खते, बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची लूट, करा हे काम | fertilizer prices 2022

येत्या मान्सून च्या तोंडावर शासनाने खत, बियाण्यांचे दर ( fertilizer prices) निश्चित केलेल्या असताना शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी प्रशासन ही सज्ज झाले आहे.

कृषी विभागाचे खत, बियाणे खरेदी व दरा बाबत ( fertilizer prices) आवाहन.

Fertilizer prices

पक्या पावतीशिवाय बियाणे व खताची खरेदी करू नका.

खरीप हंगामास लवकरच प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांकडून बी- बियाणे व खते खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे.

हे बियाणे, खत खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातून खते, बियाणे व किटकनाशके खरेदीच्या वेळी रीतसर पक्की पावती घेऊनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खरीप हंगामात बनावट बियाणे, खते व  औषधाची जादा दराने  विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्या देखरेखी खाली पथक तयार करण्यात आली आहेत.

याचप्रमाणे तालुकास्तरावर देखील तालुका कृषि अधिकारी यांच्या देखरेखी खाली भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ही भरारी पथक जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर अचानक भेटी देऊन कृषी सेवा केंद्राची तपासणी करत आहेत.

ज्यात गेल्या तीन दिवसात सातारा, हिंगोली सह इतरही जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.

भरारी पथकाच्या या तपासणीच्या वेळी दुकानात बनावट कृषि निविष्ठा किंवा साठ्या मधील अनियमितता आढळून आल्यास कृषी विभाग कारवाई करणार आहे.

शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, औषधांसाठी अनुदान | Rashtriya Ann suraksha abhiyan 2022बियाणे, खते आणि किटकनाशकेबाबत काही तक्रार असल्यास जिल्हास्तरावरील कृषि विकास अधिकारी यांचे कार्यालयतील नियंत्रण कक्षात दूरध्वनीद्वारे किंवा लेखी तक्रार करावी.

टोल फ्री क्र. 18002334000

तसेच राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समिती येथे कृषि विभागा अंतर्गत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदीच्या वेळी काही तक्रार असल्यास ‍किंवा जादा दराने खत, बियाणे, कीटकनाशक विक्री कृषी सेवा केंद्रचालकाकडून होत असल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क करावा.

कोणतेही बियाणे, खते किंवा कीटकनाशके जादा दराने ( fertilizer prices) विक्री करताना आढळून आल्यास अशा कृषी सेवा केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येनार आहे.

तसेच पॅकिंगवर नमूद वजनाइतके बियाणे किंवा खत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी भरारी पथकात  वजन मापे निरीक्षकांचा समावेश असून वजनाची पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे खते किंवा कीटकनाशक खरेदी करताना कृषी सेवा केंद्राचा नोंदणी क्रमांक असलेली पक्की पावती घ्यावी.

दुकानदाराकडून शेतकऱ्यांनी खत, बियाणे, कीटकनाशक खरेदी करताना कच्ची पावती घेतल्यास वाढीव दराने बियाणे खरेदी केली असल्यास किंवा बियाणाची उगवण पेरणीनंतर कमी आल्यास याबाबतची शेतकऱ्यांना तक्रार करण्यास तसेच कृषी विभागास संबंधित बियाणे कंपनी किंवा कृषी केंद्रावर कारवाई करण्यास अडचणी येतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी रीतसर खरेदीची पक्की पावती घेऊनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

शेतकरी जागरूक झाल्यास नक्कीच या लुटीला चाप बसणार आहे.

संपर्क कक्ष क्रमांक

जळगाव जिल्हा 08468909641

जालना जिल्हा 9823915234

हिंगोली जिल्हा 9421490222

परभणी 9423542515

अकोला जिल्हा 07242420567

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: