जिरेनियम लागवड – आर्थिक सबलतेचा एक नवा प्रयोग | Geranium lagvad mahiti

 आज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, शेतकऱ्यांना आर्थिक रित्या सधन करेल अशा शेती विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत , ती म्हणजे जिरेनियम शेती ( Geranium lagvad ).

Geranium lagvad

देशात सुगंधित रोपे, वनस्पती लागवडीला मोठा वाव आहे. शासन यासाठी विविध प्रकारे शेतकऱ्यांना या लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे.

भारतात लागवड केल्या जाणाऱ्या सुंगंधी वनस्पती  बरेच औषधी उद्देशाने देखील वापरले जातात. यात सुगंधी संयुगे वनस्पतींच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात जसे कि मूळ, लाकूड, साल, झाडाची पाने, फूल, फळ, बियाणे इ.

Geranium lagvad mahiti

या लागवडीत लेमन ग्रास, खस, मेंथा, जिरेनियम इत्यादी वनस्पती सुगंधित झाडे श्रेणीमध्ये येतात. या वनस्पती पासून काढण्यात येणाऱ्या सुगंधी तेलाचा उपयोग हा औषधी, कॉस्मेटिक्स, साबण आणि डिटर्जंट पावडरमध्ये केला जातो.

गेल्या काही दिवसापासून जागतिक बाजारात औषधी तेल, सुगंध रसायने, औषधे आणि औषधी पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

यामुळे जिरॅनियम लागवड हा एक नवा हमखास उत्पादनाचा पर्याय शेतकऱ्यांसमोर निर्माण झालं आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागात  पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कमी पावसाच्या, अवर्षणग्रस्त, दुष्काळग्रस्त भागांमध्ये भूमिगत जलस्तर  हा एक गंभीर प्रश्न आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या जिरेनियम पिकांची लागवड ( Geranium lagvad ) करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

Land & Climate For Geranium Lagvad

जिरेनियम या सुगंधि वनस्पतीच्या  शेती साठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनासारख्या साधनांनी ही  जिरेनियम शेती करता येऊ शकते.

जिरेनियमच्या लागवडीसाठी ( Geranium lagvad ) मध्यम प्रतीची जमिन चांगली, हे  माळराना जमिनीवरही  घेता येईल.  ज्या जमिनीत ट्रॅक्टरनी नांगरनी करता येईल अशा कोणत्याही जमिनीत जिरेनियम चे  पीक घेता येऊ शकते.

या लागवडी साठी सर्वसाधारण २०0C ते ३४0C  तापमान चांगले. तर तापमान २० 0C पेक्षा कमी किंवा ३४0C  पेक्षा जास्त झाल्यास  पिकांची वाढ खुंटते आणि पर्यायाने पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. या पिकासाठी आद्रता ७५% ते ८० % लागते.

जिरॅनियम लागवड ( Geranium Lagvad ) पद्धती व काळजी

जिरेनियम लागवड ( Geranium lagvad ) करताना  ५ वर्षापेक्षा जास्त काळ हे पीक शेतात राहणार असल्याने सर्वात प्रथम शेतीची योग्यप्रकारे नांगरणी व मशागत करून घेणे खूप गरजेचे असते. मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घेऊन त्यावर ठिबक टाकावे.

जिरेनियम लागवड हि चार फूट बाय दीड फुटावर किव्हा ४ फूट X १.२५ फुटावर केली जाते. 

जिरेनियम  लागवडी साठी एका एकरमध्ये  साधारण पने ९५०० ते  १०, ०००  हजार रोप लागतात.

जिरॅनियम हे पिक लागवडीनंतर ४ महिन्यात पहिल्या कापणीला येते, तर एका वर्षात तीन वेळा कापणी होते.

या लागवडीकरिता पहिल्या वर्षी एकरी खर्च ८० ते १ लाख १० हजार येतो.

या पिकाच्या कापलेल्या पाल्यापासून  ऑईल निर्मिती केली जाते व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती होते.

जिरेनियमच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पिकाची पावसाळ्यात जास्त काळजी घावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात. उर्वरित ऋतूमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही.

आर्थिक उत्पन्न

एका एकर जिरेनियम लागवडीत वार्षिक ३० ते ४० किलो  तेल मिळते. ज्या तेलाला सर्व साधारण पाने बाजारात एक लिटर ची किंमत १२५०० रुपये ते १३००० इतकी मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात ३ ते ४.५  लाखाच ऑईल मिळते.

जिरेनियम ची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हायडेनसि परफ्यूम व कॉस्मेटिक ई साठी याचा वापर केला जातो.फरफ्युम मध्ये असणारी नॅचरिलीटी  या मधूनच मिळते, म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.

जिरेनियम तेलाला भारतसह जगात  मोठी मागणी आहे. 

फक्त भारत देशात दर वर्षाला २०० ते  ३०० टन जिरॅनियम तेलाची मागणी आहे, परंतु सध्याचे उत्पन्न पाहता भारतात वर्षाला १० ते २० टन पण ऑईल निर्मिती होत आहे, त्यामुळे या अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करणे नक्कीच अधिक फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: