नवा बदल नवी योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना | Pik vima yojana 2022 Beed model

नवा बदल नवी योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राज्यात राबविण्यास मंजुरी, अर्ज सुरू.

Pik Vima Yojana 2022

Pik Vima Yojana 2022 GR

प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करीता राज्यात राबविणेबाबत.

खरीप हंगाम सन 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) राज्यात ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राबविण्याकरिता ०१ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.

ही योजना राज्यात २०२२ मध्ये राबवत असताना या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

याच योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी दि 31 जुलै पर्यंत आपला विमा हप्ता भरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले आहे.

राज्यात २०२१ – २३ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड मॉडेल ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) नुसार लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाने कप ॲन्ड कॅप मॉडेल नुसार बीड पॅटर्न Pik vima beed pattern लागू केला आहे.

या योजनेंतर्गत अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पुर, कीड आणि रोगासारख्या संकटामुळे शेतीच्या होणा-या नुकसानापोटी शेतक-यांना भरपाई देण्यात येणार आहे.

या योजनेत 80-110 सुत्रानुसार बीड पॅटर्न पिक विमा योजना ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राज्यभर राबविण्यात येणार आहे.

या पॅटर्न नुसार विमा कंपन्यांना नुकसान भरपाई पोटी 110 टक्के पेक्षा अधिक रक्कम द्यावी लागली तर त्याचा भार राज्य व केंद्र शासन उचलणार आहे.

तर या उलट कंपनीला 80% पेक्षा कमी रक्कम द्यावी लागल्यास शेतक-यांना दिलेली मदत अधिक 20 % नफा ठेऊन कंपनीला उर्वरीत रक्कम राज्य सरकारला परत द्यावी लागणार आहे.

या योजनेअंतर्गत पिक विमा काढतांना शेतक-यांना रब्बीसाठी 1.5 टक्के तर खरीप हंगामासाठी 2 टक्के इतका विमा हप्ता भरावा लागेल.

तर खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस व कांदा पिकासाठी 5 टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागणार आहे. विमा हप्त्याची उर्वरीत रक्कम राज्य आणि केंद्र सरकार समान प्रमाणात भरणार आहे.

यासाठी राज्यात खालीलप्रमाने जिल्हा निहाय पीक विमा कंपनी मार्फत विमा योजना राबवली जाणार.

अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एच डी एफ सी अर्गो इन्शुरन्स कंपनी असणार आहे.

सोलापूर, जळगाव, सातारा, औंरगाबाद, भंडारा,पालघर,रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी असणार आहे.

हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्यासाठी आयसी आयसी आय लोंबार्ड कंपनी असणार आहे.

नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया ही कंपनी असणार आहे.

तर बीड जिल्ह्यासाठी बजाज अलायंज या कंपनीच्या माध्यमातून ही पीक वीमा योजना राबवली जाणार आहे.

सदर पिक विमा योजना ही अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी असणार आहे.

यात खरिप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेंतर्गत खरीप हंगाम 2022 या हंगामाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद घेण्यात यावी.

विमा योजनेत विमा घेतलेले पिक व ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतिम गृहित धरण्यात येईल.

Watch How to apply pik vima on mobile

या योजनेअंतर्गत भात या पिकासाठी ४०,००० रुपये आहे तर विमा हप्ता ८०० रुपये असेल.

ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३०,००० हजार रुपये तर विमा हप्ता ६०० रुपये, बाजरी ३०,००० संरक्षित रक्कम तर विमा हप्ता ६००.

नाचणी १३७५० रुपये विमा संरक्षित तर विमा हप्ता २७५ रुपये. भुईमुंग पिकासाठी विमा संरक्षण ४२ हजार रुपये विमा हप्ता ८५० रुपये,

सोयाबिन विमा संरक्षण 49 हजार रुपये विमा हप्ता ९९0 रुपये, कारळे या पिकासाठी १३७०० वीमा संरक्षित रक्कम तर विमा हप्ता २७५ रुपये असणार आहे.

मुग व उडिद विमा संरक्षण 20 हजार रुपये विमा हप्ता 400 रुपये, तूर विमा संरक्षण 35 हजार रुपये विमा हप्ता 700 रुपये व कापूस पिकासाठी विमा संरक्षण 52 हजार रुपये विमा हप्ता 2 हजार 600 रुपये मका ३५००० ७११ शेतक-याला भरावा लागणार आहे.

सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के असून विमा हप्ता ज्वारी, भूईमूंग, सोयाबीन, मुग, उडिद, तूर पिकासाठी 2 टक्के तर कापूस पिकासाठी 5 टक्के विमा हप्ता असणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी शेतक-यांनी तात्काळ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी, संबधित तालुका कृषि अधिकारी तसेच जवळच्या बँकेशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: