वृक्ष, फळबाग, फुल पीक लागवड अनुदान योजना मनरेगा | mregs falbag scheme

वृक्ष, फळबाग, फुल पीक लागवड अनुदान योजना मनरेगा | mregs falbag scheme

mregs falbag scheme

mregs falbag scheme

राज्यातील दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/ वृक्ष व फूलपिक लागवड कार्यक्रम ठरवलेला आहे.

पुढील २५ वर्षे दरवर्षी सरासरी एक लक्ष हेक्टर फळझाड/ वृक्ष / फूलपिक लागवड होईल जेणेकरुन स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा या योजनेअंतर्गत एकूण २५ लक्ष हेक्टर लागवड झाली असेल अशे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

सन १९९० -९१ मध्ये राज्यात प्रथमतः रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड योजना राबविण्यात आली. सदर योजनेमुळे राज्यात फळबाग पिकाखाली क्षेत्र वाढण्यास मदत झाली व योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

फळपिकाचे उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर तसेच व्यावसायिक पद्धतीने फळबागांचे नियोजन केल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळण्यास मदत झाली. त्यामुळे आजच्या घटकेला महाराष्ट्र राज्य फलोत्पादन पिकाचे उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर आहे.

शेतकऱ्यांचा विविध नविन फळ / फुलपिकांची सलग जमिनीमध्ये तसेच बांधावर व पडीक जमिनीमध्ये लागवड करण्याकडे कल वाढत आहे. इतर राज्ये ही नवनवीन फळपिकांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करून शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी मदत करीत आहेत.

ही सस्तुस्थिती लक्षत घेता राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तसेच भविष्यात फलोत्पादन पिकास असलेला वाव लक्षात घेऊन नवीन फळपिके व फुलपिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना त समावेश करण्यात येत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर व शेतक-यांच्या शेतजमीनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीवरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम ही राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित) मधील अनुसूची दोन मधील परिछेद ४ मध्ये नमुद करण्यात आल्याप्रमाणे वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर फळझाड व फूलपिक लागवड कार्यक्रम ग्राम पंचायती तसेच कृषी व फलोत्पादन विभागामार्फत आणि वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत ही योजना राबवली जात आहे.

mregs falbag scheme लाभार्थी प्राधान्यक्रम

 • अ) अनुसूचित जाती (Schedule Caste)
 • ब) अनुसुचितजमाती (Schedule Tribes)
 • क) भटक्या जमाती (Nomadic Tribes)
 • ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती De-notified Tribes)
 • इ) दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे (Families below the poverty line) फ) स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (Women-headed households)
 • ग) दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (physically handicapped headed Households)
 • ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी (benificiaries of land reforms)
 • ई) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, –
 • ज) “अनुसुचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्के मान्य करणे) अधिनियम, २००६ (२००७ चा २) खालील पात्र लाभार्थी (benificiaries under Schedule Tribes and other Traditionl Forest Dwellers)
 • उपरोक्त प्रवर्गामधील (अ) ते (ज) पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि कर्ज माफी योजना, २००८ या मध्ये व्याख्या केलेल्या अल्प भूधारक [१ हेक्टरपेक्षा जास्त पण २ हेक्टर (५ एकर) पर्यंत जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] व सीमांत भूधारक शेतकरी [१ हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] यांच्या जमीनीवरील कामांना शर्तीच्या अधीनतेने प्राधान्य देण्यात येते.
 • मग्रारोहयोसाठी जॉबकार्ड धारक वरील “अ” ते “ज” प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

mregs falbag scheme लाभ क्षेत्र मर्यादा

या योजनेअंतर्गत फळझाड/ वृक्ष / फूलपिक लागवडीसाठी कमीत कमी ०.०५ हेक्टर व जास्तीत जास्त २.० हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील, इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवीत असताना कूळाची संमती घेण्यात यावी.

mregs falbag scheme लाभार्थी निवड पद्धत

mregs falbag scheme योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता गावात दवंडी देऊन / गावात उपलब्ध असलेले सर्व व्हाट्सएप ग्रुपमध्ये माहिती देऊन सर्व इच्छुक व्यक्ती पर्यंत माहिती पोहोचवायची आहे. अर्ज करण्याकरिता ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महसूली गावात २४ तास अर्ज टाकता येईल अशा ठिकाणी अर्ज पेटी ठेवावयाची आहे. शक्य तेवढे असे “अर्ज पेटी” सार्वजनिक इमारत जसे अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदिर येथे लावण्यात यावी अशे शासनाचे निर्देश आहेत.

mregs falbag scheme लाभासाठी इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब- संमती पत्र “अर्ज पेटीत टाकावे. त्यात फळबाग/ फूलपिकाचे कार्य ग्रामपंचायत किंवा फलोत्पादन (कृषी) विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख लाभार्थ्यास करावा लागेल.

ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

“पत्र पेटी” दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मग्रारोहयोच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरले जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायती ची असेल.

mregs falbag scheme ग्रामसभा मंजुरी

मग्रारोहयोच्या कार्यपध्दती प्रमाणे कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे. तथापि, ०५ ऑगस्ट, २०२० तसेच ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन निर्णया प्रमाणे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने लाभार्थ्यांची निवड करता येते. योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या यादीस त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेत अवलोकनार्थ ठेवण्यात यावे.

mregs falbag scheme समाविष्ट फळ , फुल, वृक्ष लागवड

१) आंबा २) काजू ३) चिकू ४) पेरु ५) डाळिंब ६) संत्रा ७) मोसंबी ८) कागदी लिंबू ९) नारळ १०) बोर ११) सिताफळ १२) आवळा १३) चिंच (विकसीत जाती) १४) कवठ १५) जांभुळ १६) कोकम १७) फणस १८) अंजीर १९) सुपारी

२०) बांबू २१) साग २२) जड्रोफा २३) गिरीपुष्प २४) कडीपत्ता २५) कडूलिंब २६) सिंधी २७) शेवगा २८) हदगा २९) पानपिंपरी ३०) केळी (३ वर्ष) ३१) ड्रॅगनफ्रुट ३२) अॅव्हाकॅडो ३३) द्राक्ष ३४) चंदन ३५) खाया ३६) निम ३७) चारोली ३८) महोगनी ३९) बाभूळ

४०) अंजन ४१) खैर ४२) ताड ४३) सुरु ४४) रबर ४५) महारुख ४६) मँजियम ४७) मेलिया डुबिया ४८ ) तुती (मलबेरी) ४९) ऐन ५०) शिसव ५१) निलगिरी ५२) सुबाभुळ ५३) शेमी ५४) महुआ ५५) गुलमोहर ५६) बकान निब ५७) चिनार ५८) शिरीष ५९) करवंद

फुलझाड – १) गुलाब २) मोगरा ३) निशीगंध ४) सोनचाफा

औषधी वनस्पती- १) अर्जुन, २) असान, ३) अशोका, ४) बेहडा, ५) हिरडा, ६) बेल, ७) टेटु, ८) डिकेमाली, ९) रक्तचंदन, १०) रिठा, ११) लोध्रा, १२) आइन, १३) शिवन, १४) गुग्गुळ, १५) बिब्बा १६) करंज

मसाल्याची पिके – १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ

mregs falbag scheme फळझाड / वृक्ष लागवडीसाठी मुदत

पावसाळ्याचा विचार केल्यास फळ / फुलझाड / वृक्ष लागवडीचा कालावधी दिनांक १ जून ते ३१ डिसेंबर पर्यंत योग्य असते. जमीनीतील आर्द्रता योग्य असल्यास या कालावधीत वाढ करण्याचे अधिकार जिल्हा स्तरीय समितीस राहील. तथापि सिंचनाची व्यवस्था असल्यास वर्ष भरात केव्हाही लागवड करता येईल. त्यासाठी इतर प्राधिका- याच्या मंजूरीची आवश्यकता असणार नाही.

mregs falbag scheme आर्थिक मर्यादा

प्रत्येक लाभार्थ्यास २.० हेक्टर पर्यंत फळबाग / वृक्ष लागवड / फुलपिक लागवड अनुज्ञेय आहे. त्यामुळे विविध फळझाडे आणि फुलपिकसाठी शासन मान्यतेने वेळोवेळी जे आर्थिक मापदंड निश्चित करतील त्या आधारावर २.० हेक्टर साठी एखाद्या फळबाग, वृक्ष किंवा फुलपिकसाठी लागणारी प्रत्यक्ष अंदाजपत्रकीय मंजूर रक्कम ही आर्थिक मर्यादा राहील.

तथापि, फळबागाचे वैयक्तिक लाभ कोणत्याही एका जॉबकार्ड वर एका वर्षात १०० दिवसांपर्यंत मंजूरी देण्यात यावी. १०० दिवसांपेक्षा अधिक काम करण्याची गरज असणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कामाव्यतिरिक्त सार्वजनिक कामांवर काम द्यावे.

त्यासाठी सर्व ग्राम रोजगार सेवक/ ग्रामसेवक / कृषी सहाय्यक यांनी लाभार्थ्यांचे गट तयार करून नियोजन बद्ध पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे. म्हणजेच वैयक्तिक कामात एका जॉबकार्ड धारकास एका वर्षात १०० दिवसांपेक्षा अधिक लाभ देण्यासाठी अधिक जॉबकार्ड धारकांची मदत घ्यावी.

mregs falbag scheme अर्जाचा नमुना PDF

येथे क्लिक करा 👇 DOWNLOAD PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: