विहीर खोदकामासह मनरेगा च्या सर्व कामाच्या अनुदानात वाढ | mgnrega wage 2022

मनरेगा चा मजुरीदर आता २५६ रुपये mgnrega wage for maharashtra

Mgnrega wage 2022

Mgnrega wage वाढल्याने कृषीसहित (Agriculture) इतर सर्व विभागांमार्फत होणाऱ्या अकुशल कामांना सुधारित दरपत्रकाचा होणार फायदा जाऊन घेऊयात काय आहेत नवे दर सविस्तर पणे ( know about What is the current wage of MGNREGA 2022 )

केंद्र शासनाच्या माध्यमातून २८ मार्च २०२२ रोजी एक अधिसूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरी दर ( Mgnrega wage ) निश्चित केले आहेत. २८ मार्च २०२२ या अधिसूचनेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांना द्यावयाचा अकुल मजुरीचा दर हा महाराष्ट्रासाठी २५६ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे.

रोजगार हमी योजना

हा सुधारित दर महाराष्ट्रासाठी दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आलेला आहे. आणि यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना आयुक्त यांनी एक पत्रक काढून सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सूचित केले आहे.

या प्रतिदिन २५६ रुपये केलेल्या नव्या मजुरी दरामुळे मनरेगा तुन राबविल्या जाणाऱ्या कृषीसहित (Agriculture dept ) इतर सर्व विभागांमार्फत होणाऱ्या अकुशल कामांना या सुधारित दरपत्रकाचा मोठा फायदा होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयाने दिलेल्या रोहयो च्या वाढीव मजुरीच्या या पत्रकामुळे जमिनीच्या विविध प्रकारांनुसार खोदाईचे प्रती घण मीटर दरदेखील आता वाढविण्यात आलेले आहेत. जे आता खोदकामाच्या प्रकारानुसार १२५ रुपयांपासून ते ४९० रुपयां घनमीटर पर्यंत असणार आहेत. याचबरोबर जनजाती / डोंगराळ क्षेत्रासाठी दिले जाणारे खोदाई मजुरीचे दर सुध्दा जास्त दिले जातात.

नवीन विहीर खोदकाम योजनेच्या खोदाईचे प्रतिघनमीटर दर देखील आता १५६ रुपयांपासून ते ६१३ रुपयांपर्यंत करण्यात आलेले आहेत.

अकुशल मजुरी व त्यानुषंगाने वाढलेल्या या खोदाईच्या दरामुळे विहीर खोदाई, चरांचे खोदकाम, फळबाग लागवडी सारख्या कामामध्ये जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या पदरात एक चांगली रक्कम पडणार आहे.

मनरेगा नवीन मजुरी दर  pdf

mgnrega wage 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: