वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना VJNT Loan scheme 2022 – Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana 2022
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे अशे काही महत्वाचे उद्देश ठेवून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत ( VJNT Loan scheme 2022 ) थेट कर्ज योजने सह, वैयक्तिक, गट कर्ज परतावा अशा योजना राबविल्या जातात.
आणि याच शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या VJNT Loan scheme 2022 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत.
महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजना
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावा. अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
ही योजना ऑनलाईन असून यासाठी आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मूळ कागदपत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेत कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा.
गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मार्गास प्रवर्गातील असावा.
गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षापर्यत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
गटातील सर्व सदस्यांचे सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादेत असावी.
ही योजना ऑनलाईन असून यासाठी सदस्याचा जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,रहिवाशी, आधारकार्ड, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल ही सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.
एक लाख रुपये थेट कर्ज योजना
या योजनेमध्ये महामंडळाकडून एक लाख रुपये थेट कर्ज दिले जाते.
या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत व बोझा नोंद करुन देणे महत्वाचे आहे. यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (एक लाखापर्यंत मर्यादा), रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी इत्यादी कागदपत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
या योजनेचे फॉर्म महामंडळाकडून जातीचा मूळ दाखला, आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करुन अर्जदारास मिळेल.
बीज भांडवल योजना
बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जात आहे. यासाठी अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवाशी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयास दाखल करणे महत्वाचे आहे.
यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.
VJNT Loan scheme योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र व्यवसाय
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या VJNT Loan scheme या योजनेअंतर्गत लघु व्यवसाय साठी लाभार्थ्याला अर्थसाहाय्य केले जाते, यामध्ये
- सायबर कॅफे,
- संगणक प्रशिक्षण,
- झेरॉक्स, स्टेशनरी,
- सलुन,
- ब्युटी पार्लर
- मसाला उद्योग,
- पापड उद्योग,
- मसाला मिर्ची कांडप उद्योग,
- वडापाव विक्री केंद्र,
- भाजी विक्री केंद्र,
- ऑटोरिक्षा,
- चहा विक्री केंद्र,
- सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र,
- डी. टी. पी. वर्क,
- स्विट मार्ट,
- ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल,
- टायपिंग इन्स्टीट्युट,
- ऑटो रिपेअरींग वर्कशॉप,
- मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज,
- फ्रिज दुरुस्ती,
- ए. सी. दुरुस्ती,
- चिकन/मटन शॉप,
- इलेक्ट्रिकल शॉप,
- आईस्क्रिम पार्लर व इतर,
- मासळी विक्री,
- भाजीपाला विक्री,
- फळ विक्री,
- किराणा दुकान,
- आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान,
- टेलिफोन बुथ
- हार्डवेअर व पेंट शॉप,
- मत्स्य व्यवसाय
- कृषी क्लिनिक,
- पॉवर टिलर
अशा प्रकाराची व्यवसाय किव्हा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसाया अर्थ साहाय्य करीत ही योजना सुरू करण्यात आली आहे.
vjnt loan scheme योजनेतून मिळणारे लाभ
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ थेट कर्ज योजना
या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाची मर्यादा १ लाख रूपये पर्यंत असेल, यात महामंडळाचा सहभाग १००% असून कर्जमंजूरीनंतर १ लाख रूपयांचे कर्ज लाभार्थ्याला देण्यात येईल. कर्जमंजूरीनंतर कर्जदाराला पहिला हप्ता ७५% असेल ७५ हजार रूपये वितरीत करण्यात येतो तर दुसरा हप्ता २५% हा प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार २५ हजार रूपये इतके वितरीत करण्यात येतो.
लाभार्थ्याला या कर्जाची नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू.२,०८५/- परतफेड करावी लागेल
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यींना व्याज आकारण्यात येणार नाही. मात्र कर्जपरतफेडीचा कालावधी व कर्जाची परतफेड नियमित न करणाऱ्या लाभार्थ्यांच्याबाबतीत दंडनीय व्याजदर असेल. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल.
VJNT Loan scheme 2022 या योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला या लाभार्थीना तात्काळ व प्राथम्याने लाभ देण्यात येते.
VJNT Loan Scheme लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी
- लाभार्थी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराचे वय वर्ष १८ ते ५० वर्ष असावे.
- लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- वेबपोर्टल / महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
- उमेद्वाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- उमेदवार कोणत्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- उमेद्वाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हातालन्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- कुटुंबातील एक व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र
- आधार कार्ड
- पैन कार्ड
- बैंक पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- एक पासपोर्ट साइज फोटो
शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ( VJNT Loan scheme 2022 ) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत, या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळानी केले आहे.
महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना या ऑफलाईन असून या योजनांसाठी अर्ज विक्री महामंडळाचे जिल्हा कार्यालय, येथे सुरु आहे.
थेट कर्ज योजनेचा अर्ज घेण्यासाठी अर्जदाराला सोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड सोबत आणावे लागेल.
अर्ज विक्री, अर्ज स्विकारणे यासाठी स्वतः अर्जदाराने हजर राहणे आवश्यक असून कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज विक्री वा अर्ज स्विकारणे केले जात नाही