Mahamesh yojana 22-23 मेंढी पालनासाठी ₹२.५ लाखापर्यंतच अनुदान

राज्यात मेंढी पालनासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ( Mahamesh yojana 22-23 )

Mahamesh yojana 22-23

राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील अर्जदारां कडुन Yashwantrao holkar Mahamesh Yojana दि. १५/११/२०२२ ते ३०/११/२०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेची पुर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपुर्ण तपशील www.mahamesh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावरुन तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Mahamesh App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.

Mahamesh Yojana 2023 Documents Download Formats

बंधपत्र नमूना क्रमांक – १ – प्रमाणपत्र PDF

बंधपत्र नमूना क्रमांक – २ – रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकारी यांचा) PDF

बंधपत्र नमूना क्रमांक – ३ – अपत्य दाखला / प्रमाणपत्र PDF

बंधपत्र नमूना क्रमांक – ४ – अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीकडून रु. १००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावयाच्या संमतीपत्राचा मसुदा – “संमती पत्र” PDF

बंधपत्र नमूना क्रमांक – ५ – भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराचा मसुदा (रु.१००/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) – “भाडे करार” PDF

बंधपत्र नमूना क्रमांक – ६ – “स्वयंमघोषणा पत्र” PDF

Mahamesh yojana 22-23

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ( Yashwantrao holkar Mahamesh Yojana ) राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना

राज्यात दिनांक- ०२/०६/२०१७ च्या शासन निर्णय नुसार, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ( Mahamesh yojana 22-23 ) ६ मुख्य घटकांसह नवीन योजना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यात राबविणेकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी 2022-23 साठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभधारक निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करावयाचे आहे.

Mahamesh yojana 22-23 ही योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असून या योजनेमध्ये खालील ६ मुख्य घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

(1) स्थायी आणि स्थलांतरित मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर – अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप करणे

(2) सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप करणे (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थीकरिता)

(3) मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान. ( केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतः च्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थी करिता )

(4) मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान. (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थीकरिता )

(5) कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.

अनुदान तक्ता

Mahamesh yojana 22-23
Mahamesh yojana 22-23

Mahamesh yojana 22-23 कार्यक्षेत्र

  1. सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थीसाठी लागू राहील.
  2. सदरची योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात यावी.
  3. योजनेअंतर्गत लाभधारक निवड करिता मागविण्यात आलेल्या अर्जापोटी प्राप्त झालेला प्रतिसाद विचारात घेऊन जिल्हा निहाय उधिष्ट निश्चित करून संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल.

३. लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती

  1. सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल..
  2. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  3. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व अपंगांकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.
  4. या योजने अंतर्गत भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
  5. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
  6. ज्या लाभधारकांना या आधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  7. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  8. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
  9. स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतः ची जागा असणे आवश्यक आहे.
  10. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन /

स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतीनिधी नसावा.

Mahamesh yojana 22-23 साठी अर्ज करण्याची पद्धत

योजनेअंतर्गत अर्जदारास फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करता येणार नाही. ऑनलाइन पद्धतीने www.mahamesh.in या महामंडळाचे संकेतस्थळावरून किंवा Android मोबाइल द्वारे MAHAMESH” App वापरुन अर्ज करता येईल.

1. महामेष वेबसाइट वरून अर्ज करण्याची पध्दत –

१. अर्जदारांनी योजनेचा अर्ज ऑनलाइन भरावयाचा आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करावयाची नसून संगणकीय सॉफ्टवेअरव्दारे random पद्धतीने (लॉटरी) निवड झाल्यानंतर दिलेल्या विहित कालावधीत विहित केलेली कागदपत्रे विहित वेळेत ऑनलाइन अपलोड करावयाची आहे.

२. अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता www.mahamesh.in हे महामंडळाचे संकेतस्थळ ओपन करावयाचे आहे.

३. अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम वरील संकेतस्थळावर जाऊन महामेष योजनेची लिंक ओपन करावी.

४. अर्ज भरण्याबाबतची माहिती दर्शविणारा व्हिडिओ व युजर म्यान्युयल बाबतची लिंक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी याबाबतची माहिती काळजीपूर्वक बघून व वाचून त्याप्रमाणे अर्ज भरण्यात यावा.

५. अर्जदारांनी प्रथम स्वतःचा आधार नंबर वापरुन लॉगिन ( अर्जदार लॉगिन) करावयाचे आहे. (एका अर्जाकरिता नोंदणी झालेला आधार नंबर परत दुसन्या अर्जदाराच्या अर्जाकरिता वापरता येणार नाही)

६. योजनेचा अर्जामध्ये अर्जदारानी वयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील तसेच इतर माहिती भरावयाची आहे. माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर NEXT बटन क्लिक करावयाचे आहे. त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल, यामध्ये अर्जदारास कुठल्या घटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे याबाबतची माहिती भरावयाची आहे.

७. अर्जामधील माहिती भरून झाल्यानंतर SUBMIT बटनावर क्लिक करण्यात यावे. (सबमिट करण्याआधी भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी)

८. अर्ज सबमीट झाल्यानंतर “Application form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज सबमिट झाल्याचे समजावे.

९. अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची पावती व्यवस्थित जतन करून ठेवावी.

१०. घटक निहाय प्राप्त अर्ज विचारात घेऊन उधिष्ट महामंडळामार्फत निश्चित करण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: