अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई (nuksan bharpai vatap ) वाटपासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देश, तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्त.
nuksan bharpai vatap 2022
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी वाटपासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, मदतनिधी वाटपात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचे यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
सन २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्राप्त झालेला मदत निधी वेळेच्या आत वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
जिल्ह्यात माहे जुलै व ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरीता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार यांना वितरीत करण्यात आलेले आहे.
परंतु राज्य ग्रामसेवक युनियन संघटना व महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटना यांनी सदर कामावर आमचा बहिष्कार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे.
ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे आणि ग्रामसेवक व कृषि सहायक ह्यांची कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये अशोभनिय असल्याने त्यांना समज देवून निधी वाटपाकरीता याद्या तयार करण्याची कार्यवाही करणेबाबत सुचित करण्याचे व समज देवून सुध्दा संबंधितांनी nuksan bharpai vatap निधी वाटपाची कार्यवाही न केल्यास कामकाज टाळणा-या कर्मचा-यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करून करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
अतिवृष्टी व पुर यामुळे शेतीपिकांचे नुकसान होवुन जिल्ह्यातील शेतकरी आर्थीक अडचणीत सापडलेले आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण तसेच पुढील कालावधीत दिवाळीचा सण असल्यामुळे बाधीत शेतकऱ्यांना वेळेच्या आत शासनातर्फे प्राप्त मदत निधी वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
हे nuksan bharpai vatap काम तत्परतेने पुर्ण करून घेण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामुळे एकंदरीत हा विषय आता मिटतो की जास्तच चिघळतो हे देखील आता पाहण्यासारख असणार आहे.