पावसाच्या खंडामुळे बाधित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा ( solapur Agrim pikvima ) भरपाई मिळावी यासाठी सोलापूर जिल्हाधिाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित.
Solapur Agrim pikvima Solapur pik vima update 2023
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा खंड यामुळे सोयाबीन पिवळे पडले आहे. ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे.
याचबरोबर तूर, भुईमुग, मका, बाजरी, कांदा, कापूस या पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
या प्रतिकूलतेमुळे सोयाबीन, तूर, भुईमुग, मका, बाजरी, कांदा, कापूस या पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट अपेक्षित आहे.
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबरला पिकविमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, के व्ही के शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. व एक अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सोलापूर जिल्हा सनियंत्रण सभेत याविषयी चर्चा होऊन सोयाबीन, तूर, भुईमुग, मका, बाजरी, कांदा, कापूस या अधिसूचित पिकाकरिता अधिसूचना solapur Agrim pikvima लागू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या अधिसूचनेनुसार नुकसानग्रस्त पात्र ठरलेल्या सोयाबीन, तूर, भुईमुग, मका, बाजरी, कांदा, कापूस या अधिसूचित पिकांकरीता उपरोक्त महसूल मंडळातील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमा कंपनी द्वारा एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या एक जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रीम देण्याचे निश्चित करण्यात येते. शेतकऱ्यांना आगाऊ स्वरूपात देण्यात आलेली ही रक्कम अंतिम भरपाईत समायोजित करण्यात येते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील खालील महसूल मंडळातील सोयाबीन पिकासाठी Amravati Agrim pikvima अधिसूचना लागू केली आहे.
या मंडळासाठी अधिसूचना आहे. यानुसार एक महिन्याच्या आत विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रिम Amravati Agrim pikvima शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.