पशुपालकांच्या रोजगार निर्मितीसाठी ; राज्यात शेळी समूह योजना | Goat cluster scheme 2022

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी समूह योजना ( Goat cluster scheme ) सुरू करण्यात आली आहे.

Goat cluster scheme

महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे. राज्यात बहुसंख्य कुटुंब शेतीवर आपला उदार निर्वाह करतात. यामुळे शेतीला पूरक जोड धंद्याची जोड देणे अतिशय आवश्‍यक आहे. शेती सोबत केल्या जाणाऱ्या पूरक जोडधद्यांपैकी शेतीच्या उत्पादनावर आधारित आणि हमखास उत्पन्न देणारा असा एक पूरक उद्योग म्हणजे शेळीपालन ( Goat Farming ).  या उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ( AHD Maharashtra ) शेळी समूह योजना सुरू करण्यात आली आहे.

याच योजनेबाबत थोडक्यात जाणून घेऊयात… 

राज्यामध्ये बहूसंख्य कुटुंबांचे शेळी पालनामधून अर्थार्जन होत आहे. शेळी पालन हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षणप्रवण, दुष्काळी आणि निमदुष्काळी भागामध्ये केला जातो. महाराष्ट्रातील कोरडे हवामान शेळ्यांना पोषक आहे.

ज्या ठिकाणी अन्य कोणतेही पशुधन पाळण्यास मर्यादा येतात, तेथे शेळी पालन ( Goat farming ) हा एक शेतकऱ्यांसमोर उत्तम पर्याय आहे. अत्यंत कमी चाऱ्यावर, कठीण परिस्थितीतसुद्धा शेळ्या तग धरु शकतात. शेळ्यांची वातावरणातील बदलाशी त्वरीत जुळवून घेण्याची क्षमता असते. अत्यंत कमी भांडवलातही हा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, बेरोजगार तरुण याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहत आहेत.

राज्यात शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना शेळी पालन करण्यासाठी प्राधान्य देत आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी महामंडळ आणि गोट बँक ऑफ कारखेडा ( Goat bank ) यांचे संयुक्त विद्यमाने महिलांना प्रायोगिक तत्वावर ५०० शेळीधनाचे शेळ्या वाटप करण्यात आले आहे. येत्या काळात संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. महामंडळाच्या प्रक्षेत्रावरचे बळकटीकरण,आधुनिकीकरण करण्यासाठी ९४ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. यामधून पायाभूत सुविधा बळकटीकरण त्याचबरोबर आधुनिक यंत्रसामुग्री घेतली जाणार आहे.

Goat cluster scheme main features योजनेची उद्दिष्टे

  • समूह विकासामधून शेळीपालन व्यवसायास गती देणे.
  • नवीन उद्योजक निर्माण करणे.
  • शेळी पालकांचे उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्था स्थापन करून त्या माध्यमातून त्यांना शेळी पालन प्रशिक्षण, सुविधा पुरविणे, तांत्रिक माहिती, अद्ययावत तंत्रज्ञान, आरोग्यसुविधा, अनुवंशिक सुधारणा करणे.
  • शेळी पालकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे
  • फॉरवर्ड लिंकेजेस निर्माण करून देणे, शेळी पालनकरिता लागणाऱ्या वस्तू, साहित्य उपलब्ध करून देणे.
  •  शेळ्यांच्या पैदास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे.

प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे समूह तयार करून, त्या माध्यमातून त्यांना शेळी पालन व्यवसायाकरिता प्रवृत्त करणे, तसेच त्यांचे या व्यवसायाबाबतचे कौशल्य विकसित करून, त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचविण्यास याचा फार मोठा हातभार लागणार आहे.

या योजनेमुळे या भागातील शेळी पालकांना सतत निर्माण होणारा शेळ्यांच्या विपणन व्यवस्थेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध होणाऱ्या शेळ्यांना निश्चितच जास्त किंमत मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

या योजनेअंतर्गत शेळ्यांपासून मिळणाऱ्या विविध पदार्थ व उपपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक निर्माण तहोतील, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होईल.

प्रक्रिया उद्योगामध्ये निर्माण होणारे नाशवंत पदार्थ जास्त दिवस साठवता यावे याकरिता शितगृह ( Cold storage ) स्थापन करण्यात येत आहे. याचा फायदा उत्पादकांना होऊन, त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार वाढविण्यास मदत होऊन याचा फायदा निश्चितच शेळी पालकांना होणार आहे.

Goat cluster Loaction योजना राबविण्याचे ठिकाण

  1. बोंद्री, ता. रामटेक, जि. नागपूर. योजनेचे कार्यक्षेत्र नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. 
  2. तिर्थ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. योजनेचे कार्यक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
  3. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली योजनेचे कार्यक्षेत्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
  4. बिलाखेड, ता. चाळीसगांव, जि. जळगांव योजनेचे कार्यक्षेत्र नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर
  5. दापचरी, जि. पालघर योजनेचे कार्यक्षेत्र मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग

Project under goat cluster scheme योजने अंतर्गत समाविष्ट बाबी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पोहरा, जिल्हा अमरावती यांच्या ताब्यात असलेली व पशुसंवर्धन विभागाच्या नांवे असलेल्या ९.५ एकर क्षेत्रावर प्रामुख्याने खालील सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

Common facility center सामूहिक सुविधा केंद्र

शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायासंबंधीत विषयाचे सखोल ज्ञान व्हावे, याकरिता State-of-the-art ही संकल्पना विचारात घेऊन शेळी समुह प्रकल्पांतर्गत २ एकर क्षेत्रावर ( Common facility center ) सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. या सामूहिक सुविधा केंद्रामध्ये प्रशिक्षण केंद्रासह १०० प्रशिक्षणार्थी करिता अनुषंगिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

goat milk processing plant शेळ्यांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्र

या प्रकल्पाअंतर्गत २.५ एकर क्षेत्रावर शेळ्यांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राचे २ युनिटस स्थापन करण्यात येणार आहेत. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस,संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती/संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती,संस्था सदर केंद्राची उभारणी करणार.

goat meat processing plant शेळ्यांचे मांस प्रक्रिया केंद्र 

या योजनेअंतर्गत या प्रकल्पात सुमारे १.५ एकर क्षेत्रावर मांस प्रक्रिया केंद्र (१ युनिट) स्थापन करण्यात येईल. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस , संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन व्यक्ती, संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती,संस्था सदर केंद्राची उभारणी करेल.

Goat farming producer company office शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांकरिता कार्यालय

sheli samuh yojana maharashtra या प्रकल्पांतर्गत सुमारे ०.५ एकर क्षेत्रावर शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांसाठी कार्यालय उभारण्यात येणार असून सदर कार्यालय शेळी उत्पादक कंपनी किंवा खाजगी व्यवसायिकांना भाडे करारावर देण्यात येईल.

Goat cluster scheme GR 👉👇👇

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या 6 प्रक्षेत्रावर शेळी समूह योजना (Goat Cluster scheme) राबविण्यास मान्यता देण्याबाबत.

Sheli palan yojana 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: