाणून घेऊया काय आहे योजना काय मिळणार आहेत योजनेचा लाभ.
वैरण विकास अभियान NLM 2022 Yojana
केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान National Live Stock Mission 2022 योजनेस मंजूरी प्रदान केली आहे.
या योजनेंतर्गत शेळी- मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता 50 % अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अनुदानाची अधिकतम मर्यादा वैरण विकास या घटकासाठी प्रकल्पानुसार रु. 50 लक्ष अशी आहे.
याच योजनेअंतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता शेतकऱ्यांना वैरणी साठी शेवग्याची लागवड करण्याकरिता प्रती हेक्टरी 30 हजार रुपये प्रती लाभार्थी अशा प्रमाणात अनुदान दिले जाते.
या अनुदान मध्ये प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा बियाणे (पीकेएम-1) दिले जाते. ज्यात बियाणाची किंमत रु. 6 हजार 750 तर उर्वरित अनुदान रु. 23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना Dbt द्वारे वितरीत करण्यात येतात.
NLM 2022 वैरण विकास अभियान योजने अंतर्गत हेक्टरी 7.5 किलो बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येतो. तर उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च शेतकऱ्यांना करायचा असतो.
अशा प्रकारे राबविल्या जाणाऱ्या या योजनेकरीता इच्छुक असणाऱ्या पशुपालक, शेतकरी यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह वीहित नमुन्यातील अर्ज करावा.
या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.