खरीप पिकांसाठी राज्यात प्रधानमंञी पीक विमा योजना ” बीड पॅटर्न ” ( beed model pikvima yojana 2022 Maharashtra )

सन 2022-23 पासून शासनाने राज्यात बीड पॅटर्न नुसार पीक विमा ( beed model pikvima yojana 2022 ) योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.
सन 2022-23 साठी शासनाने 80:110 या बीड पॅटर्ननुसार राज्यात प्रधानमंञी पिक विमा योजना ( PMFBY ) लागू असून या मध्ये जर पिकांचे नुकसान झाले नाही तर कंपनीस सेवा म्हणून एकूण विमा हप्त्याच्या 20 टक्के रक्कम देण्यात येईल व उर्वरित रक्कम कंपनी राज्यशासनाकडे परत करणार आहे. जर पिकांचे नुकसान झाले तर कंपनी जमा विमा हप्त्याच्या 110 टक्के पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम देईल व उर्वरित नुकसान भरपाई ची रक्कम राज्यशासन देणार आहे.
PMFBY या योजनेअंतर्गत सन 2022-23 च्या खरीप हंगामात विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 ही आहे.
beed model pikvima yojana – योजनेची महत्वाची उद्दिष्टे
- नैसर्गिक आपत्ती , कीड, आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण देणे.
- शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंञज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- कृषि क्षेञासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे,
- जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण यातून कृषि क्षेञाचा गतिमान विकास व वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
अशी काही महत्वाची उद्दिष्ट घेऊन हि योजना राबवली जात आहे.
beed model pikvima yojana – योजनेची महत्वाची वैशिष्टे
- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही beed model pikvima योजना ऐच्छिक आहे.
- शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के रब्बी हंगाम 1.5 व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
- Beed model pikvima या योजनेअंतर्गत 70 टक्के जोखिमस्तर देय राहील.
- अधिसूचित क्षेञातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील 7 वर्षातील जास्त उत्पन्नाचे 5वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचाराता घेऊन निश्चित केले जाईल.
योजनेत सहभागी न होणारे शेतकरी
जे शेतकरी विविध बँकाकडून पीक कर्ज घेतात मात्र त्यांना या पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं नसेल अशा शेतकऱ्यांनी विमा pik vima भरण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस पूर्वी आपण कर्ज घेतलेल्या पिकांसाठी योजनेत सहभागी होणार नाहीत असे लेखी न दिल्यास वित्तीय संस्थेकडून विमा हप्ता कर्ज खात्याकडून वजा केल्या जाईल.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना पूर्णपणे ऐच्छिक राहील.
विमा संरक्षणा साठी समाविष्ट बाबी
पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे , गारपीट चक्रीवादळ, पूर ,भुस्खलन, दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इ. मुळे पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल.
1- प्रतिकुल हवामान परिस्थितीमुळे पेरणी/लावणी उगवन न होणे.
अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेञात व्यापक प्रमाणावर (75 टक्क्यांपेक्षा जास्त ) पेरणी/लावणी न झालेल्या क्षेञासाठी एकुण विमा संरक्षित रक्कमेच्या 25 % विमा pik vima संरक्षण देय राहिल.
2- स्थानिक नैसर्गिक आपत्ती
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/ काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास सदरची माहिती कर्जदार शेतकऱ्याने 48 तासांत व बिगर कर्जदार शेतकऱ्याने 72 तासांत संबंधित बँक /वित्तीय संस्था/विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे.
3- हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान (Mid Season Adversity )
हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मुळे माञ काढणीच्या 15 दिवस आधी पर्यंत पूर, पावसातील खंड इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट असेल तर विमा संरक्षण मिळते.
4- काढणी पश्चात नुकसान post harvesting
चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/ काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
सदरचे नुकसान पिकाची काढणी / कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पाञ राहील.
5- सरासरी उत्पनांवर ( उंबरठा उत्पनावर ) आधारीत नुकसान
पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आलेल्या सरासरीनुसार जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
ई-पिक पाहणी ( e pik pahani ) अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावता असल्यास ई- पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम ग्रहित धरण्यात येईल.
यासाठी राज्यात खालीलप्रमाने जिल्हा निहाय पीक विमा कंपनी मार्फत विमा योजना राबवली जाणार.
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एच डी एफ सी अर्गो इन्शुरन्स कंपनी असणार आहे.
सोलापूर, जळगाव, सातारा, औंरगाबाद, भंडारा,पालघर,रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी असणार आहे.
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्यासाठी आयसी आयसी आय लोंबार्ड कंपनी असणार आहे.
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया ही कंपनी असणार आहे.
तर बीड जिल्ह्यासाठी बजाज अलायंज या कंपनीच्या माध्यमातून ही पीक वीमा योजना राबवली जाणार आहे.
पिक कापणी प्रयोग आयोजित करणे तसेच पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंञज्ञान उदा. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी ( R.S.T.), स्मार्टफोन इ. चा वापर करणे तसेच उपग्रह छायाचिञ, एम. एन. एफ . सी. चे अहवाल व ड्रोन या बाबींचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सर्व यंञणातील कर्मचाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग करतांना अॅप वापर करणे बंधनकारक आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 जुलै 2022 या अंतिम मुदतीच्या आत आपल्या पिकांचा विमा भरावा.अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या संबंधित कृषि सहाय्य्क, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा व मोठ्या संख्येनी योजनेस सहभागी होऊन नैसर्गिक आपत्ती पासुन संरक्षण कवच मिळवावे.