फेरीवाले, पथ विक्रेत्यासाठी नवी योजना | Svanidhi se samrudhi yojana देशात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर झाल्यावर टाळेबंदीचा, लॉक डाऊनचा मोठा परिणाम देशासह राज्यातील फेरीवाले व पथ विक्रेते यांच्यावर झाला आहे.
यातूनच त्यांना आपले बंद पडलेले व्यवसाय परत सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यास देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी ( PM Svanidhi yojana ) या योजनेची घोषणा केली, आणि या PM Svanidhi yojana अंतर्गत लाखो फेरीवाले , पथ विक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून ३१३० कोटी रुपयाची कर्ज वाटण्यात आली.
Table of Contents
Svanidhi se samrudhi yojana उद्देश
मात्र PM Svanidhi yojana या योजनेकडे फक्त फेरीवाले, पथ विक्रेत्यांना कर्ज द्यायची योजना असे न बघता त्यांच्या आर्थिक सामाजिक अशा सर्वसमावेशक प्रगतीवर भर देण्याच्या सूचना माननीय प्रधानमंत्री यांनी दिल्या आहेत.
या दृष्टिकोनातून पथ विक्रेता, फेरीवाले साठी राबविल्या जाणाऱ्या या PM Svanidhi yojana या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून त्यांची पात्रता तपासून त्यांना शासनाच्या इतर योजनांचा फायदा मिळवून देण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असून यासाठी स्वनिधी से समृद्धी ( Svanidhi se samrudhi yojana) ह्या अभियानाअंतर्गत लाभ देण्याचे योजले आहे.
योजनेची चीअमलबजावणी प्रक्रिया.
यामध्ये स्वनिधी से समृध्दी ( Svanidhi se samrudhi ) योजना प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा घटक असेल.
यानुसार या योजने अंतर्गत स्वनीधी से समृध्दी योजनेच्या लाभार्थ्यांना ८ योजनांचे लाभ देण्याचे नियोजन आहे.
योजने अंतर्गत द्यावयाचे लाभ.
PM-SVANIDHI च्या सर्व लाभार्थ्यांचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करून केंद्र शासनाच्या योजनांसाठी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांचे पात्रता तपासणी तसेच जिथे राज्य शासनास योग्य वाटेल तिथे राज्याच्या विविध सामाजिक आर्थिक कल्याण योजनांचे समावेश येथे करता येईल असे नियोजन करण्यात आले आहे.
योजनेचे अमलबजावणी क्षेत्र
Svanidhi se samrudhi योजनेत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रधानमंत्री विक्रेता आत्मनिर्भर निधी PM Svanidhi योजनेचे लाभार्थी व त्यांचे कुटुंबियांचे समावेश करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये हे राज्यातील १) कल्याण डोंबिवली महानगरपालिका २) अहमदनगर महानगरपालिका ३) अकोला महानगरपालिका ४) अमरावती महानगरपालिका ५) लातूर महानगरपालिका ६) नांदेड वाघाळा महानगरपालिका ७) औरंगाबाद महानगरपालिका ८) मालेगाव महानगरपालिका ९) नवी मुंबई महानगरपालिका १०) वसई विरार महानगरपालिका ११) ठाणे महानगरपालिका १२) सोलापूर महानगरपालिका १३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका १४) पुणे महानगरपालिका १५) मुंबई महानगरपालिका या 15 शहरांमधील महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रधानमंत्री विक्रेता आत्मनिर्माण निधी योजनांचे लाभार्थी व त्यांच्या कुटुंबियांचे समावेश करण्यात येईल.
- अतिवृष्टीच्या निकषातून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा | satatcha paus anudan 2023
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई वितरीत | avkali nuksan bharpai 2024