Fertilizer prices 2022 – Cabinet approves Nutrient Based Subsidy (NBS) rates for Phosphatic and Potassic (P&K) fertilizers for Kharif Season

सध्या निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणी च्या परिस्थिती मुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे ते म्हणजे रासायनिक खताचे भाव वाढ.
ही खताची भाव वाडी या अडचणींमधून या समस्यांमधून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन खतावर दिली जाणारी सबसिडी वाढविण्यात आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगाम – 2022 करिता (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या (NBS) दरांसाठी खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
सरकार शेतकऱ्यांना खत उत्पादक/आयातदारांमार्फत अनुदानित किमतीत युरिया आणि P&K खतांच्या 25 ग्रेडची खते उपलब्ध करून देत आहे.
खताच्या किमती नियत्रणात ठेवण्यासाठी P&K खतांवरील अनुदान 01.04.2010 पासून NBS योजनेद्वारे शासनाकडून नियंत्रित केले जाते.
शेतकरी हिताच्या दृष्टीकोनानुसार, सरकारने युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे, सरकारने डीएपीसह पी आणि के खतांवर अनुदान वाढवून वाढलेल्या किमती ( fertilizer prices 2022 ) आत्मसात करण्याचा निर्णय घेतला आहे.
खत कंपन्यांना मंजूर दरांनुसार अनुदान दिले जाईल जेणेकरून ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून देऊ शकतील.
खरीप-2022 (NBS) साठी (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अनुदान हे 60,939.23 कोटी रुपये ईतके असून यामध्ये मालवाहतूक, स्वदेशी खतासाठी (SSP) अनुदान आणि स्वदेशी उत्पादन आणि डाय-अमोनियम फॉस्फेटच्या आयातीसाठी अतिरिक्त अनुदान इत्यादी बाबींचा यात समावेश आहे.
डाय-अमोनियम फॉस्फेट ( DAP ) आणि त्याच्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झालेली आहे, या झालेल्या वाढीचा भार प्रामुख्याने केंद्र सरकारने उचलणार आहे.
यामुळे डाय-अमोनियम फॉस्फेट ( DAP rate ) वरील सध्याच्या 1650 रुपये प्रति बॅग अनुदानाऐवजी ( fertilizer subsidy ) 2501 रुपये प्रति बॅग अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेलाआहे.
हे दिले जाणारे अनुदान गेल्या वर्षीच्या अनुदान दरांपेक्षा 50% वाढले आहे. डाय-अमोनियम फॉस्फेट ( Dap) आणि त्याच्या कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढ अंदाजे 80% आहे.
या दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरांवर अधिसूचित फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खते मिळण्यास मदत होईल.
fertilizer prices 2022

मित्रांनो या खताचे भाववाढी चे एक खूप मोठं संकट शेतक-यांसमोर आ वासून बसलेला होता आणि या प्रश्नावर ते अतिरिक्त अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
यानंतर ही बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो, तो म्हणजे दिलेली सबसिडी नेमकी शेतकऱ्याला जमा होते की कोणाला.
यामध्ये दिली जाणारी सबसिडी कंपन्यांना दिली जाते आणि सबसिडीचा भाग सोडून अतिरिक्त जी किंमत असते ती किंमत शेतकऱ्याला खत खरेदी करताना द्यावी लागते.