या जिल्ह्याचा रब्बी पिकवीमा मंजूर | Pikvima rabbi 21

रब्बी हंगामात नुकसानग्रस्त ४६,१५९ शेतकऱ्यांना १८.७८ कोटींचा पीक विमा मंजूर, pikvima rabbi 21

Pikvima rabbi 21

pikvima rabbi 21 manjur nanded

प्रधानमंत्री पीकविमा योजना ( pmfby) अंतर्गत रब्बी हंगाम (pikvima rabbi 21 ) २०२१-२२ मध्ये गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी या पिकांचा विमा भरलेल्या व नैसर्गिक आपत्ती मुळे उत्पन्नात घट आलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण ४६ हजार १५९ विमाधारकांसाठी ₹१८ कोटी ७८ लाखांचा विमा मंजूर झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२०२२ मध्ये इफ्को टोकीयो जनरल विमा कंपनीकडून राबविण्यात आली होती.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांत ही योजना राबविण्यात आली होती.

प्रधानमंत्री पीक विमा ( pmfby ) pikvima rabbi 21 या योजनेत जिल्ह्यातील एकूण ७६ हजार ५०७ शेतकऱ्यांनी आपल्या गहू, ज्वारी , हरभरा पिकांचा पीक विमा भरला होता. जिल्ह्यातील ७६ हजार ५०७ अर्जदार शेतकऱ्यांनी ५५ हजार ३६९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.

हा ( pikvima rabbi 21 ) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

रब्बी हंगाम २०२१ मध्ये गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकाला वातावरणाचा फटका बसल्याने नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, मुदखेड, मुखेड व नायगाव या ९ तालुक्यांतील ४६ हजार १५९ शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे. या शेतकऱ्यांना पिकांच्या भरपाईपोटी १८ कोटी ७८ लाख ९६ हजारांचा विमा परतावा मंजूर होऊन वाटप प्रक्रिया सुरू आहे.

पीकनिहाय मंजूर विमा व शेतकरी संख्या

गहू (जि) २,३५१ शेतकरी – १ कोटी १३ लाख

हरभरा ३,८६३३ शेतकरी – १५ कोटी ८२ लाख

रब्बी ज्वारी ५,३४५ शेतकरी – १ कोटी ८३ लाख

एकूण ४६,१५९ शेतकरी – १८ कोटी ७८ लाख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: