मनरेगा अंतर्गत १००% अनुदानावर फुल, फळ, मसाला पीक लागवडी साठी नवीन अंदाजपत्रक – Dragon fruit estimate 2023
Dragon fruit estimate 2023 MGNREGA
राज्यात ३० मार्च २०२२ च्या शासन निर्णयान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/ वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रम कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे.
१) केळी (३ वर्ष)
२) ड्रॅगनफ्रुट
३) अॅव्हाकॅडो
४) द्राक्ष,
फुलझाड – सोनचाफा,
मसाल्याची पिके –
१) लवंग,
२) दालचिनी,
३) मिरी
४) जायफळ इत्यादी. पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
याच बरोबर केंद्र शासनाने दिनांक २८ मार्च २०२२ असाधारण राजपत्रातील भाग ॥ खंड ३ उपखंड (i) अन्वये योजनेतील अकुशल मजूरीच्या दरात सुधारणा केली असून दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून महाराष्ट्र राज्याकरीता मजूरीचा दर रुपये २५६/- प्रति मनुष्यदिन याप्रमाणे निश्चित केलेला आहे.
या सुधारित मजुरी दराच्या अनुषंगाने आयुक्त (कृषी), पुणे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड योजनेच्या अंदाजपत्रके सुधारित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.
संचालक, फलोत्पादन यांच्या प्रस्तावातील नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १) केळी (३ वर्ष) २) ड्रॅगनफ्रुट ३) अॅव्हाकॅडो ४) द्राक्ष, फुलझाड • सोनचाफा, मसाल्याची पिके- १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ इत्यादी पिकांबाबत आर्थिक मापदंडाच्या प्रस्तावास देण्यात आली आहे.
शासन निर्णय :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड योजनेंतर्गत आर्थिक मापदंडा
दिनांक ३० मार्च, २०२२ रोजाच्या शासन निर्णयान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/ वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रमाअंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १) केळी (३ वर्ष) २) ड्रॅगनफुट ३) अॅव्हाकॅडो ४) द्राक्ष, फुलझाड सोनचाफा, मसाल्याची पिके – १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ इत्यादी पिकांबाबत सुधारित मजूरी दर रु २५६/- प्रमाणे अकुशल भागाचे मापदंड तसेच सामुग्रीकरीता कलमे / रोपांबाबत संचालक फलोत्पादन पुणे यांनी दिनांक २४ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रस्तावित केल्यानुसार नविन पिकांबाबत मनुष्यदिन संख्या गृहीत धरुन रासायनिक खतांचा खर्च वगळून “परिशिष्ट अ” प्रमाणे आर्थिक मापदंड निश्चित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
रासायनिक खतांसाठी लागणारे मनुष्यदिन शेणखत या बाबीमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
सुरवातीला खड्डा भरताना रासायनिक खतांमध्ये लागणारे सुपर फॉस्पेट, किटकनाशक भुकटी व इतर बाबी २ किलो पर्यंत वापरावे. रासायनिक खतांऐवजी नाडेप व व्हर्मी कंपोस्ट खतांचा वापर करण्यास अधिक भर देण्यात यावा. लाभार्थ्यांना आवश्यक वाटल्यास स्व:खर्चाने रासायनिक खतांचा वापर करण्यास मुभा राहील.
केंद्र शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या मजूरी दरानुसार अंदाजपत्रके (सामुग्री वगळून) सुधारित करण्याचे निदेश यापूर्वीच संदर्भाधीन दिनांक ३० मार्च, २०२२ च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार आयुक्त (कृषी) यांनी दरवर्षी सुधारित मजुरी दरानुसार अकुशल (सामुग्री वगळून) आर्थिक मापदंड सुधारित करुन क्षेत्रीय स्तरावर कळवावेत व शासनास त्याबाबत अवगत करावे. यासाठी ज्या कालावधीपासून मजूरी दर लागू केला असेल तोच कालावधी विचारात घेण्यात यावा.
याचबरोबर राज्य शासनाचे परवानगी शिवाय कोणत्याही परिस्थितीत सामुग्रीच्या दरात वाढ करण्यात येऊ नये, आहे निर्देश या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
Dragon fruit estimate 2023 नवीन अंदाज पत्रक येथे Dragon fruit estimate 2023
download PDF link Dragon fruit estimate 2023
Dragon fruit estimate 2023