अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% आगाऊ Akola agrim pikvima 2023, खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना अकोला जिल्ह्यासाठी लागू
Akola agrim pikvima 2023
अकोला जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2023 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Akola agrim pikvima 2023 Mid-Season Adversity) अधिसुचना लागु करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, पुर, कीड रोग, पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले होते.
हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ / महसूल मंडळ गट / • तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहेव परिच्छेद क्र. 11.1 अन्वये सदरची अधिसूचना जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांचेमार्फत निर्गमित करण्यात येते.
सदरची Akola agrim pikvima 2023 Mid-Season Adversity अधिसूचना निर्गमित करताना खालील प्रातिनिधीक सूचकांच्या (Proxy Indicator) आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसुचित पीकांकरीता अधिसूचना निर्गमित करणेबाबत तरतूद आहे. प्रातिनिधीक सूचक पुढीलप्रमाणे.
- 1 तीव्र दुष्काळ स्थिती (दुष्काळ संहिता 2016 नुसार)
- 2 पावसातील 3-4 आठवडयापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण.
- 3 तापमानातील असाधारण घट/वाढ ( दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्केपेक्षा जास्त तफावत ).
- 4 पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण ( दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्केपेक्षा जास्त तफावत ).
- 5. मोठ्या प्रमाणात किड रोग यांचा पिकांवरील प्रादुर्भाव (पिक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव ),
- 6. इतर नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामुळे एकूण पिक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास.
अशा परस्थितीमध्ये जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या Akola agrim pikvima 2023 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत मोठी मागणी केली जात होती.
जिल्ह्यात अकोट तालुक्यात उमरा, अकोट, मुंडगाव, पनाज, चोहटा, कुटासा, आसेगाव, अकोलखेड मंडलांचा समावेश आहे.
तेल्हारामध्ये माळेगाव, पाथर्डी, तेल्हारा, हीवरखेड, आडगाव, पंचगव्हान मंडलांचा समावेश आहे.
बाळापूर तालुक्यात बाळापूर, उरळ, निंबा, हातरुण, पारस, व्याळा, वाडेगाव अशा मंडलांचा समावेश आहे.
पातूर तालुक्यात पातूर, बाभुळगाव, आळेगाव, चाणी, सस्ती अशा मंडलांचा समावेश आहे.
अकोला तालुक्यात घुसर, बोरगाव, पळसो बढे, सांगळूद, कुरणखेड, दहीहंडा, कापशी, उगावा, आगर, शिवानी, कौलखेड अशा मंडलांचा समावेश आहे.
बार्शीटाकळी तालुक्यात धाबा, बार्शीटाकळी, महान, रजंडा, पिंजर, खेरडा अशा मंडलांचा समावेश आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात मूर्तिजापूर, हदगाव, निंबा, माना, शेलू , लाखापुरी, कुरुम, आणि जामठी अशा मंडलांचा समावेश आहे.
विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निमा अरोरा अकोला यांनी ही kapus vima 2023 करिता अधिसुचना लागु केली आहे.
अकोला जिल्हयात १ जुलै ते ३०ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे कापूस व तूर नुकसान दिसून आल्याने जिल्ह समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 % मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.
यामध्ये दुष्काळ संहिता 2016 नुसार, पावसातील तीन ते चार आठवड्यापेक्षा जास्त खंड असल्याने, पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट, वाढ, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पेक्षा जास्त तफावत, मोठ्या प्रमाणात कीड रोग यांचा पिकावरील प्रादुर्भाव, पीक पेर क्षेत्रांच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रदुरुभाव, इतर नैसर्गिक आपत्तीपूर्व परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास अशा बाबींचा समावेश होतो.
वरील बाबी करिता शासकीय यंत्रणांचा अहवाल पीक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञानाचे अहवाल वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र प्रसिद्ध बातमी व प्रत्यक्ष पीक परिस्थितीच्या सर्वेक्षण इत्यादींच्या आधारे, राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणेनुसार अपेक्षित उत्पादन हे त्या पिकांच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा कमी असल्याने निर्देशनास आल्यामुळे नुकसान भरपाई पात्र असल्याचे ग्राह्य धरण्यात आले आहे.
या नियमानुसार समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार अकोला जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी यांनी कापूस व तूर या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे.
त्यामुळे या अधिसूचने द्वारे शासन निर्णय क्र दिनांक १ जुलै 2022 अन्वये व उपरोक्त संदर्भ क्रमांक चारच्या बैठकीतील चर्चा नुसार व प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार खालील नमूद केलेल्या अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम धारक शेतकऱ्यांना देण्यासाठी विमा कंपनी यांना आदेशित करण्यात येत आहे.