शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर सोयाबीन बियाणे | Biyane anudan

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यासाठी 50 % अनुदान Biyane anudan 2022

Biyane anudan

मित्रांनो तुम्ही जर सातारा जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे.

Biyane anudan yojana 2022

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यासाठी 50 % अनुदान ( Biyane anudan) दिले जाणार आहे याच्यासाठी सातारा जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत एक महत्त्वपूर्ण अशी योजना राबवली जात आहे.

सातारा जिल्हा परिषद सेस फंड २०२२-२३ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, अपंग शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी व इतर शेतकऱ्यांना सोयाबीन आणि भाग इत्यादी पिकांच्या बियाण्यासाठी बियाण्याच्या किमतीच्या 50 % पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

हे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर ती क्रेडिट केले जाणार आहे.

याच्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून एक प्रस्ताव सादर करायचा आहे.

हा परिपूर्ण असा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाला सादर करायचा आहे. प्रस्ताव सादर केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन किंव्हा भात कुठल्याही एका बियाण्यासाठी 50 % पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडून गुणवत्तेसह बियाणे खरेदी केल्यानंतर या बियाण्याच्या बिलाची पावती पंचायत समितीला सादर करावे लागणार आहे.

आणि अशा प्रकारे पात्र झालेल्या व पावत्या सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावरती पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत 50% अनुदान क्रेडिट केले जाणार आहे.

या साठी चे लक्षांक मात्र अद्यापही सांगण्यात आलेले नाहीत परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशा आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आपण जर सातारा जिल्ह्यातील असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: