Kusum Mahaurja circular – पंपाचा कोठा, पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली

Kusum Mahaurja circular जाहीर पंपाचा कोठा, कुसुम योजनेच्या पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करन शक्य व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थसाहाय्य तून PM KUSUM – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ( kusum solar ) योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख सोलर पंप दिले जाणार आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात च्या माध्यमातून 2750 पंप वाटप करण्यात आलेले असून दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे.

नेमका हाच दुसरा टप्पा किती पंपाचा ( kusum solar quota) आहे ? या अंतर्गत आलेल्या पेमेंट ऑप्शन शेवटची तारीख काय असणार ? पेमेंट ऑप्शन घेत असताना बऱ्याच जणांना चुकून ऑफलाईन पेमेंट ऑप्शन निवडलेले आहे, त्यांना ऑनलाइन पेमेंट कसं करायचं ? अशा अनेक प्रश्न पडले होते.

Kusum Mahaurja circular
Kusum Mahaurja circular

Kusum mahaurja circular 10 may 2022

पेमेंट करण्यासाठी ची शेवटची तारीख माहीत नसल्याने पेमेंट करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाले होती, अशा अनेक समस्या, अनेक तक्रारी महाउर्जा ला प्राप्त झाल्या होत्या आणि याच अनुषंगानं ९ मे २०२२ रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये काही निर्णय घेऊन पेमेंटच्या संदर्भात एक परिपत्रक ( kusum Mahaurja circular) १० मे २०२२ रोजी काढण्यात आले आहे.

या परिपत्रकाच्या ( kusum Mahaurja circular) माध्यमातून या योजनेचा कोठा, पेमेंट करण्याची शेवटची तारीख, पेमेंट करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यांच्या बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे.

लाभार्थी हिस्साभरणे बाबत सुधारित सूचना ( New guidelines for pm kusum online payment )

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ( pmkusum) योजना टप्पा दोन हा ६ मे २०२२ पासून राबविण्यास सुरुवात झाली असून. लाभार्थ्यांना नोंदणी आणि लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिलेला आहे.

या टप्यात एकूण १३,३०० शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ८००० शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट ऑप्शन निवडलेले आहे, ऑनलाइन पेमेंट केलेला आहे.

मात्र ज्यांना वरील प्रमाणे ऑनलाइन पेमेंट करणे शक्य नाही त्याला ऑफलाइन पद्धतीने NEFT, challan, DD द्वारे सुध्धा kusum Mahaurja login च्य वेबसाईट वर पेमेंट करता येणार आहे.

याचं बरोबर शेतकऱ्यांना NEFT ने ही पेमेंट करता येणार आहे. त्याच्यामध्ये चलन DD चा पर्याय निवडल्यानंतर चलानची किंव्हा DD ची प्रिंट काढावी.

यानंतर त्यांनी स्वतःच्या ज्या ठिकाणी बँक मध्ये आपला सेविंग खाते आहे त्या ठिकाणी जाऊन चलन मध्ये असलेली बँक खाते नंबर आयएफसी कोड व खातेदार महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या नावाने स्वतःच्या खात्यामधून NEFT करायची आहे.

हे ऑफलाईन पेमेंट केल्यानंतर लाभार्थ्यांना बँकेचा सही शिक्का व शक्यतो UTR number नमूद केलेल्या पावतीचा फोटो अपलोड करायचा आहे.

शेतकऱ्यांना ऑफलाईन पेमेंट करताना, NEFT payment करताना आपल्या बँकेमध्ये काही अडचण आल्यास कोटक महिंद्रा बँकेचा अधिकार्‍यांशी संपर्क करायचा आहे.

हेही पहा

याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या कोटक महिंद्रा बँक अधिकारी यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा बरोबर दिलेला आहे. खालील यादी पहा.

Kusum mahaurja circular
Kusum mahaurja circular

यात प्रत्येक जिल्ह्याचे अधिकाऱ्यांचे नंबर मेंशन करण्यात आलेले आहेत.

या दोन्ही पद्धतीने पेमेंट केल्यानंतर आपल्याला सिलेक्शन करता येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी किंवा चलनाद्वारे रोख रक्कम जमा करण्याचा पर्याय निवडला आहे मात्र त्यांना वरील प्रमाणे ऑनलाइन पेमेंट ऑनलाइन पेमेंट द्वारे भरना करण्याची पर्याय घ्यायचा असल्यास त्यांनी kusum mahaurja login पोर्टल वरती पुन्हा एकदा जायचे त्यांना आज ११ मे २०२२ पासून ऑनलाइन पेमेंट ऑप्शन येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन किंव्हा ऑफलाईन पध्दतीने आधारे लाभार्थी हिस्सा खात्यावर भरलेला आहे त्यांनी पुढील पुरवठादार निवड ( vendor selection) कारवाई करावी.

या संदर्भात काही अडचण आल्यास पोर्टल वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती या ( kusum mahaurja circular) परिपत्रकात देण्यात आलेली आहे.

याचप्रमाणे या टप्प्यासाठी लाभार्थी हिस्सा ( pm kusum payment) भरण्याची शेवटची सुधारित मुदत ही 31 मे 2022 असणार आहे, यामुळे या टप्प्यामध्ये पेमेंट ऑप्शन आलेल्या 13300 शेतकऱ्यांना 31मे 2022 पर्यंत पेमेंट करायचे आहे.

अशा प्रकारे हे परिपत्रक ( kusum mahaurja circular) काढून माहिती देण्यात आली आहे.

त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑनलाइन पेमेंट भरणा करावा अशा प्रकारचे आव्हान करण्यात आले आहे, ज्यांनी चलन काढले होते ते चलन काढलेले शेतकर्‍यांना पुन्हा एकदा ऑनलाईन पेमेंट ऑप्शन आलेले आहेत आणि पेमेंट झाले नंतर पुरवठादार निवड व सर्व सुरू होतील.

ही योजना अशीच पुढे टप्प्याटप्प्याने सुरू राहील जेणेकरून पुढील शेतकऱ्याला यात पात्र करून, त्यांची प्रक्रिया पूर्ण होतील. मात्र नवीन रजिस्ट्रेशन सुरू होण्याची शक्यता कमी आहे त्याच्यासाठी खूप वेळ लागू शकतो त्याच्या बद्दल नवीन काही अपडेट आले तर तेही नक्की घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: