शेतमजूरांना मिळणार शेतजमीन 100 टक्के अनुदान योजना || jamin kharedi anudan yojna maharashtra

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना( jamin kharedi anudan yojna maharashtra ) ;भूमिहीन अनु.जाती व नवबौध्द शेतमजूरांना मिळणार शेतजमीन

jamin kharedi anudan yojna maharashtra

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

dadasaheb gaikwad sabalikaran yojana GR ( jamin kharedi anudan yojna maharashtra )

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमीनीचे वाटप करण्याकरिता सन 2022-23 या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी खर्च करण्यासाठी मान्यता देणेबाबत.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला असून आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 100 % अनुदान GR

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना खरेदी करावयाच्या जमिनींच्या किंमतीबाबत व मार्गदर्शक तत्वे विहित करणेबाबत

या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुर, विधवा महिला, परितक्त्या महिला, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे राहणीमानाचा दर्जा सुधारावा. यासाठी 100 टक्के अनुदानावर 04 एकर कोरडवाहू जमीन किंवा 02 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध  करुन देण्यात येते.

या योजनेतील पात्र लाभार्थी यांना सदरील योजनेचा लाभ देणेसाठी सन 2022 मधील शासकीय रेडिरेकनरच्या दराप्रमाणे जमिन खरेदी करावयाची असल्याने ज्या शेतकऱ्यांना सन 2022 मधील शासकीय रेडिरेकनर दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे लाभार्थ्यांनी स्वत: कार्यालयात अर्ज करावा.

ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील अनुसूचित जातीचे, दारिद्रय रेषेखालील, भुमिहिन, त्याच गावचा रहिवासी असलेले व 18 ते 60 वयोगटातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. लगतच्या गावातही लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्याचा विचार करण्यात येईल. यामध्ये अंतिमत; परिस्थितीनुसार आवश्यक ते निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल

दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांकरीता jamin kharedi anudan yojna maharashtra ही योजना असून या योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून राहणीमानात सुधारणा व मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे. विधवा आणि परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला असून, त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाणार आहे.

farmer jamin kharedi anudan yojna maharashtra arj Namuna Download here 👇👉

APPLICATION PDF

jamin kharedi anudan yojna maharashtra Arj namuna for beneficiary

jamin kharedi anudan yojna maharashtra
jamin kharedi anudan yojna maharashtra

कोणत्याही बाह्यव्यक्तीव्दारे योजनेचा लाभ घेवू नये. तसेच या कार्यालयामार्फत कोणत्याही बाह्यव्यक्तीशी नेमणूक केली नाही. शेतमालकाने किंवा लाभार्थ्यांनी परस्पर बाह्यव्यक्तीव्दारे योजनेबद्दल व्यवहार केल्यास व त्यात फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

तसेच योजनेअंतर्गत ज्या शेतजमीन मालकानी शेतविक्रीचे प्रस्ताव या कार्यालयास सादर केले असतील त्यांनी या कार्यालयाची परवानगी न घेता इतर व्यक्तीशी परस्पर शेतजमीन विक्रीबाबतचा व्यवहार केला असेल अशा शेतजमीन मालकाकडून शासनाची फसवणूक केल्याचे गृहित धरुन नियमानुसार फौजदारी कार्यवाही करण्यांत येईल.

या योजनेकरीता इच्छ़ुक लाभार्थ्यांनी शेतजमिन व्रिकीचे प्रस्ताव सर्व विहित कागदपत्रासह स्वत: समाजकल्याण कार्यालयात जमा करावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले. या योजनेची माहितीकरीता समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाव्दारे करण्यात येत आहे.

अनुसूचित जमाती साठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: