पशुसंवर्धन विभागाच्या वतीने Navinya Purna Yojana 22-23 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 75% अनुदानावर २,४,६ गाई म्हशीच्या वाटपाला ७५% पर्यंत अनुदान दिलं जात, जाणून घेऊयात काय आहे योजना सविस्तर.
Navinya Purna Yojana 22-23 – गाई म्हशी गट वाटप
या योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा पशू संवर्धन विभागामार्फत नेहमीच प्रयत्न केला जातो.
याच पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकऱ्या करिता राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील एक महत्वाची योजना म्हणजे नाविन्य पूर्ण योजना दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या वैयक्तिक लाभाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षा पासुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे.
याच बरोबर या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.
यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
२,४,६ गाई म्हशी गट वाटप योजनेअतर्गत संकरित गाय एच.एफ., जर्सी
म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातीच्या गाई करिता अनुदान दिले जाते.
Navinya Purna Yojana 22-23 लाभार्थी निवडीचे निकष
नावीन्यपूर्ण योजना गाई म्हशी गट वाटप योजनेअंतर्गत खालील प्रमाणे प्राधान्य क्रमाने लाभार्थी पात्र होतात.
१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )
Navinya Purna Yojana 22-23 आवश्यक कागदपत्र
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
- सातबारा (अनिवार्य)
- ८ अ उतारा (अनिवार्य)
- अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
- आधारकार्ड (अनिवार्य )
- ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
- अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
- रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
- बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
- रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
- दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
- वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
- रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
Navinya Purna Yojana 22-23 subsidy
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र. | बाब | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) |
---|---|---|
1 | संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे | ८०,००० |
2 | जनावरांसाठी गोठा | ० |
3 | स्वयंचलित चारा कटाई यंत्र | ० |
4 | खाद्य साठविण्यासाठी शेड | ० |
5 | ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा | ५,०६१ |
एकूण प्रकल्प किंमत | ८५,०६१ |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. | प्रवर्ग | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
---|---|---|
1 | शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के | ६३,७९६ |
1 | स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के | २१२६५. ३३ |
2 | शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के | ४२,५३१ |
2 | स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के | ४२,५३१ |