देशात एक देश एक खत ( One Nation One Fertilizer ) योजनेची अंमलबजावणी सुरु. Pradhan mantri Bhartiya jan urvrak pariyojana 2022
One Nation One Fertilizer Pradhanmantri Bhartiya janurvrak pariyojana 2022 – PMBJP
केंद्र शासनाच्या मंजुरीनुसार देशात एक राष्ट्र एक खत ( One Nation One Fertilizer ) संकल्पनेतून खत अनुदान योजनेअंतर्गत ( fertilizer subsidy scheme ) संपूर्ण देशासाठी खतांचा एकच ब्रँड व एकच लोगो सादर करून प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना ( Pradhan mantri Bhartiya janurvrak pariyojana 2022 – PMBJP ) राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
याच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खते व रसायन मंत्रालयाकडून २४ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश काढून खत उत्पादक कंपन्यांना काही सूचना दिल्या आहेत.
खतांच्या पिशवीच्या एका बाजूला पूर्ण छपाई केली जाईल ज्यामध्ये प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना PMBJP नाव व लोगो हा खताच्या पिशवीच्या आकाराच्या दोन तृतीयांश भागात छापला जाईल तर उर्वरित भागांपैकी एक तृतीयांश भागात कंपनीचे नाव व खतासंबंधी माहिती छापली जाईल.
या छपाईचे नमुने खालील प्रमाने असतील
Urea – Bharat Urea
DAP – Bharat DAP
MOP – Bharat MOP
NPK Bharat NPK
याचबरोबर खत कंपन्यांना इतर अटी व शर्तींचा उल्लेख, मेट्रोलॉजी कायदा Metrology ac, पॅकेज्ड कमोडिटी कायदा packaged commodities actआणि कृषी विभाग आणि FCO दिनांक 9 नोव्हेंबर 1987 रोजी 1985 जारी केलेला खत कायदा याबद्दल हि माहिती छापावी असा सल्ला देण्यात आला आहे.
15 सप्टेंबर 2022 पासून जुन्या डिझाईनची च्या बॅग खरेदी न करण्याचा सल्ला खत कंपन्यांना देण्यात आला आहे व एक देश एक खत संकल्पना अंतर्गत नवीन पिशव्या ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी सादर केल्या जातील. जुने डिझाईन बाजारातून काढून टाकण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.