Mukhyamantri fellowship 2023 ऑनलाईन अर्ज सुरू,

राज्यात Mukhyamantri fellowship 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरू, पहा काय आहेत अटी शर्ती, पात्रता व लाभ सविस्तर

Mukhyamantri fellowship 2023

Mukhyamantri fellowship 2023

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात.

२०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो.

Mukhyamantri fellowship 2023 पात्रता

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२३ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत

उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे जीचा वाढदिवस ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येतो अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल

उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.

मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

मुख्यमंत्री फेलोशीप योजनेचे स्वरूप

फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.

निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.

प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.

नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.

फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.

फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

Mukhyamantri fellowship 2023 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाईल. निवड प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

टप्पा १

भाग १ : ऑनलाईन परीक्षा
भाग २ : सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा २ साठी २१० उमेदवार शॉर्टलीस्ट करणे

टप्पा २

भाग १ : शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग २ : मुलाखत (शॉर्टलीस्ट केलेल्या व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू)
भाग ३ : अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे

ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप :

बहुविविध पर्याय असलेले वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न

माध्यम

परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जेथे व्यवहार्य असेल तेथे प्रश्न व पर्यायी उत्तराचे मराठीत भाषांतर पुरविले जाईल

एकूण गुण : १००. प्रत्येक प्रश्नास १ गुण
कालावधी : ६० मिनिटे

ऑनलाईन परीक्षेतील विषय : :

अनु. क्रविषयप्रश्नांची संख्यातपशील
सामान्य ज्ञान५०महाराष्ट्र व भारतासंबंधी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, सामाजिक व अर्थशास्त्र यावर प्रश्न
तर्कशास्त्र१०तार्किक क्षमता
इंग्रजी भाषा१०वाक्य तयार करण्याची क्षमता, व्याकरण
मराठी भाषाव्याकरण व रचना
माहिती तंत्रज्ञान१०विंडोज ७, एमएस ऑफिस २०१०, इंटरनेट
क्वान्टिटेटीव्ह ॲप्टीट्युड १५डेटा चा अर्थ लावणे, अंकगणित, बीजगणित, मुलभूत भूमिती

टप्पा २ साठी उमेदवार शॉर्टलीस्ट करणे

एकूण गुण १०० पैकी राहतील
सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल
शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार ३ निबंध लिखित स्वरुपात सादर करतील. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतात
निबंधाचे विषय उमेदवारांना इमेल व संकेतस्थळाद्वारे कळविले जातील
सर्व ३ निबंध सादर करणाऱ्या शॉर्टलीस्ट केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. सर्व ३ निबंध अपलोड न करणारे शॉर्टलीस्ट झालेले उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत

अंतिम निवड

उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल.

ऑनलाईन चाचणीचे १०० पैकी गुण १५ पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन+ निबंध ३० गुण+ मुलाखत ५० गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी ५ गुण
निवड झालेल्या ६० उमेदवारांची यादी व १५ उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल
निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील

Mukhyamantri fellowship 2023 मानधन व लाभ

फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.

फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.

दरमहा रु. ७०,०००/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. ५,०००/- असे एकूण रु. ७५,०००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण ८ दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.

फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.

आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.

१२ महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

Mukhyamantri fellowship 2023 उमेदवार करिता अटी व शर्ती

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.

या १२ महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.

१२ महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.

ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील. फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.

फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.

फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.

फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.

नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.

For Online Application Website link

MAHADES MAHARASHTRA

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: