KCC 2023 – किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम

राज्यात KCC 2023 – किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम सुरू

Kisan credit cards ( KCC ) for pm kisan beneficiary

KCC

देशात pm kisan च्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड ( KCC) देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला होता मात्र अद्याप ही बरेच शेतकरी या किसान क्रेडिट पासून वंचित आहेत, या लाभार्थ्यांना kisan credit card मिळवून देण्यासाठी एक नवीन मोहीम केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.

या मोहिमेचा रविवारी 01 ऑक्टोबर 2023 रोजी शुभारंभ सुरू होणार असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पिक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहिम राबविली जाणार आहे.

काय आहे नेमक हे किसान क्रेडिट कार्ड kisan credit card KCC

किसान क्रेडिट कार्ड kcc योजनेचा शुभारंभ ऑगस्ट १९९८ मध्ये आर. व्ही. गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार झाला. या योजनेची सुरुवात नाबार्ड बॅंकेद्वारे करण्यात आली.

पुढे सन २००४ मध्ये शेती व बिगर शेतीकामाच्या गुंतवणुकीच्या कर्ज आवश्यकतेनुसार ही योजना विस्तारित करण्यात आली. सन २०१२ मध्ये यात आणखी बदल करण्यात आले.

किसान कार्ड वापराची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 2014 मध्ये बँकांव्दारे इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

2019 च्या बजेट अधिवेशनामध्ये शेती सोबतच पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली. तर १८ डिसेंबर २०२० पासून सुधारित किसान क्रेडिट कार्ड योजना आणण्यात आली.

शेतकऱ्यांना मंजूर झालेले अल्प मुदतीचे पीककर्ज च्या रक्कमेची नोंद किसान क्रेडिट कार्डवर केली जाते. याच बरोबर कर्जदार तितक्या रक्कमेची खते, बी-बियाणे व अन्य गरजेच्या गोष्टींची खरेदी करू शकतो. शेतकऱ्याला ज्या वेळी गरज भासेल त्यावेळी बँकेत जाऊन रोख रक्कम काढता येते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेची उद्दिष्टे Features of Kisan Credit Card KCC

शेतकऱ्यांच्या शेतीविषयक व अन्य गरजांसाठी, एकाच खिडकीमधून सुलभ व लवचिक कार्य पद्धतीने पुरेसे व वेळच्या वेळी कर्जरक्कम उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे मुख्य उद्दिष्ट आहे.’

पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करणे. कापणी, कापणीनंतर व हंगामासाठी येणारा खर्च, पीक उत्पादना साठी विक्रीसाठी होणारा खर्च, शेतकऱ्यांचा घरखर्च, शेती साठी आवश्यक कृषी निगडित वस्तू खरेदीसाठी लागणार खर्च हे सर्व kcc मधून भागवले जाऊ शकत.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता eligibility for KCC

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

१ ) लाभार्थी व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी तसेच ७० वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. जर अर्जदार ६० वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल तर सोबत ६० पेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे.

२ ) जमीन स्वतच्या मालकीची असणारे (एकटे / संयुक्तपणे), मौखिक भाडे पट्टेदार, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या भाडे करार दार शेतकरी

३) शेतकऱ्याचे शेतात किमान ५००० किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे उत्पादन असावे.

४) शेतकरी PMKisan सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा.

किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्र required documents for KCC

लाभार्थ्याचे ओळख पुरावा ( Identity Proof ) – आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक कागदपत्र.

रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला

CSC केंद्रामध्ये ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत

शेतीचा सात बारा दाखला आणि आठ अ तीन महिन्याच्या आतील अद्यावत असावे.

बचत खाते बँक पासबुक प्रत

पासपोर्ट आकाराचे तीन फोटो

अन्य बँकेतून कर्ज न घेतल्या बाबतचे स्वप्रतिज्ञापत्र

आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक.

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे

KCC मधून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके, इ. शेतीच्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी कर्ज दिले जाते.

शेतकऱ्यांना शेती सोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन अशे जोड धांधे करण्यास किसान क्रेडिट कार्ड चा लाभ घेता येतो.

कोणत्याही वेळी ठराविक कालवधीसाठी कर्ज मिळते.

Kcc अंतर्गत १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी जमिनी तारण गरज नाही.

किसान क्रेडिट कार्ड हे ATM मध्ये वापरता येते. आठवड्याचे सातही दिवस, २४ तास कधीही एटीएममधून पैसे काढता येतात. त्यामुळे बँकेत जाण्याचा वेळ वाचतो.

KCC अंतर्गत बँकेतून रोख रक्कमही काढता येते तर २५००० पेक्षा जास्त पत मर्यादा असणाऱ्यासाठी चेकबुकची सुविधा उपलब्ध केली जाते.

शेतकरी किसान क्रेडिट कार्ड केवळ शेती कामासाठी नव्हे तर वैयक्तिक आर्थिक अडचणीतही या कार्ड वापरू शकतात.

पिकांच्या उत्‍पन्नावर तसेच लागवडीखालील क्षेत्रावर आधारित कर्जाची मर्यादा (सीमा) ठरवली जाते. शेतकरी कर्जाची परतफेड हंगामानंतर मिळणाऱ्या उत्पन्नातून करू शकतात.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण दिलं जाते, तसेच इतर धोक्यांसाठी २५ हजार रुपयांचं विमा संरक्षण दिले जाते.

किसान क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा

किसान क्रेडिट कार्ड हे एटीएम मध्ये वापरता येणारे RuPay कार्ड, चेकने व्यवहार तसेच शाखेमार्फत व्यवहार करता येतात.

विविध शेतकरी उत्पादक कंपन्या किंव्हा शेती शी निगडित व्यावसायिक, खते, कीडनाशके व बी-बियाणे वितरकांकडे असलेल्या पीओएस (Point of Sale) माध्यमातून वापरता येते.

KCC वर १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जाते, तर ३ लाख रुपयांपेक्षा जास्तच्या कर्जासाठी तारण ठेवणं गरजेचे आहे. KCC अंतर्गत ७ टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु, लाभार्थी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल. तर व्याजदरात पूर्ण सवलत दिली जाते. अर्थात बिनव्याजी कर्ज मिळते.

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे

शेतकरी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज आपले सरकार सेवा केंद्रामध्ये / कॉमन सर्व्हिस सेंटर CsC मधून भरू शकता.

VDO येथे पहा

👇

https://youtu.be/gcuIuFO3i3c

फॉर्म भरल्यावर मिळालेली पावती कागदपत्रांच्या सोबत जोडून बँकेमध्ये जमा करावे.

KCC arj namuna किसान क्रेडिट कार्ड अर्ज नमुना

Kcc Maharashtra २०२२

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत राज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटपाकरीता विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (PM kisan ) योजनेचा लाभ मिळणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे अभियान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सुरू असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) वाटपासाठी देशभरात मोहीम स्वरूपात राबवले जाणार आहे.

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेत शासनाचे कृषी, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य संवर्धन विभाग, नाबार्ड आणि सर्व बँका सहभागी होणार आहेत.

राज्यभर ही मोहीम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे.

राज्यातील सर्व बँका त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये केसीसी ( KCC ) अर्ज उपलब्ध करून देतील व शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून केसीसी स्वरूपात पीककर्ज वाटप करतील.

या मोहिमेतर्गत सर्व शेतकऱ्यांनी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

What is KCC – watch here

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: