Kusum solar pump yojana maharashtra 2022 – राज्यात कुसुम सोलर पंप योजना सुरू.

कुसुम सोलर पंप ( kusum solar pump yojana maharashtra ) योजनेतर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास तर त्यापैकी 2021 या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे

kusum solar
kusum solar

kusum solar pump yojana

राज्य शासना कडून जाहीर करण्यात आलेल्या ऊर्जा धोरण २०२० नुसार शेतीला दिवसा वीज देण्याच उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या  दृष्टीने या धोरणाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या धोरणातून पुढील पाच वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5 लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत तर ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 हजार घरांना सौरउर्जेद्वारे वीजपुरवठा करणे प्रस्तावित आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास राज्य  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीआहे. ज्यात केंद्र शासनाच्या कुसुम सोलर पंप ( Pm kusum solar ) योजनेअंतर्गत या महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात येऊन राज्यात एक लाख सौर पंप ( solar pump ) उभारण्यात येतील.

राज्य शासनाच्या माध्यमातून एक लाख सौर पंप ( solar pump ) उभारण्यासाठी 1969.50 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून यातील  30 % म्हणजे 585 कोटी केंद्राकडून तर  173 कोटी लाभार्थींकडून उपलब्ध होणार आहे. यातील उर्वरित 1211 कोटी इतका निधी राज्य शासन देणार आहे.  यामुळे पुढील 5 वर्षात प्रत्येकी 436 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद व 775 कोटी अतिरिक्त वीज विक्री कर यामार्फत निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यात कुसुम सोलर पंप योजना ( kusum solar pump yojana maharashtra ) या योजनेची अंमलबजावणी महाऊर्जामार्फत होत आहे.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचे कडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थाण महाभियान ( PM KUSUM कुसुम ) राज्यात तीन घटकांतर्गत राबविण्यात येणार आहे.

घटक अ (Componant A) :- विकेंद्रीत पारेषण संलग्न जमिनीवरील व Stilt Mounted सौर ऊर्जा प्रकल्प

घटक ब (Componant B)  :- पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करणे.

घटक क (Componant C) :- पारेषण संलग्न सौर कृषीपंप संयंत्र आस्थापित करणे,

Kusum Solar Part A

  • सदर अभियान घटक महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येईल.
  • या अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्‍यांना सिंचनासाठी उपकेंद्र पातळीवर0.5 मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेपर्यंत प्राप्त मंजूरीनुसार 300 मेगावॅटचे सौर  ऊर्जेचे प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट.
  • अभियान कालावधीत एकूण5000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट.
  • या अभियानामध्ये इच्छुक शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/ जल उपभोक्ता संघटना/सौर ऊर्जा विकासकाद्वारे महावितरणच्या उपकेंद्राच्या5 कि.मी. क्षेत्रातील  त्यांच्या जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारु शकतील.
  • अशा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कमाल रु.3.30/-प्रती युनिट या दराने घेण्याचे प्रस्तावित.
  • ज्या ठिकाणी उपकेंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रकल्प उभारणीची मागणी आल्यास स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे आलेल्या लघुत्तम दराने महावितरण कंपनी वीज खरेदी करारनाम्याद्वारे25 वर्षांच्या कालावधीकरिता खरेदी करेल.

Kusum Solar Part B

  • या अभियांनातर्गत पुढील5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
  • सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचेOn-line  अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
  • यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ५ HP व त्यापेक्षा जास्त  क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजित.
  • सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)
  • पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार.
  • या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे30 टक्के वित्तीय  सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.
  • एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
  • सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.

Kusum Solar Part C

  • सदर घटक अभियान महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येईल.
  • शेतकऱ्यांना अस्तित्वात असणाऱ्या पारंपारीक पंपाऐवजी कृषि पंपाचे उर्जाकरण करुन शेतकऱ्‍यांना स्वत:च्या वीज वापराव्यतिरिक्त जादा वीज महावितरण कंपनीस विकून त्यांचे उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध
  • सदर अतिरिक्त वीजेपोटी निश्चित केलेल्या दराने महावितरण कंपनीद्वारे मोबदला देण्यात येईल.
  • शेतकऱ्याकडे सद्य:स्थितीत असणाऱ्या पारंपारिक पध्दतीच्या कृषी पंपाच्या क्षमतेच्या २ पटीपर्यंतच सौर ऊर्जा निर्मिती करता येईल.
  • शेतकऱ्याने ग्रीडला केलेल्या अतिरिक्त वीज पुरवठा आकारणी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या “फिड इन टेरिफ” प्रमाणे करण्यात येईल.
  • ग्रीडला निर्यात करण्यात येणारी वीज सौर ऊर्जा पॅनलव्दारे निर्मिती झालेल्या वीजेच्या ५० टक्के पर्यंत मर्यादित असेल.
  • निर्यात होणारी वीज रोहित्र क्षमतेपेक्षा जास्त होऊ नये याकरिता रोहित्र क्षमतेच्या ७० टक्के एवढी सौर क्षमता मंजूर करण्यात येईल. यात प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • सदर कुसुम घटक “क” ची अंमलबजावणी केवळ संमिश्र वाहिनीवर (Unsaggregated Feeder)राबविण्यात येईल.
  • या अभियानांतर्गत पारेषण संलग्न सौर कृषिपंप आस्थापित करण्यास प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या ३० टक्के रक्कम केंद्र शासनामार्फत व ३० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यास देण्यात येईल व लाभार्थी हिस्सा ४० टक्के राहील.

संपूर्ण अभियानाची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी मा.मंत्री (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात येईल. सदर अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्‍या अडीअडचणी व आवश्यकतेनुसार योजनेत सुधारणा व बदल करण्याचे अधिकार सदर समितीस राहतील

लागणारी कागदपत्रं kusum solar Documents

  1. ७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  2. आधारकार्ड प्रत.
  3. रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो,
  5. शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.
  6. photo

How To Apply PM Kusum Solar

Watch how to apply for kusum solar

अर्ज भरण्यासाठी पात्र असलेल्या सेफ व्हिलेज ची लिस्ट GSDA कडून देण्यात आली आहे, या लिस्ट मध्ये नाव असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना यात अर्ज करता येतील, मात्र जरी लिस्ट मध्ये गावाचे नाव नसेल तरी आपण अर्ज करू शकता त्यासाठी आपण सिंचनासाठी डिझेल पंप वापरत आहे या ऑपशन मध्ये होय वरती क्लिक करून अर्ज भरु शकता.

अर्ज पूर्ण भरल्यावर आपणास कोटेशन दिले जाईल त्यानुसार पैसे ७ दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतील अन्यथा ते अपात्र ठरवले जाईल 
बँक डिटेल देणे महत्वाचे आहे जेणे करून अर्ज बाद झाल्यास केलेला भरणा खात्यात जमा होईल.

kusum solar payment option

महा ऊर्जा कार्यालय संपर्क Mahaurja Maharashtra contact

महाऊर्जा कार्यालय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: