Online crop loan 2022 – पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

खरीप हंगाम करिता Online crop loan 2022 – पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, पहा कसा करायचा अर्ज, काय असेल पूर्ण प्रक्रिया.

Online crop loan 2022

खरिप पिक कर्ज २०२२ – Online crop loan 2022 उद्देश

येणाऱ्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना सुलभ रीतीने कर्ज मिळावीत, कर्ज वाटप होत असताना होणारी अनियमितता, होणार भ्रष्ट्राचार, पीक कर्ज ( Crop loan ) मिळविण्या करीता शेतकऱ्यांना मारावे लागणारे हेलपाटे, यामुळे शेतकऱ्यांचा वाया जाणारा वेळ, बँकेत होणारी गर्दी या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, अग्रणी बँक यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज ( Online crop loan 2022 ) उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट विविध जिल्ह्याच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.

Online crop loan 2022 application start Parbhani dist.

याच सर्वांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व जिल्हा अग्रणी परभणी यांच्या माध्यमातून परभणी जील्ह्याकरिता पीक कर्जासाठी Online crop loan 2022 अर्ज सुरू झाले आहेत.

Online crop loan 2022 वेळापत्रक

परभणी जिल्हयातील एकूण 857 बॅके शाखाद्वारे या प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार असून, दिनांक 21 एप्रिल 2022 पासून हे अर्ज सुरू होणार असून २०२२ च्या खरिप पिक कर्जासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे

Online crop loan 2022 अर्ज प्रक्रिया

परभणी जिल्ह्यातील शेतक-यासाठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याकरिता, पिक कर्जासाठी प्राप्त होणा-या अर्जाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्हा अग्रणी बँक आणि राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र परभणी यांच्यामार्फत एक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

ही प्रणाली http://parbhani.gov.in/croploan या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

पिक कर्जासाठी online अर्जा करिता लिंक

येथे क्लिक करा

या ऑनलाईन अर्जात शेतक-यांची नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, शेती पिकांची प्राथमिक माहिती नोंदवून घेवून ती माहिती संबंधित बँकेला ऑनलाईन प्रणालीतून प्राप्त होणार आहे.

यासाठी परभणी जिल्हयातील सर्व बँक शाखा या प्रणालीस जोडल्या असून संबंधित बँक शाखेस स्वतंत्र लॉगीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

शेतकऱ्याकडून अर्जात दिलेली माहिती तपासून याच ऑनलाईन प्रणालीमार्फत अर्जदार शेतकरी कर्जासाठी पात्र/अपात्र असल्याची माहिती दिली जाणार आहे.

तर एखादा शेतकरी अपात्र असल्यास अपात्रतेचे कारण शेतक-यास त्यांच्या लॉगीनमध्ये लॉगिन केल्यानंतर दिसणार आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दिलेल्या क्रमांकावर पात्र  शेतक-यांशी बँकेद्वारे संपर्क साधण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांना वेळ देऊन कागदपत्र सादर करण्यास सांगितले जाईल.

कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शेतक-यांना प्रत्यक्ष बॅकेत भेट द्यावी लागेल. प्रत्यक्ष भेटीत कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर याच आँनलाईन प्रणालीद्वारे कर्ज वितरीत केल्याची माहिती 15  दिवसाच्या आत बँकेमार्फत अद्ययावत करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि अग्रणी बँक यांना स्वतंत्र लॉगीनद्वारे जिल्हयातील कर्जाच्या नोंदणीची आणि बँकांनी केलेल्या कार्यवाहीची एकत्रित आकडेवारी उपब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे प्रलंबित कर्ज नोंदणीच्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन प्राप्त होणार असून प्रशासनास पिक कर्ज प्रकियेवर प्रभावीपणे नियंत्रण करता येणार आहे.

या ऑनलाईन प्रणालीमुळे ( Online crop loan application) सर्व शेतक-यांना वेळेवर कर्ज मिळणार आहेत, तर शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज नोंदणी पूर्ण करुन या ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल यांनी केले आहे

हे ही पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: