AHMAHABMS Sheli gat – ७५% अनुदानावर शेळी गट वाटप

राज्यात राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ( AHMAHABMS sheli gat vatap 2023 ) लाभार्थ्यांना ५० ते ७५% अनुदानावर शेळी मेंढी गट वाटप योजना राबविली जाते, पाहुयात काय आहेत अटी शर्ती पात्रता अनुदान व कागदपत्र

AHMAHABMS Sheli gat

AHMAHABMS sheli gat vatap 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना

राज्यात शेळी/मेंढी गटवाटप अनुदान योजना ही राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना या प्रकारात ( navinya purna yojana ) सन २०११-१२ पासून कार्यान्वित आहे.

या दोन्ही योजनांतर्गत लाभधारकांना लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांची शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळून शेळ्या / मेंढ्यांचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेऊन अनुदान दिले जाते.

AHMAHABMS sheli gat vatap 2023 अटी शर्ती

Navinya purna yojana योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातीच्या १० मेंढ्या + १ नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल. शेळी / मेंढ्यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहील.

खुल्या व इमाव प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५०% हिस्सा राज्य शासनाचा राहील व ५० % हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वत: किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत ४५ टक्के बँकेचे कर्ज) उभारणे आवश्यक आहे.

तर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ % हिस्सा राज्य शासनाचा राहील व २५ % हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वत: किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत २० टक्के बँकेचे कर्ज) उभारणे आवश्यक आहे.

AHMAHABMS sheli gat vatap 2023 लाभार्थी पात्रता प्राधान्यक्रम

१) दारीद्रय रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)

५) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. १ ते ४ मधील)

महत्वाचे नियम

या योजनेत पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कोअर बँकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडणे, अथवा लाभार्थ्याचे कोअर बँकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचतखाते असल्यास, सदर खाते योजनेशी जोडावे लागेल.

या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे वर्ग केली जाते, लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पॅन क्रमांक बचत खात्याशी संलग्न करावा.

या योजनेअंतर्गत शेळया / बोकडाची तसेच मेंढ्या / नर मेंढ्यांची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ, पुणे यांचेकडून करण्यात येईल. महामंडळाकडे शेळ्या / बोकड / मेंढ्या / नर मेंढे उपलब्ध नसल्यास, अधिकृत बाजारातून खरेदी करण्यास मुभा दिली जाते.

अर्ज कसा करावा

या योजनेच्या लाभासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात. यासाठी AHMAHABMS https://ah.mahabms.com/ च्या संकेत स्थळा वरती अर्जदाराला अर्जदार नोंदणी व अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे.

किंव्हा लाभार्थी AHMAHABMS MOBILE ANDROID APPLICATIONMAHABMS APP वरून ही अर्ज करू शकतात.

Watch how to apply ahmahabms scheme

शेळी / मेंढी गटाचा विमा

शेळ्यांची / मेंढ्यांची खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याने त्यांचा विमा लगेच उतरवून घेणे बंधनकारक राहील. ५० टक्के विमा रक्कम लाभार्थ्याने भरणे आवश्यक आहे.

शेळी / मेंढी गटाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त (पदनामाने) यांच्या संयुक्त नावे उतरविण्यात येतो.

गटातील विमा संरक्षीत शेळ्या / बोकडाचा / मेंढी / नर मेंढा यांचा मृत्यू झाल्यास प्राप्त होणाऱ्या विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यांने पुन्हा शेळ्या / बोकड / मेंढ्या / नर मेंढे खरेदी करणे आवश्यक असते.

यासाठी लाभार्थ्याने विहित नमुन्यात बंधपत्र करुन देणे आवश्यक राहील.

AHMAHABMS sheli gat अनुदान

या योजनेत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५% तर इतर लाभार्थ्यांना ५०% अनुदान दिले जाते

AHMAHABMS sheli gat

आवश्यक कागदपत्र

  • १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  • २) * सातबारा (अनिवार्य)
  • ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  • ४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  • ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  • ६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  • ७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  • ८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  • ९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • १०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • ११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  • १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

Navinyapurn yojana GR PDF

शेळी /मेंढी गट वाटपाबाबत राज्यस्तर व जिल्हा स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निश्चित केलेल्या शेळी / मेंढी यांच्या खरेदी किंमतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *