युवकांसाठी आर्मी भरती, राज्यात Agnipath yojana भरती मेळावे | Agniveer

महाराष्ट्रातील तरुणांना आर्मीत भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याची संधी, Agnipath yojana अंतर्गत होणार भरती मेळावे.

जाणून घेऊयात कुठे असतील हे मेळावे, काय आहेत उमेदवारासाठी अटी, पात्रता, अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती.

Agnipath yojana

Agnipath yojana 2022 Army Recruitment rally Maharashtra

देशातील तरुणांना, युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने अग्निपथ योजना ( Agnipath yojana ) अमलात आणली आहे.

आणि याच योजनेअंतर्गत महाराष्ट्रात तीन भरती मेळावे ( Army Recruitment rally Maharashtra ) आयोजित करण्यात आले आहेत.

1) 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

2) मुंबईच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे लष्करातील भर्तीसाठी ( Army Recruitment Rally 2022 ) ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कौसा व्हॅली संकुलातील माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे 20 सप्टेंबर  ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

3) पुणे सैन्य भरती कार्यालया मार्फत दिनांक 23 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे व सोलापूर या सहा जिल्ह्यातील नवयुवकांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळावा राहुरी (अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केलेला आहे.

या होणाऱ्या भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कर्नल प्रविण कुमार एस यांनी केले आहे.

Agniveer Yojana Recruitment Details

भरती बाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 या तारखेस अनुसरुन निश्चित केले जाईल. यासाठी

भरती साठी उमेदवाराला www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. यासाठी 1 ते 31 जुलै हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

या भरती मेळाव्यात अग्निवीर सामान्य सेवा, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक,अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण) Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer Tradesman (10th Pass) तर अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण) Agniveer Tradesman (8th Pass) या पदासाठी अर्ज करता येतील.

Online पद्धतीने आपली नोंदणी केलेल्या उमेदवारांना 7 ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीत भरती प्रक्रिया साठीचे प्रवेशपत्र मिळतील.

राहुरी जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या मेळाव्यात लातूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर
जिल्ह्यातील युवक भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.

औरंगाबाद येथे होणाऱ्या भरती मेळाव्यात नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यातील उमेदवार या भरतीत सहभाग घेवू शकतात.

तर ठाणे – मुब्रा येथे होणाऱ्या भरतीत पुढील आठ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

1.मुंबई शहर,

2.मुंबई उपनगर,

3.नाशिक,

4.रायगड,

5.पालघर,

6.ठाणे,

7.नंदुरबार

8.धुळे

उमदेवारांची पात्रता याप्रमाणे आहे

Agniveer General Duty Recruitment

अग्नीवीर सामान्य कर्तव्य सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्षे अशी आहे.

उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 77/82 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता दहावीत 45 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेला असावा.

वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या प्राध्यान्य देण्यात येईल.

Agniveer Technical Recruitment

अग्निवीर तांत्रीक सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील.

उमेदवाराची उंची 167 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता 10+2/ इंटरमिजिएट परिक्षा उत्तीर्ण असावा.

विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयात किमान एकुण 50 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असावेत.

Agniveer Clerk/ Store Keeper Technical Recruitment

अग्निवीर क्लार्क/स्टोअर किपर तांत्रीक सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील.

उमेदवाराची उंची 162 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 77/82 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता 10+2/ इंटरमिजिएट परीक्षा (कला, वाणिज्य, विज्ञान) यामध्ये 60 टक्के गुण असावेत.

तसेच प्रत्येक विषयात 50 टक्के गुण आणि इंग्रजी व गणित, अकाऊंट, बुक किंपीग विषयात 50 टक्के गुण असावेत.

Agniveer Trades man Recruitment

अग्निवीर यांत्रिकी (सर्व शाखा) 10 वी उत्तीर्ण आचारी, टेलर, ड्रेसर, व्यवस्थापक, स्वच्छक, मदतनीस आदी पदासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील.

उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 48 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

Agniveer Tradesman recruitment

अग्निवीर यांत्रिकी (सर्वशाखा) 8 वी उत्तीर्ण या हाऊस किपर आणि मेस किपर या पदासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील.

उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 48 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार हा आठवी उत्तीर्ण असावा.

अर्ज कसा करावा ?  How To Apply Agnipath Scheme

इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या  www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.

प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येईल. बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना सत्यापित केले जाईल आणि प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल.

भर्तीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या होतील – शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा – सीईई). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2022 मध्ये होणारी लेखी परीक्षा द्यावी लागेल. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.

https://youtu.be/CaGoE0fAcNk

या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित फोटोप्रती आणि अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार रीतसर नोटरी केलेले अनिवार्य प्रतिज्ञापत्र सोबत आणावेत. उमेदवारांनी स्वहितासाठी त्यांनी केलेल्या मूलभूत वैद्यकीय पूर्व-परीक्षणाची प्रत सोबत बाळगावी. या सर्व गोष्टींमुळे युवकांचा मेळाव्यातील अधिक सुरळीत सहभाग शक्य होईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील मेळाव्यातील कार्ये अधिक उत्तम प्रकारे पार पाडता येतील.

ही संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत न्याय्य, पारदर्शक, मुक्त आणि स्वयंचलित पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशा प्रकारे कोणी दलाल अथवा मध्यस्थ आला असेल तर ही घटना त्वरित लष्करी अधिकारी किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांनी   

www.joinindianarmy.nic.in 

या संकेतस्थळावर लॉगीन करावे अथवा 022-22153510 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: