Tube well , pump set subsidy 2022 आदिवासी शेतकऱ्यांसाठी ट्यूब वेल व पंपसेट ला अनुदान

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना tube well, pump set, solar, well, farm pond विविध बाबी करिता अनुदान दिले जाते.

Tube well , pump set subsidy 2022
Tube well subsidy scheme

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या शेतात ट्यूब वेल + पंपसेट देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थयला विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनुरी जि.हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

Tube Well + pump set योजनेचा लाभ घेण्यासाठी  लागणारी कागदपत्रं

  • अर्जासोबत अनुसूचित जमातीचे सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा सातबारा ( किमान 0.60 आर लागवडीलायक शेती असल्याचा पुरावा )
  • पासबूकची झेरॉक्स प्रत
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • ओळखपत्र किंवा आधारकार्ड
  • तसेच या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला नसल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

अशा प्रकारची सर्व कागदपत्र जोडून परिपूर्ण कागदपत्रासह हा विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे जमा करावयाचा आहे.

अर्ज करण्याची मुदत

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक १३ मे २०२२ ते २० मे  २०२२ मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: