विद्यार्थ्यांना आधारकार्ड प्रमाणे ‘APAAR ID’, काय आहे अपार कार्ड

आधारकार्डप्रमाणे विद्यार्थ्याला मिळणार ‘APAAR ID’; नेमका फायदा काय, काय आहे अपार कार्ड

APAAR ID

APAAR ID One Nation One Education

देशातील शिक्षण प्रणालीत बदल करण्याच्या दिशेने केंद्र शासनाने उचललले हे एक महत्वाचे पाऊल आहे. देश भरात केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘एक देश एक स्टूडेंट आयडी’ ( One Nation One Education )प्रकल्प राबवला जात आहे.

What Is The APAAR card

ऑटोमेटेड परमनंट अकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री अर्थात APAAR असं या प्रकल्पाचे नाव आहे. या मोहिमेत देश भरातील विद्यार्थ्यांना एक अपार कार्ड नावाचं ओळखपत्र दिले जाणार आहे. अगदी आधारप्रमाणे असणार हे 12 अंकी ओळखपत्र असणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल माध्यमातून स्टोअर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपले खाते मॅनेज करण्यास आणि एक्सेस करण्यास मदत मिळणार आहे. Apaar card च्या डाटा मध्ये विद्यार्थ्याचे स्कोअर कार्ड, मार्कशीट, ग्रेडशीट, डिग्री, डिप्लोमा, अशा सर्व सर्टिफिकेटचा समावेश असणार आहे.

ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळ आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करणे, विद्यार्थी डेटाचे उत्तम व्यवस्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षम करणे, वैयक्तीक आणि पारदर्शक शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करणे अशी अनेक उद्दिष्ट या अपार कार्ड प्रकल्पाची आहेत.

अपार आयडी शैक्षणिक रिकॉर्ड ठेवण्याचे एक माध्यम आहे. अपारने ( Apaar card ) मॅप केलेल्या सुविधांमुळे प्रवेश, स्कॉलरशिप, सवलती, क्रेडिट संचय, एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर, इंटर्नशिप, सर्टिफिकेट, नौकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रिकॉर्डचे व्हेरिफिकेशन करता येते.

Documents Required for Apaar Card

विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधारनुसार नाव, आधार क्रमांक.

Benefits Of Appar Card

अपार आयडी शैक्षणिक रिकॉर्ड ठेवण्याचे एक माध्यम आहे. अपारने मॅप केलेल्या सुविधांमुळे प्रवेश, स्कॉलरशिप, सवलती, क्रेडिट संचय, एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर, इंटर्नशिप, सर्टिफिकेट, नौकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रिकॉर्डचे व्हेरिफिकेशन करता येते.

For APAAR Registration visit

विद्यार्थ्यांनी अपार आयडी मिळवण्यासाठी apaar.education.gov.in या वेबसाईटवर जावे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *