नुकसान भरपाई वाटपासाठी महसूल सप्ताह | mahsul sapta 2023

Mahsul sapta 2023 – शेतकरी नुकसान भरपाई सह, विद्यार्थी दाखले, प्रलंबित महसूल प्रकरण निकाली काढण्यासाठी राज्यात महसूल सप्ताह आयोजित

mahsul sapta

Mahsul sapta 2023 GR

राज्यात महसूल विभागाने जिल्हा स्तरीय महसूली कामे वेळच्यावेळी पुर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे कामे वेळच्यावेळी वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी/ इ. व कर्मचा-यांचा आणि महसूली वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरीता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षी दिनांक १ ऑगस्ट हा “महसूल दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच, महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उत्कृष्ट काम करणा-या व नवनविन संकल्पना राबविणा-या जिल्हाधिका-यांचा दरवर्षी राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव सन्मान करण्यात येतो.

विभागनिहाय उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव – सन्मान करण्यात येतो.

महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी, १ ऑगस्ट महसूल दिनापासून “महसूल सप्ताह (Mahsul sapta 2023 ) साजरा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

महसूल विभागाने जिल्हा स्तरीय महसूली कामे वेळच्यावेळी पुर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी/कर्मचा-यांचा आणि महसूली वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरीता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता यावर्षी महसूल दिनापासून दिनांक १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान राज्यभरात “महसूल सप्ताह – Mahsul sapta 2023 साजरा करण्यात येणार आहे.

महसूल सप्ताहामध्ये, प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी पुढील प्रमाणे विशेष मोहिम / कार्यक्रम / उपक्रम / शिबीरे / महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येत आहे.

दिनांक १ ऑगस्ट पासून “महसूल सप्ताह” Mahsul sapta 2023 आयोजनाच्या अनुषंगाने किमान ४ ते ५ दिवस आधीपासून या कार्यक्रमांची रुपरेखा, कार्यक्रमांचे स्वरुप, वेळापत्रक या योजना नागरिकांस जनतेस कश्याप्रकारे लाभदायक ठरणार आहेत, हे अधोरेखित करुन प्रसिध्दीपत्रक तयार करुन त्याचे वितरण करण्यात येईल.

GR Link महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट महसूल दिन पासून महसूल सप्ताह साजरा करणेबाबत.

महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”

दिनांक २६ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ या कालावधी राबविण्यात आलेल्या “महाराजस्व अभियान” अंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव- सन्मान करण्यात येणार आहे.

दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ पासून, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ खालील कोणतीही प्रकरणे ऑफलाईन माध्यमातुन न स्विकारता नागरिकांकडून दाखल अशी सर्व प्रकरणे ई हक्क पोर्टलवर ( तलाठयामार्फत) सेतु सुविधा केंद्रामार्फत नोंदवून त्यानंतर तहसिलदारांकडे पाठविण्यात यावीत. त्याचप्रमाणे, नागरी भागातील मालमत्तापत्रकांसाठी देखील ई-हक्क पोर्टलवर नगर भूमापन अधिकारी यांच्यामार्फत नोंदविण्यात येतील.

तहसिलदार व नगर भूमापन अधिकारी अशा प्रकरणांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ खाली दुरुस्तीचे आदेश पारित करतील. या दुरुस्तीचे आदेश पारित करताना अहवाल- १ मध्ये असणारे ७/१२ बाबत तहसिलदारांनी विशेष काळजी घेऊन ७/१२ वरील सर्व खातेदारांच्या क्षेत्राची एकुण बेरीज ही ७/१२ वरील एकुण क्षेत्रासोबत जुळेल, याची दक्षता घेऊनच कलम १५५ खालील प्रकरणांबाबत निर्णय घेण्यात येतील.

महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी / दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे, अशा स्मशानभूमी व दफनभूमींची मोजणी करुन गाव नकाशावर व अधिकार अभिलेखात त्यांची नोंद घ्यावी. तसेच, या कामांकरीता विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन आवश्यकतेनुसार प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येतील.

२ ऑगस्ट “युवा संवाद”

दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्दयार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वय, वर्ष व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले/ प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्जदारांनी दाखल केलेले व प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढून संबंधित अर्जदारांना सदर दाखले/ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात यावे.

तसेच, जिल्हयातील माध्यमिक शाळा / महाविद्यालय इ. मध्ये इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी व १२ वी नंतर वैद्यकीय/अभियांत्रिकी/औषध निर्माण शास्त्र व इतर विविध क्षेत्रातील संस्थेमध्ये प्रवेशासाठी लागणा-या प्रमाणपत्र / दाखल्यांबाबतची माहिती व सदर प्रमाणपत्र / दाखले काढण्याकरीता आवश्यक असलेली कागदपत्रांचे “माहितीपत्रक” प्रसिध्द करुन त्यांचे सर्व शाळा/महाविद्यालयांमध्ये वितरण करण्याची व्यवस्था करावी.

या कार्यक्रमाच्या आयोजनापुर्वी आयोजनादरम्यान व आयोजनपश्चात प्रसिद्धीसाठी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे. महसूल सप्ताहामधील कार्यक्रम अधिकाधिक आकर्षक आणि नाविन्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने, सर्व संबंधित अधिका-यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या-त्या भागातील गरजा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी विचारात घेऊन त्याप्रमाणे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी.

महसूल विभाग, जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे आणि नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे या विभागांमार्फत राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांची माहिती विशद करणा-या लघु चित्रफिती (Small Videos) तयार करुन विविध प्रसारमाध्यमाव्दारे सदर माहिती जनतेपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने उचित कार्यवाही करावी.

राज्यातील विविध घटकांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणा-या विविध शिष्यवृत्ती, त्यांच्यासाठी राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व योजनांबाबतची माहितीपत्रके देखील शाळा / महाविद्यालयांमध्ये वितरीत करण्यात यावीत. ई) तसेच, शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे / अद्ययावत करणे याकरीता शाळानिहाय वेळापत्रक तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना विशेष सुचना देण्यात याव्यात.

अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय/निमशासकीय / शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्यात यावी. तसेच, या अनाथ मुलांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभाग व महसूल विभागाशी करार केलेल्या “तर्पण फांऊडेशन” या सामाजिक संस्थेची मदत घेण्यात यावी.

३ ऑगस्ट – एक हात मदतीचा”

पुर्व मान्सुन व मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस / अतिवृष्टी/पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे / शेतीचे / फळबागांचे / जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार, बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोई सुविधा, नुकसान भरपाई देण्यात आली आहे किंवा कसे, याबाबत सर्व कार्यालयीन आढावा घेऊन पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

तसेच, खरिप हंगामामध्ये घेण्यात येणा-या पिकांचे विमा उतरविण्याकरीता, अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व ८-अ असे तलाठी स्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात आलेले आहेत किंवा कसे, याबाबतचा आढावा घेऊन प्रलंबित असलेले दाखले संबंधितांना तात्काळ प्रदान करण्यात यावेत.

आवश्यकतेनुसार अतिवृष्टी/पूर अशा नैसगिक आपत्तीच्या परिस्थितीत संबंधित यंत्रणा / नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबतच्या सुचना प्रसारमाध्यमाव्दारे / समाजमाध्यमाव्दारे संबंधित क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांच्या मार्फत सर्व संबंधित घटकापर्यत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात यावी.

नैसगिक आपत्ती अंतर्गत पुनर्वसनाच्या अनुषंगाने महसूल कार्यालयांशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात यावे. तालुक्यातील अतिदुर्गम गावात “महसूल अदालत” आयोजित करण्याबाबत कार्यवाही करावी.

४ ऑगस्ट ” जनसंवाद”

महसूल अदालतींचे आयोजन करुन जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार स्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे/अपिले निकाली काढण्यात यावीत.

सलोखा योजना, गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी / मंडल अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरीता तलाठी कार्यालयांमार्फत शिबीरांचे आयोजन करण्यात यावे.

जमिनीविषयक आवश्यक असणा-या नोंदी अद्यावत करण्याबाबत प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्याबाबत सर्व संबंधित तलाठी / मंडल अधिकारी यांना सुचना देण्यात याव्यात.

“आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

५ ऑगस्ट ” सैनिक हो तुमच्यासाठी”

राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुंटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले/ प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात यावी.

संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना घरासाठी / शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत.

६ ऑगस्ट रोजी महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात यावेत. “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद”

७ ऑगस्ट “महसूल सप्ताह सांगता समारंभ”

महसूल यंत्रणेमार्फत उपरोक्त कालावधीत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात यावा.

महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करुन नागरिकांना याचा अधिकाधिक लाभ घेण्याच्या अनुषंगाने महसूल सप्ताहामध्ये प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: