Gaothan Expansion – गावठाण लगतच्या जमिनीला NA करण्याची गरज नाही!
Table of Contents
महसूल विभागाचे परिपत्रक जारी, सर्व तहसील कार्यालयांना सूचना
राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक १३ एप्रिल २०२२ रोजी काढण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Gaothan expansion संदर्भातील या परिपत्रकानुसार गावठाण हद्दी पासून दोनशे मीटरच्या आतील ज्या जमिनी आहेत आशा जमीन मालकांना बिनशेती जमीन वापरासाठी आता NA ची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही.
या अनुषंगाने ही ( Gaothan Expansion )प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने महसूल विभागाचे सह सचिव श्रियुक्त रमेश चव्हाण यांनी एक परिपत्रक काढून यासंधर्भात सूचना निर्गमित केल्या आहेत.
महाराष्ट्र सन २०१७ मध्ये जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 मध्ये ब क आणि ड हे कलम समाविष्ट केल्यानंतर NA करण्याच्या परवानगीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
यातील जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४२ ‘ड’नुसार निवासी प्रयोजनासाठी, वानिजीक, औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन कोणत्याही गावाचे गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या आत स्थित क्षेत्रात किंवा नगर किंवा शहर यांच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात स्थित असलेली कोणतीही जमीन अशा क्षेत्रात लागू असलेल्या विकास नियंत्रणाच्या तरतुदीच्या आधीन राहून, निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारुप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेनुसार मान्यताप्राप्त प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रूपांतरित केल्याचे मानण्यात येईल.
( Gaothan Expansion )या क्षेत्रातील जमिनी करिता जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये सुधारणा केल्यामुळे स्वतंत्ररीत्या अकृषिक ( agriculture land na ) परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
कलम ४२ ‘ड’मधील तरतुदीनुसार त्या जागे करिता रक्कम भरल्याचे चलन किंवा रूपांतरणकर, अकृषिक आकारणी व नजराणा व इतर शासकीय देणी याबाबतचा भरणा केल्याची पावती दिल्यानंतर तहसीलदार कार्यालय कडून एक सनद दिली जाईल, आणि ही सनद अकृषिक वापरामध्ये ती जमीन रूपांतरित केल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
Gaothan expansion परिपत्रक
Gaothan expansion च्या या परिपत्रकानुसार महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२(ब), ४२(क) व ४२(ड) या नियमन्वये केलेल्या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एक सारखे कार्यपद्धती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व महसुली प्रधान अधिकारी व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
या परिपत्रकातील पहिल्या सुचने नुसार
१) महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२(ब), ४२(क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारित तरतुदीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांणि अंतिम विकास योजना/ प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारुप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम १२२ खालील घोषित हदीपासून २०० मीटरचा परिधीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इ. अकृषिक स्वरूपाच्या वापर विभागात (झोन निहाय) ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे गट नंबर / स.न. दर्शविणा याद्या तयार तयार करण्यात याव्यात. तसेच, सदर यादीतील पूर्वीचे जे ग. नं./ स.न. अलहिदा अकृषिक झालेले आहेत ते वगळून उर्वरीत जमिनीच्या स. न./ ग. नं. ची यादी व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तयार करावी अशी सूचना देण्यात आली आहे.
यानंतर यानुसार, संबंधित जमीन धारकांना मानव अकृषीक वापराच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी व व रुपांतरण करण्याबाबतचे चलन पाठवावे यादी तयार करताना ज्या भोगवटदार जमिनी वर्ग २ (Bhogvatdar varg 2 ) आहेत त्या जमीनीच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतली आहे की नाही याची तपासणी करावी प्रकरणी शासनाचा नजराना भरलेला आहे की नाही याची खात्री करावी आणि जर जमिनी वर्ग दोन च्या असतील तर त्या जमिनीचा जो नजराना असेल तो त्या शेतकऱ्याला भरण्यासाठी सांगावे अशे निर्देश देण्यात आले आहेत.
याच प्रमाणे ज्या जमिनी संदर्भात विविध न्यायालयात वाद सुरू आहेत अशा भूधारकांना नोटीस काढण्यात येऊ नये प्रत्यक्षात तलाठी यांनी गावी सदर मिळकतीचे स्थळ निरीक्षण करूनच या नोटीस काढण्यात यावेत, अशा सूचना ही यात देण्यात आल्या आहेत.
एकंदरीत या परिपत्रक नुसार गावठाणाच्या कलम 122 खालील घोषित हद्दीपासून दोनशे मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी वाणिज्य व जे इतर अकृषिक स्वरूपाच्या वापर विभागात ज्या बिनशेती न झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनींना अकृषिक आकारणी च्या आदेश लागू करण्यापुरते हे ( Gaothan Expansion )पत्रक मर्यादित आहे इतर बाबतीत शासनाचे प्रचलित आदेश या ठिकाणी लागू राहतील अशे ही नमूद करण्यात आले आहे.
Gaothan expension अंतर्गत या जमिनीच्या वापराचा परवाना घेण्यासाठी भरावे लागणार कर
उद्दहरणार्थ मौजे रामनगर, ता. पुणे, जि. पुणे येथील सर्व्हे नंबर १००, क्षेत्र ०.१० हे. आर साठी रामराव पाटील यांना अकृषिक वापराचा परवाना घ्यायचा आहे. ते भोगवटादार वर्ग-१ खातेदार आहेत.
महसूल कायदयातील तरतुदीनुसार वर्ग १ मधील गावांसाठी प्रचलित अकृषीक आकारणीचा दर ०.१० पैसे प्रति चौ. मीटर तर वर्ग २ गावासाठी ०.०५ प्रति चौ. मीटर असा आहे.
आता वरील मिळकतीच्या अकृषिक आकारणीची गणना केली तर ती खालील प्रमाणे होईल.
०.१० हे.आर = १००० चौरस मीटर
१००० चौरस मिटर गुणिले अकृषिक आकारणीचा दर ०.१० पैसे = १०० रुपये इतका आकार होईल
आकार + स्थानिक उपकर = वार्षिक आकारणी यामध्ये ऐन + सातपट जि.प. उपकर + ऐन = ग्रा.प.उपकर होतो.
रु. १०० + रु.७०० + रु. १०० = रु. ९०० वार्षिक आकारणी
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४७ अ नुसार परिवर्तन कर / रुपांतरण कर हा आकारणीच्या पाचपटी पर्यंत आकाराला जातो अर्थात रु. १०० x ५ = रु. ५०० इतका हा कर होईल.
यानुसार आपनास ०.१० हे. आर अर्थात १००० चौरस मीटरसाठी क्षेत्रासाठी एकूण रु. ९०० वार्षीक आकारणी + रु. ५०० परिर्वतन कर / रुपांतरण कर अशे एकूण रु. १४०० कर स्वरूपात निश्चित करण्यात येतील.
हा कर याचबरोबर इतर काही सरकारी बाकी किंव्हा कर असतील तर ते कर भरून त्याची पावती विहित नमुन्यातील अर्ज सोबत सादर केल्यास आपणास तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून एक सनद दिली जाईल.
अर्ज नमुना PDF Gaothan expansion scheme application PDF
अर्ज नमुण्यासाठी येथे क्लिक करा
- शेतमजूरांना मिळणार शेतजमीन 100 टक्के अनुदान योजना || jamin kharedi anudan yojna maharashtra
- विद्यार्थ्यांना आधारकार्ड प्रमाणे ‘APAAR ID’, काय आहे अपार कार्ड