मनरेगा च्या ऑनलाईन हजेरी ( NMMS) साठी नवा GR, मजूर मित्र लावणार हजेरी, अशी होणार mgnrega met bharti निवड प्रक्रिया
mgnrega met bharti 2023 Maharashtra
कामाच्या ठिकाणी २० ते ४० मजूर उपस्थिती असल्यास देखरेख करण्यासाठी प्रत्येक २० कामगारांच्या मागे (१) एक व ४१ ते ८० पर्यंत उपस्थिती असल्यास त्यापुढील प्रत्येक १० मजूरामागे एक या पटीने अतिरिक्त मजूरमित्र (मेट) यांची निवड करण्यात यावी, असे संदर्भ क्र. २ व ३ तसेच, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना वर्ष २०२१-२२ अन्वये निर्देशित करण्यात आले आहे.
mgnrega met bharti GR PDF 👉 CLICK HERE
https://youtube.com/live/vxQqZhLADkY?feature=share
महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक कामावरील मजूरांची हजेरी NMMS वरच नोंदवायची आहे. महाराष्ट्र राज्यात मजूर मित्र (मेट) व्दारे NMMS अॅपचा वापर करुन हजेरी नोंदविण्याचा प्रथम प्रयोग आहे. सुरुवातीला मजूर मित्र (मेट) यांना सध्या अकुशल मजुरीच्या दराप्रमाणे मजुरी अदा करुन NMMS ची १००% अमंलबजावणी करणे शक्य होईल.
मजूर मित्राच्या ( मेट ) कामाचे स्वरुप:-
मजूरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती देणे व त्यांना कामावर येण्यास प्रोत्साहित करणे.
ग्रामपंचायतीतील सार्वजनिक कामांवरील मजूरांची हजेरी NMMS व्दारे नोंदविणे.
मजूरांना पूर्ण मजूरी मिळण्यासाठी त्यांनी दिवसभरात करावयाच्या अपेक्षित कामाचे चिन्हांकन (MARK OUT) करणे, कामावरील मोजमापे घेण्यासाठी तांत्रिक सहाय्यक यांना मदत करणे, जॉबकार्डवरील माहिती वेळोवेळी अद्यावत करण्यासाठी ग्रामसेवक / ग्रामरोजगार सेवकांना मदत करणे इत्यादी कामे.
मजूरांकडून पुढील कामांसाठी मागणी पत्रक ग्रामसेवक /ग्रामरोजगार सेवकाला अवगत करणे. घेणे ५) मजूरांना पुढील आठवड्यातील नियोजित कामाबाबत माहिती देणे. व त्याबाबत
जास्तीत जास्त मनुष्य दिन निर्मिती करण्यासाठी मजूर व कार्यान्वयीन यंत्रणा यांच्यामधील समन्वयक म्हणून कामकाज करणे.
Majur mitra MET निवडीसाठीची पात्रता :-
मेट हा सक्रिय मजूर (Active Workers) असणे आवश्यक राहील.
मजूर मित्र (मेट) यांच्या निवड प्रक्रियेमध्ये स्वयंसहायता बचत गट मधील महिला सदस्य यांचा प्राधान्याने समावेश करावा. कोणत्याही परिस्थितीत किमान ५० टक्के महिला असणे आवश्यक राहील.
Majur mitra (मेट) हा ग्राम पंचायतीचे सरपंच / ग्रामरोजगार सेवक यांचा जवळचा नातेवाईक नसावा.
मेटला लिहिता व वाचता येण्यासोबतच बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या प्राथमिक गणितीय बाबींचे ज्ञान असावे.
निवड प्रक्रिया:-
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना वर्ष २०२१-२२ व पत्रान्वये, जर एका कामाच्या ठिकाणी २० ते ४० मजूर उपस्थिती असल्यास देखरेख करण्यासाठी प्रत्येक २० कामगारांच्या मागे एक व ४१ ते ८० पर्यंत मजूर उपस्थिती असल्यास ४० च्यापुढील प्रत्येक १० मजूरा मागे एक या पटीने अतिरिक्त मजूरमित्र (मेट) यांची निवड करण्यात यावी.
वरील सूचनाची अंमलबजावणी करत असतांना ग्रामपंचायतीत एक सुद्धा सार्वजनिक कामावरील मजूरांची संख्या २० पेक्षा अधिक नसल्यास व ग्रामपंचायतीत सर्व सार्वजनिक कामे मिळून मजूरांची संख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अश्या गावात सुद्धा मजूर मित्र (मेट) ची नियुक्ती करता येईल.
सदर मजूर मित्र (मेट) ज्या कामावरील सर्वात जास्त मजूर उपस्थिती असेल त्या कामावरील मस्टर वर नोंदवला जाईल. मात्र त्याचे काम त्या गावातील सर्व सार्वजनिक कामाची हजेरी NMMS व्दारे नोंदविण्याचे असेल. सर्व सार्वजनिक कामे मिळून ४० पेक्षा अधिक मजूर उपस्थिती असल्यास क (१) च्या सूत्रानुसार अधिक मजूर मित्र (मेट) नेमता येईल.
मजूर मित्र (मेट) ची मजूरी:-
मजूर मित्र (मेट) याची नोंद अकुशल मजूर म्हणून हजेरीपत्र निर्गमित करावे.
इतर बाबी:-
पात्र मजूर मित्र ( मेट) यांना नरेगा सॉफ्ट वर (P.O.) लॉगिन मध्ये नोंदणी करावी व नोंदणी झालेल्या मजूर मित्र (मेट) यांना ग्रामरोजगार सेवक व संबंधित तालुक्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी तात्काळ NMMS बाबत प्रशिक्षण देऊन काम सुरु करावे.
सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेवर सोपविण्यात येत आहे. त्यांनी वरील सूचनांची अंमलबजावणी १५ दिवसात करुन त्याचा अहवाल शासनास सादर करणे आवश्यक राहील.