शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, औषधांसाठी अनुदान | Rashtriya Ann suraksha abhiyan 2024

Rashtriya Ann suraksha abhiyan 2024 – देश अन्न धान्य, कडधान्य, तेलबिया, पोषक तृण धान्य, भरड धान्य च्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा, याच बरोबर या पिकांच्या लागवडी करिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता देशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना ( Rashtriya Ann suraksha abhiyan NFSM ) राबविण्यात येते.

Rashtriya Ann suraksha abhiyan
NFSM 2024

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पंप संच, वैयक्तिक शेततळे, कृषी अवजारे, अनुदानावर बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), या घटकांनाही अनुदान देण्यात येते.

केंद्र सरकार पुरस्कृत सन २००७-०८ पासून राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेतीच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी बियाणे पुरविण्यात येते . 

बियाणे चांगल्या दर्जाचे असतील तर शेतीतून निघणारे उत्पन्न हि त्याच प्रतीचे निघते, त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरू केली आहे.

या योजनेत केंद्र सरकारने वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या पीक पध्दत्तीनुसार या योजनेसाठी पीकनिहाय जिल्हे निवडले आहेत.

GR FOR 2022 Krushi unnati Yojana NFSM

न 2022-23 मध्ये कृषि उन्नती योजना – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या (TRFA Pulses सह) वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

Rashtriya Ann suraksha abhiyan मधील जिल्हा आणि निवडलेली पिके

भात ( धान )

Rashtriya Ann suraksha abhiyan मध्ये भात ( धान ) या पिकासाठी राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली अशा एकूण ८ जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे.

गहू –

Rashtriya Ann suraksha abhiyan मध्ये गहू या पिकासाठी सोलापूर, बीड, नागपूर अशा तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे

कडधान्य

Rashtriya Ann suraksha abhiyan मध्ये कडधान्य साठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भरडधान्य

Rashtriya Ann suraksha abhiyan मध्ये भरड धान्य अंतर्गत मका या पिकांसाठी राज्यातील ७ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यात सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव ई जिल्हे समाविष्ट आहेत.

पौष्टीक तृण धान्य

Rashtriya Ann suraksha abhiyan अंतर्गत पौष्टीक तृण धान्यात ज्वारी, बाजरी , रागी चा समावेश करण्यात आहे.

यामध्ये ज्वारी करिता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ असे एकूण २३ जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

यामध्ये बाजरी करिता नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे) समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

यामध्ये रागी करिता नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे) समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

कापूसकरिता बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा,नागपूर,चंद्रपूर जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

 ऊस-  औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

Watch how to apply for NFSM

https://youtu.be/9kG31JWVZ6M

अनुदान Rashtriya Ann suraksha abhiyan 2022 Anudan

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येईल.

Click Here To view benefits

1) पिक प्रात्यक्षिके
2) आंतर पिक प्रात्यक्षिक
3) पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके
4) अधिक उत्पादन देणारे वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण
5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
6) एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन
7) कृषी औजारे
8) सिंचन साधने
9) पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण
10) शेतकरी/महिला गट यांना मिनी दाल मिल, गोदाम बांधकामासाठी अनुदान

पिक प्रात्यक्षिके / आंतर पिक प्रात्यक्षिक / पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके anudan

  • सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
  • आंतर पिक प्रात्यक्षिक – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
  • पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके – रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.

प्रमाणित बियाणे वितरण Anudan

  • या योजनेत 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे किमतीच्या 50 % किंवा कमाल रु.5000 प्रती क्विंटल अनुदान.
  • 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे वितरण – किमतीच्या 50% किंवा कमाल रु.2500 प्रती क्विंटल अनुदान.
  • बियाणे उत्पादनास अर्थ सहाय्य (10 वर्षाच्या आतील बियाणे) साठी रु. 2500 प्रती क्विंटल असे अनुदान दिले जाते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन Anudan

या बाबी अंतर्गत सूक्ष्म मुल द्रव्ये, जिप्सम/गंधक, व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.

सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या 50 % किंवा कमाल रु. 500 प्रती हे. इतके अनुदान दिले जाते.

त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.

मात्र अनुदानासाठी वस्तू व सेवा कर क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहिल.

एका लाभार्थी शेतकरी यांना एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तित जास्त 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल.

कृषी अवजारे अनुदान

या बाबी अंतर्गत कृषी अवजार खरेदी साठी महिला, एस सी, एस टी, अल्प भूधारक शेतकऱ्यांना ३५ बी एच पी पेक्षा जास्त क्षमेतेच्या ट्रॅक्टर चलित अवजारासाठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.

  • पेरणी यंत्र-  रु. 20000/-
  • रिज फरो प्लांटर –  रु. 75000/-
  • बहुपिक मळणी यंत्र- रु. 250000/-
  • रोटाव्हेटर – रु. 50400/-

इतर प्रवर्गातील शेतकरी हे ४०% अनुदाना साठी पात्र असतात.

तर कृषी अवजार खरेदी साठी महिला, एस सी, एस टी, अल्प भूधारक शेतकऱ्यांना ३५ बी एच पी पेक्षा जास्त क्षमेतेच्या पॉवर ट्रिलर साठी ७०,००० पर्यंत अनुदान दिले जाते.

याचप्रमाणे या योजनेत महिला गट शेतकरी गटांना दाळमिल साठी प्रत्यक्ष खर्चाच्या ६०% किंव्हा १,२०,००० पर्यंत अनुदान दिले जाते.

याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघ यांना गोदाम बांधकाम साठी कमाल २५० मे टन क्षमतेच्या ५०% किंव्हा १२.५० लाख पर्यंत अनुदान दिले जाते.

Rashtriya Ann suraksha abhiyan 2022
Subsidy chart

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ प्रमाणपत्र
  •  ८-ए प्रमाणपत्र
  •  खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
  •  केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
  •  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  •  हमीपत्र
  •  पूर्वसंमती पत्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *