ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! यंदा ऊस FRP ₹३०५० | Sugarcane FRP 2022

सन २०२२ करिता उसाचा FRP ( Sugarcane frp 2022 ) 305 रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणाऱ्या पुढील खरेदी वर्षासाठी उसाच्या भावात 15 प्रति क्विंटल वाढ.

Sugarcane FRP 2022

Sugarcane FRP 2022

Government approves Fair and Remunerative Price of sugarcane payable by Sugar Mills to sugarcane farmers for sugar season 2022-23

उताऱ्याचा बेसरेट आता १० ऐवजी १०.२५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे देशातील ५ कोटी ऊस उत्पादकांना तर महाराष्ट्रातील ५० ते ५५ शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत २०२२-२३ या साखर हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) उसाला प्रतिटन ३०५० रुपये एफआरपी ( sugarcane frp 2022 ) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला (Sugarcane FRP 2022 ) मंजुरी दिली आहे.

305 रुपये प्रति क्विंटल दर 10.25%,  मूळ वसुलीसाठी, क्विंटलमागे 3.05 रुपये प्रीमियम प्रदान करते.

10.25% पेक्षा जास्त वसुलीतील  प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.05 प्रति क्विंटल आणि एफआरपीमध्ये वसुलीतील  प्रत्येक 0.1% घसरणीसाठी 3.05 रुपये प्रति क्विंटल कपात केली जाणार आहे.

मात्र  ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5%.  पेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

अशा शेतकऱ्यांना उसासाठी आगामी साखर हंगामासाठी( 2022-23) 282.125 रूपये प्रति क्विंटल तर चालू साखर हंगामासाठी ( 2021-22 ) 275.50 रूपये प्रति क्विटल असा us frp दिला जाणार आहे.

साखर हंगाम 2022-23 साठी उसाच्या उत्पादनाची A2 + FL किंमत (म्हणजेच वास्तविक भरलेली किंमत आणि कौटुंबिक श्रमाचे मूल्य) 162 रूपये प्रति क्विंटल आहे.  

एफआरपीची 305 रूपये प्रति क्विंटल किंमत  10.25% च्या वसुली  दराने उत्पादन खर्चापेक्षा 88.3% जास्त आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या किंमतीपेक्षा 50% पेक्षा जास्त परताव्याचे आश्वासन मिळनार आहे.

साखर हंगाम 2022-23 साठी एफआरपी चालू ( Sugarcane frp 2022 ) साखर हंगाम 2021-22 पेक्षा 2.6% जास्त आहे.

केंद्र सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे गेल्या 8 वर्षांत ऊस लागवड आणि साखर उद्योगाने मोठा पल्ला गाठला असून आता या क्षेत्राला स्वयं-शाश्वततेची पातळी गाठण्यात यश आले आहे.

सरकारने योग्य वेळी केलेला हस्तक्षेप तसेच साखर उद्योग, राज्य सरकारे, केंद्र सरकारचे विविध विभाग आणि शेतकरी यांच्यातील सहयोगी संबंधांचा हा परिणाम आहे.

देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे सदस्य तसेच साखर कारखाना उद्योग तसेच इतर संबंधित उद्योगांमध्ये कार्यरत असणारे 5 लाख कामगार यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

9 वर्षांपूर्वी जेव्हा 2013-14 च्या साखर हंगामात साखरेचा एफआरपी म्हणजे रास्त आणि किफायतशीर दर केवळ 210 रुपये प्रती क्विंटल होता आणि कारखान्यांकडून केवळ 2397 लाख दशलक्ष टन साखर खरेदी केली जात होती.

त्या काळी कारखान्यांना विकलेल्या साखरेतून शेतकऱ्यांना केवळ 51,000 कोटी रुपये मिळत होते. मात्र, आता गेल्या 8 वर्षांमध्ये सरकारने एफआरपी ( us frp ) मध्ये 34% ची वाढ केली आहे.

या वर्षीच्या म्हणजे 2021-22 च्या साखर हंगामात, साखर कारखान्यांनी 1,15,196 कोटी रुपये किंमतीच्या 3,530 लाख टन साखरेची खरेदी केली आहे आणि ही आतापर्यंतची विक्रमी प्रमाणातील खरेदी आहे.

वर्ष 2022-23 च्या म्हणजे येत्या साखर हंगामात, उसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि अपेक्षित साखर उत्पादन यांच्यात होणारी वाढ लक्षात घेता, त्या हंगामात साखर कारखान्यांकडून 3600 लाख टन साखरेची खरेदी होईल आणि त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1,20,000 कोटी रुपयांचा भक्कम मोबदला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकरी हितार्थ केलेल्या उपाययोजनांच्या माध्यमातून सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी वेळेत चुकती केली जातील याची सुनिश्चिती करून घेईल.

sugarcane frp 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: