शेतकरी उत्पादक कंपनी कशी सुरू करावी, Farmer Producer company 2022

जाणून घेऊयात FPC शेतकरी उत्पादक कंपनी कशी सुरू करावी, Farmer Producer company काय कागदपत्र लागतात, अर्ज कसा करावा पूर्ण माहिती.

Farmer Producer company

शेतकरी उत्पादक कंपनी ( Farmer Producer company – FPC ) निर्मिती ची पार्श्वभुमी.

देशात १९५६ च्या कंपनी कायद्यात बदल करुन त्यातील कलम ९-अ मधे शेती उत्पादक कंपनी बाबतीत कायदा, नियमावली समाविष्ट करण्यात आली. ज्या आपणास कंपनी कायदा २०१३ मधिल सेक्शन ४६५ (१) मध्ये पहावयास मिळतील.

FPC – शेतकरी उत्पादक कंपनी मुळे शेतक-यांना काय फायदे होतील ते आपण या लेखात जाणुन घेणार आहोत. या सुधारित कंपनी कायद्याच्या अंतर्गत इतर काही योजना कशा लाभकारक ठरतील ते देखिल बघणार आहोत.

शेतकरी उत्पादक कंपनी FPC स्थापनेचे उद्देश

 • शेतकऱ्यांना उत्पादन, कापणी, खरेदी, प्रतवारी, संकलन, हाताळणी, प्रक्रिया,बाजारपेठ, विक्री, सदस्यांच्या प्राथमिक उत्पादंनांची निर्यात किंवा त्यांच्या लाभाकरीता उत्तम प्रतीच्या सेवांची आयात करणे अशा बाबींसाठी सहाय्य.
 • शेतमालाची साठवणूक, माल सुकविणे, प्रतवारी, ग्रेडेशन, जाहिरात आणी सदस्यांच्या मालाचे पॅकिंग  करणे अशे प्रक्रिया उद्योग सुरू करणे.
 • दुध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग
 • फळ प्रक्रिया उद्योग अशा माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून आत्मनिर्भर करणे अशे काही उद्देश शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनी FPC स्थापना व व्यवस्थापन

 • शेतकरी उत्पादक कंपनी FPC स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते.
 • शेतकरी उत्पादक कंपनी ची किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति नोंदणी करू शकतात.
 • संचालक मंडळाने पूर्ण वेळ कामकाजा करिता एक व्यवस्थापक नेमणूक करावा लागतो.
 • संचालक व्यवस्थापनाचे अधिकार व्यवस्थापकांना देऊ शकतात.

FPC करिता आवश्यक कागदपत्र.

 • संचालकाचे पासपोर्ट आकाराचा फोटो. ( Passport size photograph latest)
 • संचालकांचे Pan card
 • विज बिल, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, पासपोर्ट,शाळा सोडल्याचा  दाखला, मतदान नोंदणी कार्ड, ग्रामपंचायत दाखला यापैकी किमान दोन निवासी दाखल्याचे पुरावे लागतात.
 • संचालकांचे ७/१२ ( 7/12 land records) चा उतारा

FPO ची नोंदणी प्रक्रिया आणि शुल्क ( How to enroll FPC )

शेतकरी कंपनी स्थापन करत असताना कमीत कमी एका संचालकाचे किंव्हा व्यवस्थापकाचे  डिजिटेल सिग्नेचर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

FPO DIGITAL SIGNATURE

सर्व कागदपत्रे स्वाक्षरीत ( Digital signature certificate ) करण्याकरिता कंपनीने आपला एक प्रतींनिधी अधिकृत करणे आवश्यक आहे, यासाठी एक प्रमाणपत्र देखील घ्यावे लागते ज्यासाठी आपणास Corporate affairs मंत्रालयाच्या वेब साईट एक ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

FPO DIN

कंपनी स्थापन करण्याकरीता DIN ( Direct Identification number ) क्रमांक आवश्यक असतो. हा क्रमांक हा कंपनी अफेअर कक्ष Noida उत्तर प्रदेश येथून online पद्धतीनें मिळतो, याकरिता पॅनकार्ड ,डायव्हीग लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट अशी कागदपत्र पुरावा म्हणून लागतात. याकरिता Corporate affairs विभागाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

FPO Name Selection

पुढील महत्वाची प्रक्रिया म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी चे नाव निश्चित करणे. यामध्ये कंपनीच्या मुख्य उद्देशाला अनुसरून एक नाव निवडावे लागते.

निवडलेले नाव पूर्वी नोंदणी झालेल्या कंपनीच्या नावासारखे नसावे लागते. याकरिता कंपनी निबंधकाकडे रु ५००/- चे शुल्क भरून http://www.mca.gov.in वर e-from (A) s नमुन्यात लॉगिन  करावे लागते. यासाठी डिजिटल स्वाक्षरी असणार्‍या व्यक्तीने अर्ज करावा लागतो.

FPO MOA & AOA

ही महत्वाची कागद पत्रे कागदाच्या दोन्ही बाजुवर प्रिंट करून त्यावर स्टॅम्प लावावा लागतो व त्या वर प्रवर्तकने स्वत:चे,वडिलांचे नाव ,धंदा ,पत्ता व धारण केलेले शेअर्स ची संख्या ही माहिती भरून दिनांकसह स्वाक्षरी करायची असते.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पूर्ण पत्ता. Form 18

कंपनीच्या संचालकांची माहिती व कंपनी निर्मिती  संबंधी सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करीत असल्याचे डिक्लेरेशन. Form 32

संचालकांचे संमतीपत्र

मुखत्यार पत्र

अशी सर्व कागदपत्र पूर्तता झाली असे निबंधकाचे समाधान झाल्यास ३० दिवसाचे आत नोंदणी प्रमाण पत्र देण्यात येते. कंपनी ला सामायिक शिक्का असतो. कंपनीचे संचालक मंडळ किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा बाहेरील व्यक्तीची काम करण्या करीत निवड करते, याला पॉवर ऑफ अटर्णी किवा मुखत्यापत्र म्हणतात.

पॉवर ऑफ अटर्णी करिता कंपनी सेक्रेटरीची निवड करण्यात येते या करिता पॉवर ऑफ अटर्णी फार्म ,स्टॅम्प लाऊन व संचालकांची स्वाक्षरी घेऊन  दिला जातो.

यानंतर कमीत कमी दोन स्वाक्षरी असलेले बँक खाते.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा खर्च

५ लाख रुपयांचे भाग भांडवल असणार्‍या शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणी करिता खालील खर्च लागतो.

कंपनीचे नांव मिळण्या करिता अर्ज करन्याकरिता अर्ज शुल्क ५०० रुपये

Digital signature शुल्क २६०० रुपये.

MOA stamp duty ५०० रुपये

AOA stamp duty १००० रुपये

नोंदणी शुल्क १६००० रुपये

Form १ – ३०० रुपये

Form १८ – ३०० रुपये

From ३२ – ३०० रुपये

CS ची फी १०००० रुपये

Stamp conseletion ३०० रुपये

शपथपत्र / नोटरी फी ४५० रुपये

शेयर ट्रान्स्फर फी ५००० रुपये

एकूण अपेक्षित खर्च ३७५०० रुपये

याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनीला खालील प्रकारची नोंदणी करावी लागते.

Pan card व GST number

Shop and establishment act

Import export code

शेतकरी उत्पादक कंपनी खालील कामे करू शकते

भाग धारक शेतकर्‍यांना सेवा देणे
· लहान शेतकर्‍यांच्या संघाकडून बळकटीकरण
· नाबार्ड कडून विकास कार्यालय मदत मिळविणे
· अभ्यास दौरे ,प्रात्याक्षिके,पिक विमा , प्रशीक्षणे आयोजित करणे

· कृषि सेवा केंद्र ,सदस्यांना अवजारे भाड्याने देणे ,सदस्यांना कर्ज देणे बँक सेवा, प्रतवारी व मूल्य संवर्धन करणे,करार शेती, बाजाराची माहिती, तारण कर्ज , शेत मालाचे विक्री करिता एकत्रिकरण करणे, एस एफ ए सी कडून व्हेचर कॅपिटल , जे कंपनीच्या भांडवलाच्या ४०% असेल ते देणे इक्विटी कॅपिटल ग्रँट रु १०.०० लाख पर्यंत, एक कोटी रूपया पर्यात च्या कर्जकरिता बंकेला कर्ज हमी देणे,

या करिता भागधारकांची संख्या ५०० असणे, ३३.३३% शेतकरी ५ एकर पेक्षा कमी भूधारणा असणारे व कमीत कमी एक संचालक स्त्री असणे आवश्यक आहे .
· नाबार्ड कडून एस एफ ए सी ने हमी घेतल्यास एक कोटी रूपया पर्यत चे कर्ज मिळते .

1 thought on “शेतकरी उत्पादक कंपनी कशी सुरू करावी, Farmer Producer company 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: