आता मनरेगा तून मिळणार बायोगॅस प्रकल्प उभारणी अनुदान | Biogas plant mgnrega

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनात Biogas plant उभारणी चा समावेश करण्यात आला आहे.

Biogas plant

मनरेगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत बायोगॅस उभारणीत प्रकल्प या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.

बायोगॅस उभारणी प्रकल्पाकरिता राष्ट्रीय बायोगॅस योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जात होतं मात्र 2020 मध्ये ही योजना बंद झाली.

याच्या नंतर कुठले योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक स्तरावरती बायोगॅस उभारणी प्रकल्पाकरिता अनुदान दिलं जात नव्हतं.

पर्यावरण पूरक असलेल्या याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्रामध्ये असलेली गरज या सर्व बाबींचा विचार करता MGNRega act 2005 मध्ये बदल करून वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत याचप्रमाणे सामुदायिक योजनांच्या अंतर्गत अकुशल खर्चासाठी या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.

८ एप्रिल २०२२ रोजी एक राजपुत्र काढून मनरेगा ॲक्ट 2005 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

MGNREGA act 2005 amendment gazzete for Biogas plant installation

येथे पहा 👇👇

Biogas plant installation mgnrega GR

8 एप्रिल 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या या राजपत्रात मनरेगा कायदा 2005 मध्ये बदल करून दोन बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

1 वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत वैयक्तिक स्तरावर ती बायोगॅस प्रकल्प उभारणी

2 सामुदायिक स्तरावर बायोगॅस प्रकल्पातील अकुशल खर्चाची बाब.

येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2022 23 पासून वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत या बायोगॅसची उभारणी प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे.

लवकरच मनरेगाच्या माध्यमातून या बाबी संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रकाशित केल्या जातील यात अनुदान किती जाईल, अटी शर्ती काय असतील, अर्ज कसा करायचा याबद्दल निर्देश दिले जातील.

ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे योजनांमध्ये गोबर गॅस निर्मिती योजना आता या वैयक्तिक लाभाची योजना मध्ये अनुदान दिल्यामुळे किंवा वैयक्तिक लाभाच्या अंतर्गत याचा समावेश केल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्याला, ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

गॅसच्या वाढत्या किमती असतील किंवा इतर समस्या असतील याच्या वरती मनरेगाच्या माध्यमातून काढण्यात आलेले हा एक मोठा पर्याय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: