sharad pawar gram samrudhi yojana 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध योजनांच्या अभिसरणातून राबविली जाणारी राज्य योजना

gram samrudhi yojana 2023
sharad pawar gram samrudhi yojana

Sharad Pawar gram samrudhi yojana 2023 उद्देश

ग्रामीण भागातील गोर गरीब , गरजू पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

ग्रामीण भागात पुरेशा कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे

गाई गोठा , शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड या कामांसाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध (लखपती) होतील, असा योजनेचा उद्देश आहे.

Sharad Pawar gram samrudhi yojana 2023 योजनेत कोणती कामे घेता येतात.

 1. गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गाई गोठा बांधणे  gai gotha yojana
 2. शेळी पालन शेड बांधणे
 3. कुक्कुटपालन शेड बांधणे
 4. भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गाई गोठा बांधकाम Gai Gotha yojana

या बाबी अंतर्गत दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे, तर सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गाई गोठा बांधकाम या कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असावी,  वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे असतील अशे पात्र लाभार्थी अनुदानासाठी पात्र असतात.

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम कामाला नियोजन विभागाच्या दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मधील अनु क्रमांक ७५ नुसार मनरेगा अंतर्गत ७७ हजार १८८ रु. इतका अंदाजित खर्च ग्राह्य धरला जातो.

मात्र gram samrudhi yojana 2023 या योजनेअंतर्गत या शासन परिपत्रकातील सहा गुरांसाठी ची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे करिता एक  गोटा त्यानंतरच्या अधिकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट  तर १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.

 गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टगिंग करणे हे या योजनेतआवश्यक आहे.

gram samrudhi yojana 2023 गाय गोटा अनुदान योजना महाराष्ट्र 2023
 • 2 ते 6 गुरांसाठी एक गाई गोठा – रु.77188/-
 • 6 पेक्षा जास्त गुरे असतील तर दोन गोठेसाठी – रु. 154376/-
 • 12 पेक्षा जास्त गुरे असतील तर तीन गोठ्यांसाठी- रु. 231564/-
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गाई गोठा बांधकाम आकारमान

गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी 6 जनावरां करीता 26.95 चौ.मी. 

गोठा लांबी- 7.7 मी. आणि रुंदी- 3.5 मी.

गव्हाण- 7.7 मी x 0.2 मी. X 0.65 मी.

250 ली.क्षमतेचे मुत्रसंचय टाके

जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 ली.क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी.

शेळीपालन शेड बांधकाम – Sheli palan shed anudan

gram samrudhi yojana 2023 या योजनेअंतर्गत १० शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाते. तर २० शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अशे अनुदान दिले जाते.  मात्र अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर या योजनेअंतर्गत किमान दोन शेळ्या असणे लाभार्थी म्हणून पात्रते साठी आवश्यक आहे.

या बाबीचा लाभ मिळण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतात. तर या योजनेत भूमिहीन शेती नसलेल्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येते.

शेळीपालन शेड बांधकाम Sheli palan shed anudan

शेळीपालन शेड बांधकाम – Sheli palan shed anudan बांधकाम कामाला नियोजन विभागाच्या दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मधील अनु क्रमांक ७५ नुसार मनरेगा अंतर्गत ४९ हजार २८४ रु. इतका अंदाजित खर्च ग्राह्य धरला जातो.

 • 2 ते 10 शेळ्यांसाठी एक शेड – रु.49284/-
 • 20 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर दोन शेडसाठी – रु. 98568/-
 • 30 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर तीन शेडसाठी- रु. 147852/-
शेळी पालन शेड बांधकाम आकारमान

10 शेळ्यांसाठी 7.50 चौ.मी. ( लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.)

कुक्कुटपालन शेड बांधकाम Kukkutpalan shed bandhkam anudan

या बाबी अंतर्गत 100 पक्ष्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे, तर 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे.

मात्र जर एखाद्या लाभार्थ्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मधील अनु क्रमांक ७७ नुसार नरेगा अंतर्गत ४९ हजार ७६० रु. इतका अंदाजित खर्च येईल.

कुक्कुटपालन शेड बांधकाम Kukut palan shed anudan
 • 100 पक्ष्यांसाठी एक शेड रु. 49760/-
 • 150पेक्षा जास्त पक्षांसाठी दोन शेड साठी- रु. 99520/-
कुक्कुटपालन शेड बांधकाम आकारमान

100 पक्षांकरीता 7.50 चौ.मी. (लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.)

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग साठी जमिनी वरील बांधकाम 3.6 मी. x 1.5 मी. x 0.9 मी.

Sharad pawar gram samrudhi yojana Application Form

Application Form PDF

2 thoughts on “गाई गोठा, शेळी पालन, कुकुटपालन शेड साठी अनुदान – gram samrudhi yojana 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: