कुसुम सोलर पंप ( kusum solar ) योजनेचा ( kusum mahaurja ) नवीन अर्ज करू इच्छिणाऱ्या व पैशाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना महाऊर्जा ( Mahaurja ) चा सावधानतेचा इशारा.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कुसुम कृषी सौर पंप (MNRE PM-KUSUM ) योजना राबवत आहे,
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत कृषीपंपांना सौरऊर्जेवर आधारित विद्युतीकरण देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी शासन वेळोवेळी प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गतच शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्या सौर उर्जेवर करण्याचे काम केले जात आहे.
त्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला अर्थात प्रधानमंत्री कुसुम योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध आहेत. सौर कृषीपंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पूर्ण करण्यात येणार आहे.
त्यासाठी महाऊर्जामार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. १७ मे पासून नवीन अर्ज स्विकारणे सुरु आहे.
शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या लिंकवर जाऊन अर्ज करावा.
kusum Mahaurja Warns on Kusum solar new application
प्रधानमंत्री कुसुम सौर ( pm kusum scheme ) योजनेच्या नावाखाली सौर पंपा साठी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महाऊर्जा कडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन.
प्रधानमंत्री कुसुम सोलर साठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर कुसुम योजनेच्या संबंधातील फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेल मध्ये तक्रारी केल्या आहेत.
त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल application तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज ( kusum solar online application ) करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा ( kusum mahaurja payment ) करण्यास सांगितले जात आहे.
अशा खोट्या संकेतस्थळासह मोबाईल ॲपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभनाला बळी पडू नका, अशा संकेतस्थळावर, ॲप वर ऑनलाईन पद्धतीने पैसे भरु नका, असे आवाहन महाउर्जा महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शासनाच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी.
योजनेची सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती याबाबत www.mahaurja.com या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. बनावट संकेतस्थळाचा वापर करु नये.
ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करतांना अडचणी असल्यास ०२०-३५०००४५६/०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.
At. Post. Khadkwadi
Tal. Parner
Dist. Ahmednagar
Pin. 414304
State. Maharastra
सर्जी मेने कुसुम सोलर पंप के लिये आर्ज कियथा मगर मिला न्ही