तुमच्या पाल्यांना मिळेल मोफत शिक्षण – Navoday Admission 2023 start

शैक्षणिक वर्ष २०२३ करिता नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू, आपल्या पाल्यांना मिळेल मोफत शिक्षण. पहा कसा करायचा अर्ज – Navoday Admission 2023

ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI

Navoday Admission 2023

निवड चाचणी परीक्षेसाठी 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता  5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 6 वी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयात ( Navoday Admission 2023 ) निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन ( ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI ) भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय हे शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या संपूर्णत: निवासी स्वरुपाचे विद्यालय आहे.

( ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI ) हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. पालक हे अर्ज कोठूनही अपलोड करु शकतात.

निवड चाचणी परीक्षा ही शनिवार, दि. 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान होणार आहे.

Date of Exam – 29-04-2023.

प्रवेश अर्जसाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, विद्यार्थी व पालकाची सही (स्कॅन), विद्यार्थ्याचा फोटो जेपीजी फॉरमॅटमध्ये (साईज 10 ते 100 के.बी.),

इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सर्टीफिकेट (स्कॅन कॉपी) आवश्यक आहेत. सदर सर्टीफिकेटचा नमुना विद्यालयाच्या http://www.navodaya.gov.in या वेबसाईटवर डॉऊनलोड लिंकमध्ये उपलब्ध आहे.

तसेच https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration याच वेबसाईटवरुन विद्यार्थी दिलेल्या लिंकद्वारे प्रवेश अर्ज करतील. अर्ज अपलोड करण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2023 हा आहे.

 प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तृत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Hingoli/en/home & www.navodaya.gov.in  या वेबसाईटवर उपलब आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: