अतिवृष्टीच्या निकषातून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा | satatcha paus anudan 2023

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित व नुकसान भरपाई पासून वंचित 26 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत satatcha paus anudan 2023

satatcha paus anudan 2023

satatcha paus anudan 2023 सततचा पाऊस नुकसान भरपाई

जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सततचा पाऊस नुकसान भरपाई विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे 1500 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्या संदर्भातील #शासननिर्णय आज प्रसिद्ध झाला आहे.

मदत व पुनर्वसन विभागामार्फत 1500 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागातील 14 जिल्ह्यांना वितरण करण्यात येणार आहे.

Ativrushti madat GR सततचा पाऊस नुकसान भरपाई GR

जून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत… 755 Koti

जून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत… 1500 Koti

सन २०२२ च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता, निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण रु. १५००००.०० लक्ष (अक्षरी रुपये पंधराशे कोटी फक्त) इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्यानुसार जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

satatcha paus anudan 2023
Ativrushti madat GR

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्य शासनाचा मोठा निर्णय.

जून ते ऑक्टोबर २०२२ कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित 26 लाख शेतकऱ्यांना शासनाने अतिवृष्टी साठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

विशेष बाब म्हणून सुमारे 1500 कोटी रुपयांची मदत ( Ativrushti madat jahir ) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे 26 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत Ativrushti madat jahir देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस- ५९८३/२४८३६१/प्र.क्र.८२०/म-३ दि.३१.१.१९८३ मध्ये अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये • बसत नसतानाही काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास अशा नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव पाठविण्याची तरतुद आहे. या तरतुदीनुसार विभागीय आयुक्त, औरंगाबाद, अमरावती व पुणे यांच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता दि. १३.१०.२०२२ च्या शासन निर्णयाव्दारे रु.७५५.६९ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत Ativrushti madat jahir देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक  शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 1500 कोटीच्या निधीमुळे अंदाजे 2६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते.

त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ. Ativrushti madat jahir

● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र

एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र
एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये Ativrushti madat jahir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: