पीक विमा ( Pik vima form ) भरताना बऱ्याच वेळा चुका होतात, अशी चूक झाली असल्यास करावं लागणार ताबडतोब हे काम. Pik vima policy corrction 2022
Pik vima form Correction 2022
पिक विमा फॉर्म भरत असताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुमच्यासाठी पीक वीमा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी एक लिंक देण्यात आलेली आहे.
Google Doc या लिंक च्या माध्यमातून आता तुमच्याकडून चुकलेला पिक विम्याचा फॉर्म तुम्ही रिव्हर्ट ( Pik vima form revert ) करू शकता किंवा रिजेक्ट (Reject ) करू शकता.
पिक विमा ( Crop insurance ) भरत असताना बऱ्याच वेळा चुकीचे पीक टाकण्यात येते, चुकीचा गट नंबर टाकण्यात येतो, शेतकऱ्याचे नाव चुकतं किंवा एखाद्या शेतकऱ्याचा अकाउंट नंबर, बँकेचा आयएफएससी कोड सुद्धा चुकतो.
अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा पिक विम्याचा फॉर्म रिव्हर्ट घेऊन सुधरायचा असतो किंवा याच्यामध्ये चुकीचं पीक टाकण्यात आलेला असेल, चुकीचा गट टाकण्यात आलेला असेल तर असा फॉर्म तुम्हाला रिजेक्ट करावा लागतो.
याच्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला गुगल डॉक ( Google Doc Link ) माध्यमातून एक फॉर्म भरायचा आहे.
Crop insurance policy Correction Link
या फॉर्मच्या माध्यमातून आपली माहिती सादर करून आपला फॉर्म रिव्हर्ट किंवा रिजेक्ट साठी मागवायचा आहे.
यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपला सीएससीचा आयडी नंबर ( csc id ) द्यायचा आहे. आपलं vle च नाव, कोणत्या जिल्ह्यामधून आपला Vle आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे.
याच्यानंतर पीक विमा पॉलिसी रिसिप्ट ( Crop insurance policy number ) नंबर जो पावती वरती आलेला अपलिकेशन नंबर असेल तो 21 digit एप्लिकेशन नंबर द्यायचा आहे.
याच्यामध्ये जर चुकीचे पीक टाकण्यात आलेला असेल, चुकीचा गट टाकण्यात आलेला असेल किंवा शेतकऱ्याचे नाव चुकलेला असेल अशा सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला हा फॉर्म रिजेक्ट करायचा असतो. आणि शेतकऱ्याचा अकाउंट नंबर आयएफएससी कोड चुकलेला असेल किंवा बँकेचे नाव चुकलेला असेल अशा जर काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला हा फॉर्म रिव्हर्ट मध्ये घ्यायचा असतो.
याच्यामध्ये रिव्हर्ट असेल किंवा रिजेक्ट करायचं असेल त्याचे कारण सुद्धा त्या ठिकाणी द्यायचे आहे.
यानंतर अर्ज नाकारण्याचा कारण सिलेक्ट करावं लागणार आहे. चुकीचे पीक टाकण्यात आले, गट नंबर चुकी चा टाकण्यात आलाय, शेतकऱ्याचे नाव चुकले, अकाउंट नंबर चुकलंय, जे कारण असेल ते कारण सिलेक्ट करा.
आणि हा फॉर्म सबमिट करायचंय, हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल.
यानंतर ती पॉलिसी तुम्हाला रिव्हर्ट मध्ये पाठवली जाईल आणि तुम्ही जर रिजेक्ट साठी दिलेले असेल त्यांनी रिजेक्त केले जाईल आणि पुन्हा एकदा तुम्ही ती पॉलिसी सुधारून नव्याने भरू शकता ज्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2022 आहे.
याचबरोबर रेव्हर्ट आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकता.
तर अशा प्रकारे ही एक लिंक देण्यात आलेली आहे च्या माध्यमातून आपला आपल्या आपल्याकडून जर एखाद्या शेतकऱ्याचा पिक विमा चा जर फॉर्म ( Pik vima form ) चुकलेला असेल तो त्या ठिकाणी सुधारू शकता.