Kharip vima 2020 थकीत पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करावा

Kharip vima 2020 rabbi pikvima2020

Kharip vima 2020 Claim

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये व विशेषकरून कोविड काळातील वेगवेगळ्या कारणांनी थकीत राहिलेला देय पीकविमा संबंधित विमा कंपन्यानी तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करावा अन्यथा होणाऱ्या कारवाईस तयार रहावे, असा इशारा आज झालेल्या बैठकीत दिला आहे.

या बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स, बजाज अलियांज, भारती एक्सा, रिलायन्स आदी विमा कंपन्यांचे अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते. कोविडच्या जागतिक आपत्तीच्या काळात कंपन्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून प्रलंबित ठेवलेले विमा देयके तातडीने अदा न केल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असे या बैठकीत स्पष्ट केले आहे.

राज्यात कमी पावसाने किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीस माझ्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच विविध संबंधित विभागांचे सचिव आदी उपस्थित होते.

प्रतिकूल हवामान व असंतुलित पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पीकविमा मिळणे गरजेचे आहे. विमा कंपन्यानी अत्यंत संवेदनशिलतेने व सकारात्मक भूमिका ठेऊन विमा वितरण निश्चित करावे व शेतकऱ्यांना वेळेत मदत करावी असे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. स्थानिक जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या ज्या विमा प्रस्तावांवर विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत, ते प्रस्ताव जिल्हाधिकऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा, असेही निर्देश देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: