सर्व कृषी योजनांचे अर्ज सुरू; तात्काळ पूर्वसमंती| Sheti Yojana 2023

आज राज्यांतील शेतकऱ्यांना दिलासादायक अस एक sheti yojana 2023 च्या संदर्भात एक अपडेट घेणार आहोत.

सर्व कृषी योजनांचे अर्ज एप्रिलपासूनच सुरू; तात्काळ पूर्वसमंती| Sheti Yojana 2023

राज्यात कृषी विभागामार्फत विविध केंद्र पुरस्कृत, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची तसेच बाह्य सहित प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येते. जसे की पोकरा ( Pocra) असेल स्मार्ट ( Smart project Maharashtra).

Sheti yojana 2023
https://www.youtube.com/@GrShetiYojna/sheti yojana 2023 Update

या योजना राबवत असताना केंद्र पुरस्कृत योजना चे वार्षिक कृती आराखडा अंतिम झाल्यानंतर महाराष्ट्र शासनास वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यात निधी प्राप्त होतो.

याचप्रमाणे राज्य पुरस्कृत योजना साठी देखील टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होतो, कृषी विभागाला हा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषी क्षेत्राचे कामकाज हे हंगामनिहाय चालते.

राज्यात कृषी विभागाच्या योजना ( Sheti Yojana 2023 ) व प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेले विविध बाबींचा खरेदीसाठी तसेच शेती साठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बियाणे ( biyane Anudan) यंत्र ( Tractor Subsidy Maharashtra, krishi yantrikikaran yojana Maharashtra) व अवजारे ठिबक ( Drip Subsidy Maharashtra), तुषार संच ( sprinkler system) इत्यादींची खरेदी तसेच शेततळे ( shettale anudan) खोदकाम, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण, कांदा चाळ ( kanda chal anudan),शेड नेट गृह ( shednet anudan) व हरितगृह ( green house, poly house) उभारणी, फळबाग लागवड नियोजन इत्यादी बाबींचा समावेश आहे.

या सर्वांची कामे हे प्रमुख्याने पावसाळ्यापूर्वीच करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो, किंव्हा ती उन्हाळ्यात करावीच लागतात.

याचप्रमाने राज्यातील खरीप व रब्बी हंगामासाठी लागवड खाली येणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 75% क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड होते,फळबागांची लागवड होते त्यामुळे खरीप हंगाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. या हंगामातील पिकांना पूरक ठरणारे विविध योजना ( sheti yojana 2022 ) अंतर्गत विविध बाबींची खरीप हंगामपूर्व कालावधीतच अंमलबजावणी करणे शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरते.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेती साठी कृषी औजारे, बी बियाणे सह आवश्यक बाबींचा खरेदीसाठी व शेतावरील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या ( sheti yojana 2022 ) माध्यमातून वेळेत लाभ मिळावा म्हणून दरवर्षी माहे एप्रिल महिन्यातच शेतकऱ्यांचे अर्ज मागवून, यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना मंजुरी देण्याची कार्यवाही ही तातडीने करणे आवश्यक आहे त्याकरिता ०८ एप्रिल २०२२ रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय येथे पहा Government GR Link

खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक बाबींच्या खरेदीसाठी व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्याच्या योजनांची अंमलबजावणी प्रतिवर्षी माहे एप्रिलपासून सुरु करण्याबाबतचे स्थायी आदेश.

Sheti yojana 2023 Presanction procedure तात्काळ पूर्व संमती

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व केंद्र व राज्य पुरस्कृत योजना तसेच जागतिक बँक साहियत प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तकांमध्ये प्रती वर्षी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी चा किमान 80 % निधी उपलब्ध होईल असे गृहीत धरून सर्व योजना व प्रकल्प अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात( Advertisement for sheti yojana 2022 new application) प्रसिद्ध करावी व इच्छुक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी ( Mahadbt farmer scheme)द्वारे अर्ज मागवून लाभार्थी निवडीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.

कृषी आयुक्तालयाने 80 टक्के निधीच्या मर्यादेत जिल्हा व तालुका निहाय अस्थायी स्वरूपात आर्थिक लक्ष्य निश्चित करून द्यावीत आणि केंद्र पुरस्कृत योजना यांचे वार्षिक कृती आराखडा अंतिम झाल्यानंतर सुधारित जिल्हा व तालुका निहाय आर्थिक लक्ष्य क्षेत्र या स्तरावर कळवावे

Mahadbt farmer scheme Lottery

महाडीबीटी पोर्टल ( mahadbt Farmer Scheme) वर शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जातून सोडत ( mahadbt Farmer Scheme lottery) पद्धतीने तालुकानिहाय लाभार्थ्यांचे तातडीने निवड करण्यात येईल.

अनुदान वितरण प्रक्रिया mahadbt Farmer Scheme beneficiary subsidy distribution

राबविल्या गेलेल्या योजनेअंतर्गत संबंधित जिल्ह्यात तालुक्यात निधी वितरणाची, याचबरोबर सर्वजनिक वित्तीय व्यवस्थापनाला प्रणालीवर प्रत्यक्ष निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता लाभार्थ्यांना तातडीने पूर्वसंमती आदेश निर्गमित करुन निधी प्राप्त झाल्यानंतर महाडीबीटी प्रणालीद्वारे ( mahadbt farmer scheme) लाभार्थ्यांच्या आधार सलंगन बँक खात्यामध्ये (Aadhar DBT) निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना यात देण्यात आल्या आहेत.

Watch this also हेही पहा

कृषी यांत्रिकीकरण Krishi yantrikikaran yojana Maharashtra

मागील काही वर्षात sheti yojana अंतर्गत ( mahadbt farmer scheme ) वर भरलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्व संमती दिल्यानंतर योजना अंमलबजावणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षात घेता प्रत्येक योजनेकरिता जिल्हा तालुकानिहाय प्राप्त होणाऱ्या एकूण आर्थिक लक्ष अंकाच्या किती पड सोडत काढण्यात यावे याचा निर्णय संचालकांनी आयुक्त कृषी यांच्या मान्यतेने घ्यावा.

या शासन निर्णया नुसार देण्यात येत आलेले वरील आदेश हे स्थायी स्वरूपाचे असून या शासन निर्णयाने विहित केलेल्या प्रक्रियेचे आयुक्त कृषी यांनी पुढे प्रत्येक वर्षे अंमलबजावणी करावी.

अशेही आदेश देण्यात आले आहेत. आणि साहजिकच यामुळे या खरिपापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

#Sheti_yojana_2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: