शेळी गट, कुक्कुटपालन योजनांच्या लाभासाठी नवी अट, करा तात्काळ हे काम | AH-mahabms scheme 2022

नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ( AH-mahabms scheme ) शेळी गट ( Sheli gat vatap ), कुक्कुट पालन योजनेच्या ( Poultry farming subsidy ) पात्र लाभार्थ्यासाठी शेळी गट खरेदी सह पायभूत सुविधा उभारण्यास विहित कालावधी निश्चित, लाभासाठी नवी अट, करा तात्काळ हे काम

AH-mahabms scheme 2022

राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविली जाणार एक महत्त्वाची योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना.

AH-mahabms scheme navinya purna yojana GR

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण शेळी / मेंढी गट वाटप तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे या योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना गट खरेदी / पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कालावधी निश्चीत करण्याबाबत.

आणि याच नावीन्यपूर्ण योजनेचा संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज २४ जून २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे.

राज्यांमध्ये 10 शेळी बोकड याच्यासाठी जनरल ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना करता 50 % तर एस सी ( SC Category ), एसटीच्या ( ST Category ) लाभार्थ्यांना 75 % अनुदान दिले जाते. १ हजार कुक्कट पक्षांचा गट ( Kukkutpalan anudan yojana ) याच्या वाटपासाठी सुद्धा जनरल आणि ओबीसीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान तर एस सी,एसटी लाभार्थ्यांना 75 % अनुदानावर ही योजना राबवली जाते.

२५ मे २०२१ रोजी ही योजना राज्यामध्ये राबविण्यात मंजुरी देण्यात आलेली होती ज्याच्या अंतर्गत 10 शेळ्या एक बोकड याप्रमाणे दहा मेंढ्या एक मेंढा, १ हजार कुक्कुट पक्ष्यांचे वाटप ( Sheli gat vatap yojana ) अशा प्रकारची योजना राबवली जात आहे, या योजनेकरीता डिसेंबर २०२१ मध्ये अर्ज देखील भरून घेण्यात आले होते, मात्र योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली असताना सुद्धा शेळी-मेंढी गटाची प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी जो कालावधी आहे हा कालावधी विहित करण्यात आलेला नव्हता.

योजना राबविताना लाभ देण्यासाठी हा कालावधी निश्चित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या ( Govt GR ) माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत १ हजार कुकुट पक्षी संगोपणाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्याची निवड झाल्यापासून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये 100% पायाभूत सुविधा उभारणं बंधनकारक असणार आहे.

आणि असे न केल्यास संबंधितास 30 दिवसाची मुदत पशुसंवर्धन उपायुक्त देतील मात्र याही कालावधीमध्ये जर या पायाभूत सुविधांची उभारणी जर केली नाही तर त्या लाभार्थ्याला बाद केला जाईल आणि पुढील लाभार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.

सदर योजनेअंतर्गत 2021 22 पूर्वी लाभ मंजूर करण्यात आलेल्या ज्या लाभार्थ्यांनी काही अपरिहार्य कारणास्तव सध्या पायाभूत सुविधांची उभारणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना अखर्चित निधी शिल्लक असल्यास अशा प्रकरणी शेवटची संधी म्हणून 30 दिवसांची मुदत देण्यात यावी अशा प्रकारची सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

संबंधित लाभार्थ्याने पायाभूत सुविधांची उभारणी केली तर अशी उभारणी झाल्यानंतर पशुधन विस्तार अधिकारी ( AHD Dept ) यांना त्याच्याबाबत कळवावे व राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजने ( Navinya purn yojana )अंतर्गत 10 शेळ्या एक बोकड 10 मेंढ्या एक मेंढा वाटपाचे योजनेअंतर्गत संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांची निवड झाल्या बाबत पत्राद्वारे कळवले च्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधितांनी लाभार्थी सोयीचे रक्कम बॅंक अर्जाद्वारे उभारलेले रक्कम ही संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त यांच्‍या कार्यालयाच्‍या बँक खात्यामध्ये जमा करावी.

असे न केल्यास लाभार्थ्याला योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही असे गृहीत धरून प्रतीक्षा यादी ( beneficiary wait list ) मध्ये पुढील लाभार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना याठिकाणी देण्यात आलेले आहेत.

अशा प्रकारच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हा विहित कालावधी निश्चित करण्यात आलेल्या या कालावधीमध्ये या बाबींची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना बाद केला जाणार आहे.

या लाभार्थ्यांना आता या कालावधीमध्ये आपले या पायाभूत सुविधांची उभारणी करावी लागेल आणि ज्या लाभार्थ्यांना 10 शेळ्या मेंढ्या मेंढ्या किंवा हजार पक्षी घ्यायचे आहेत त्यांची जी काही रक्कम असेल त्यांचा लाभार्थी हिस्सा असेल तो सुद्धा एक महिन्याच्या आत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या बँक खात्यावर जमा करावा लागेल अन्यथा त्यांना बाद केला जाणार आहे.

Navinya purna yojana AH-mahabms scheme 2022 योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे.

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण शेळी / मेंढी गट वाटप तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे या योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना गट खरेदी / पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कालावधी निश्चीत करण्याबाबत GR link 👇👇

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण शेळी / मेंढी गट वाटप तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे या योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना गट खरेदी / पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कालावधी निश्चीत करण्याबाबत.

1 thought on “शेळी गट, कुक्कुटपालन योजनांच्या लाभासाठी नवी अट, करा तात्काळ हे काम | AH-mahabms scheme 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: