नेमका सातबारा उतारा कोणता वापरावा | Satbara Utara Maharashtra

शासकीय, कायदेशीर कामाकरीता नेमका कोणता सातबारा (Satbara utara ) वापरावा, शासनाचे यासंदर्भात काय नियम आहेत जाणून घेऊयात.

Satbara utara

Satbara utara 7/12 – Land records maharashtra

शेत जमिनीचा सातबारा ( 7/12 ) म्हणजे आपल्या जमिनीचा जणू आरसाच. कायदेशीर काम की असो सरकारी काम असो की योजनांचा ( mahadbt farmer scheme ) लाभ असो, पिक विमा ( pikvima ) असो प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला मागितलं जाणारे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार कागदपत्र म्हणजे सातबारा.

परंतु बऱ्याच माध्यमातून प्रश्न केला जातो हस्तलिखित सातबारा चालेल का ?, डिजिटल सातबारा( Digital 7/12 ) चालेल का ? किंव्हा हस्तलिखित सातबारा अपलोड केला तर चालेल का?

हे सातबारे वापरण्याच्या संदर्भात मग ते कायदेशीर कामासाठी असो सरकारी योजना साठी असो किंवा इतर काही महत्त्वपूर्ण कामांसाठी असो काही नियम आहेत का? तर हो 19 डिसेंबर 2019 त्याचप्रमाणे 23 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय ( Maharashtra govt GR ) काढून या सातबाराच्या वापरा संबंधातील काही महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत.

याच्या संदर्भातील पहिला शासन निर्णय आहे 19 डिसेंबर 2019 रोजीचा भूलेख संकेतस्थळावरून ( bhulekh mahabhumi )आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ( ASSK ) देण्यात येणाऱ्या विनाशुल्क सातबारा उतारा व आठ अ खात्या उताऱ्या बाबत मार्गदर्शक सूचना.

Download GR here

भूलेख संकेतस्थळावरुन आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत देण्यात येणाऱ्या विनाशुल्क संगणीकृत गा.न.नं. 7/12 उतारे व 8 अ खाते उताऱ्यांबाबत मार्गदर्शक सुचना

आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या भुलेख संकेतस्थळावरून जनतेला विनाश शुल्क सातबारा व आठ पाहण्याचे सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, परंतु या संकेतस्थळावरून दिले जाणाऱ्या सातबारा बाबत काही गैरवापर होत असल्याच्या तक्रारी महसूल व वन विभागाच्या निदर्शनास आलेले आहेत याचा अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.

ज्याच्यामधील पहिली सूचना – भूलेख महाभुमी संकेतस्थळावरून सातबारा व आठ अ फॉर व्ह्यू ओन्ली वॉटर मार्क असेल ती माहिती फक्त माहितीसाठी असून त्याच्या प्रत्येक कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य मांडण्यात येणार नाही.

कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र चालक भूलेख महाभूमी संकेतस्थळावरील सातबारा उतारा, आठ अ प्रति वरती सत्तेतेचे पडताळणी केल्याबाबत सही शिक्का मारून वितरित करणार नाही.

अशा प्रकारचे बाब निदर्शनास आल्यास तहसीलदार यांनी त्याबाबत रितसर चौकशी करावी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करावी व जिल्हाधिकारी यांनी दोषीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना या परिपत्रकात देण्यात आलेल्या आहेत.

म्हणजे फॉर्म व्ह्यू ओन्लीचा जो सातबारा आहे तो फक्त शेतकऱ्यांना आपली माहिती पाहण्यासाठी आहे त्याचा वापर तुम्ही कुठल्याही शासकीय, न्यायालयीन कामासाठी करू शकत नाही.

याचबरोबर 23 नोव्हेंबर 2020 रोजी परत एक शासन निर्णय माध्यमातून डिजिटल स्वाक्षरीस डेटाबेस आधारित संगणकी करत जो सातबारा आहे हा डिजिटल सातबारा ( Digital 7/12 ) सर्व कामासाठी ग्राह्य धरण्यासाठी आणि तोच एकमेव सातबारा हा वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Download Gr here

डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास ( गा.न.नं. ७/१२, गा.न.नं. ८अ, गा.न.नं.6 ) कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत.

विविध बाबींचा विचार करून हे शासन परिपत्रक काढण्यात आलेले आहे.

पहिली सूचना – शासनाच्या महाभुमी पोर्टल वरती डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरून उपलब्ध होणारे QR कोडसह 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारे संगणकीकरण सातबारा आठ आणि गाव नमुना नंबर सहा ज्याला पण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो या नमुन्याचा अधिकार अभिलेख विशेष उतारा सर्व कायदेशीर व शासकीय निमशासकीय कामकाजासाठी वैद्य राहील.

अशा डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणकीकरण सातबारा आठ आणि जे प्रॉपर्टी कार्ड वर अन्य कोणत्याही अधिकारी यांची स्वाक्षरी असण्याची गरज नाही म्हणजे डिजिटल सातबारा वरती तलाठ्याचे किंवा इतर कुठलेही अधिकाऱ्याची सही घेण्याची तुम्हाला गरज नाही.

हा सातबारा तुम्ही जसा आहे तसा डाऊनलोड ( Download digital 7/12 ) करून वापरू शकता.

सर्व जिल्हाधिकारी व क्षेत्रीय महसूल अधिकारी प्राधिकारी यांनी या निर्देशाचे तात्काळ अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या सूचना देखील या 23 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.

तर अशे हे सातबाराच्या वापराच्या संदर्भातील काही नियम आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डिजिटल सातबारा हा सर्व ठिकाणी वापरू शकता.

सर्व ठिकाणी तो सातबारा ग्राह्य आहे.

आता बऱ्याच ठिकाणचा सातबारा ( Satbara utara ) हा अध्याप देखील डिजिटल अपडेट झालेला नाही तो डिजिटल सातबारा निघत नाही अशा ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून हस्तलिखित सातबारा देण्यासाठी मुभा आहे.

बाकीच्या ठिकाणी तुम्हाला डिजिटल सातबाराच अपलोड करायचा आहे जो महाभूमीचा सातबारा हा तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तुमच्या जमिनीची तुमच्या त्या सातबारावर असलेल्या क्षेत्राची किंवा इतर काही महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आहे त्याचा तुम्ही कुठलेही कायदेशीर कामासाठी सरकारी कामासाठी वापर करू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: