प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहिती |pradhan mantri matru vandana yojana 2023

Introduction about Pradhan Mantri Matru Vandana Yojana – PMMVY

मित्रांनो आज जाणून घेणार आहोत एका महत्वाच्या अशा योजनेबद्दल, योजनेचं नाव आहे Pradhan Mantri Matru Vandana Yojana. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही योजना केद्र सरकारचे महिला व बाल विकास मंत्रालय विभागामार्फत थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून जाणारी योजना आहे.

देशातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यु रोखण्यासाठी Pradhan Mantri Matru Vandana Yojana PMMVY ही योजना  राज्यात राबविण्यासाठी राज्य सरकारने दि.21/11/2017 च्या 153 व्या राज्य मंत्रिमडळ बैठकीत मंजुरी देऊन, योजना सुरू केली. या योजनेसाठी राज्य शासनाकडून 40% आर्थिक तरतूद करण्यात आली आहे तर उर्वरित 60%  निधीची तरतूद केंद्र सरकारद्वारे केली जाते.

pradhan mantri matru vandana yojana

Main Aim, purpose of Pradhan Mantri Matru Vandana Yojana.

GR PDF LINK

मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबत.

Pradhan mantri Matru Vandana Yojana गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा केल्यास जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारते यासाठी या महिलांना सकस आहार मिळावा, त्याचसोबतच प्रसूतीपुर्व व प्रसूतीनंतर काळामध्ये महिलांना आपल्या बुडणाऱ्या रोजगाराची चिंता पडू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात गेल्या 1 जानेवारी 2017 पासून सुरू केली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत ( NHM) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निषक, कार्यपध्दती व केंद्र शासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे या योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय, दिल्ली यांच्या दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या “मिशन शक्ती” मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रित केल्या आहेत. त्यापैकी “सामर्थ्य” या विभागात एकूण ०६ योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थीला लाभ देणे व योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून पुढीलप्रमाणे राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार असून योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व: निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

योजनेतंर्गत अनुज्ञेय लाभ व त्यांचे वितरण खालीलप्रमाणे राहील:-

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु. ६०००/- (अक्षरी रु.सहा हजार फक्त) चा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) व्दारे जमा केला जाईल.

GR yethe paha 👇👇

सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राज्यात लागू

Pradhan mantri Matru Vandana Yojana योजनेची अंमलबजावणी करताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवांचे आयुक्त हे राज्य पातळीवरील समन्वय अधिकारी असतील.

Pradhan mantri Matru Vandana Yojana implementation process

मातृत्व वंदना योजना 2022 ( Pradhan mantri Matru Vandana Yojana ) अंतर्गत केंद्र सरकारनं नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यामुळे आता लाभार्थी स्वतः ऑनलाईन नावनोंदणी करू शकतात.

Pradhan mantri Matru Vandana Yojana online application साठी सर्वात आधी लाभार्थ्याला www.Pmmvy-cas.nic.in या साईटवर लॉगिन करावं लागेल. या वेबसाईट वर आपलं नाव नोंदवावं ( registration) लागेल. Pradhan mantri Matru Vandana Yojana application प्रकिया ऑनलाईन असल्यानं आपण घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून अगदी सहज रजिस्ट्रेशन करता येते.

Pradhan mantri Matru Vandana Yojana required documents

  • Pradhan mantri Matru Vandana Yojana साठी लाभाच्या पहिल्या टप्प्यातील तथा नोंदणीसाठी ( registration) प्रपत्र- 1 अ, माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र (MCP Card) व आधार संलग्न बँक/पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक असेल.
  • लाभाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रपत्र- 1 ब माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र वर किमान एक प्रसुतीपुर्व तपासणी (ए.एन.सी.) ची नोंद असणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्यास ते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 अ आणि पोस्ट खाते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र- 2 ब चा वापर करावा.
  • आधार संदर्भात नोंदणी/ सुधारणा करण्यासाठी लाभार्थी प्रपत्र- 2 क चा वापर करेल.
  • प्रस्तुत योजनेच्या नोंदणीबाबतच्या माहितीमध्ये – पत्ता/मोबाईल नंबर/बँक खाते क्रमांक/नावात बदल/आधार क्रमांक सुधारणा करण्यासाठी प्रपत्र- 3 चा वापर करावा.

pradhan mantri Matru Vandana Yojana साठी लागणारी कागदपत्रे प्रपत्रे अंगणवाडी सेविका/ए.एन.एम. तसेच आरोग्य संस्थेमध्ये विनाशुल्क प्राप्त उपलब्ध करून दिली जातील. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे आधार कार्ड / बँक तथा पोस्ट खाते नसल्यास सदर कार्ड व खाते काढण्यासाठी अंगणवाडी सेविका / ए.एन.एम.या मदत करतील अशी ही तरतूद आहे.

Pradhan mantri Matru Vandana Yojana important changes

PMMVY अंतर्गत नियमानुसार मातृत्व लाभ प्राप्त करण्यासाठी, लाभार्थीने डेटाबेसमध्ये कॅप्चर केलेले महिला आणि तिच्या पतीचे आधार तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. मात्र महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या माता किंवा गरोदर महिलांसाठी असलेल्या इतर योजनांमध्ये अशी कोणतीही आवश्यकता नाही असा निर्णय घेण्यात आला आहे

NITI आयोगाच्या विकास आणि देखरेख मूल्यमापन कार्यालयाने PMMVY सह महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचे मूल्यमापन केले आहे आणि त्यांच्या शिफारशींचा विचार करण्यात आला आहे.  त्यानुसार, मिशन शक्ती अंतर्गत PMMVY घटकाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पतीची लेखी संमती आणि आधार अनिवार्य निकष नसावेत, एकल माता आणि सोडून दिलेल्या आईचा समावेश करणे सुलभ व्हावे यासाठी परिकल्पना करण्यात आली आहे.

How to avail benefits of Pradhan mantri Matru Vandana Yojana in rural area

  • प्राथमिक आरोग्य केंद्रातील ए.एन.एम.(नर्स) पात्र लाभार्थ्यी महिलांना विनाशुल्क (मोफत) विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देवून परिपुर्ण अर्ज स्विकारुन तो प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकारी यांच्याकडे सादर करेल. हा अर्ज परिपुर्ण भरण्याची जबाबदारी ही ए.एन.एम. ची राहील.
  • प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील.
  • विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यामार्फत लाभार्थ्यांच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल व राज्य स्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ (DBT) अदा करण्यात येईल.

How to avail benefits of Pradhan mantri Matru Vandana Yojana in urban area

 ए.एन.एम.(नर्स) पात्र लाभार्थ्यी महिलांना विनाशुल्क (मोफत) विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देवून परिपुर्ण अर्ज स्विकारुन तो हेल्थ पोस्ट वैदयकिय अधिकाऱ्यांमार्फत अर्जातील माहिती तपासून तो अर्ज नगर परिषद, पालिका, पंचायत च्या मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करेल. विहित संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या अर्जाची माहिती मुख्याधिकारी भरतील.

How to avail benefits of Pradhan mantri Matru Vandana Yojana in municipal corporation area

मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात ए.एन.एम.(नर्स) पात्र लाभार्थ्यी महिलांना विनाशुल्क (मोफत) विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देवून परिपुर्ण अर्ज स्विकारुन तो हेल्थ पोस्ट वैदयकिय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैदयकिय अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येईल. संबंधित निर्धारित वैदयकिय अधिकारी अर्जातील माहिती तपासून विहित संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या अर्जाची माहिती भरेल. यावर अतिरिक्त आयुक्त/सह आयुक्त यांचे सनियंत्रण राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: