महिलांच्या विकासासाठी, महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना | Mahila vikas yojana

महिलांच्या आर्थिक विकासासाठी, शासनाची नवी योजना महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना  Mahila vikas yojana 2022

Mahila vikas yojana

महिला बचत गट कर्ज योजना 2022 (Mahila vikas yojana )

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांकरिता महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ( महिला विकास योजना 2022 ) राबविण्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Swaymsidhi karj partava bachat gat yojana GR

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्याबाबत.

योजनेचे स्वरूप आणि कार्यपद्धती

राज्यातील महिला बचत गटातील ( Mahila bachat gat ) इतर मागास प्रवर्गातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगाकरिता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या ₹ ५ ते ₹१० लक्षा पर्यंतच्या कर्ज रकमेवरील १२% व्याजाच्या मर्यादित व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ( OBC mahamandal ) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र MRCM च्या साह्याने राबविण्यात येईल.

या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटातील इतर मागासवर्ग प्रवर्ग महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ हा ओबीसी महामंडळाकडून घेता येईल तसेच सदर बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळा कडून तसेच इतर शासकीय विभागाच्या महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत.

इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटात प्रथम टप्प्यात ₹ 5 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येईल प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेड केल्यानंतर सदर बचत गट टप्प्यात रु १० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र होईल.

बँकेकडून मंजूर असलेल्या कर्ज रकमेवरील कमाल 12% व्याजाच्या मर्यादित व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल ओबीसी महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजुरीनंतर पाच वर्षापर्यंतच्या कालावधीकरिता बँक प्रमाणीकरण अनुसार करण्यात येईल.

अटी पात्रता Scheme

अर्जदाराच्या पात्रतेच्या अटी व शर्ती मध्ये महिला बचत गटातील ( Mahila bachat gat ) महिला इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ( OBC category )असावी.

अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, पात्र महिलाचे किमान वय 18 आणि कमाल वय 60 वर्षे असावे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटात किमान 50 % इतर मागास प्रवर्गातील ( OBC )महिला असतील असा बचत गट महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजनेसाठी पात्र राहतील.

सादर करावयाची कागदपत्रे व पुरावे Documents For avail scheme benefits

अर्जदारास सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला ( OBC cast certificate )

अर्जदाराच्या वयाचा पुरावा. ( Age Proof ) ( जन्मतारखेचा पुरावा ( Birth certificate ), शाळा सोडल्याचा दाखला School leaving certificate

रहिवासी दाखला ( आधार कार्ड ( Aadhar card ), ३ महिन्यातील लाईट बिल ( electricity bill ) फोन बिल ची झेरॉक्स प्रॉपर्टी कार्ड ( Property card ) पासपोर्ट

बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स

बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पादनाबाबत प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्र

अर्जदार महिलेने कोणत्याही वित्तीय संस्थेचा अथवा शासनाच्या योजनेचा किंवा महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास पूर्वीच्या कर्ज रकमेची संपूर्ण परतफेड केल्या बाबतचे प्रमाणपत्र /स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र लाभार्थ्यांनी सादर करणे आवश्यक राहील.

अंमलबजावणी कार्यपद्धती

महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.

CMRC मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर विहित पद्धतीने तपासणी करून सदर प्रस्ताव ओबीसी महामंडळाच्या ( OBC mahamandal ) जिल्हा कार्यालयामार्फत ओबीसी महामंडळाच्या मुख्यालयाकडे पात्रता प्रमाणपत्र ( LOI) निर्गमित करून कार्यवाही करिता सादर करण्यात येईल.

ओबीसी महामंडळाच्या मुख्यलयामार्फत संबंधित प्रस्तावात LOC पात्रता प्रमाणपत्र निर्गमित त्याची प्रत पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात येईल.

ओबीसी महामंडळाकडून निर्गमित केलेल्या पात्रता प्रमाणपत्राची वैधता एक वर्ष राहील. ( Validity of LOI is One Year )

LOl द्वारे बँकेने मंजूर केलेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटास त्यांच्या भरणे केलेल्या १२% व्याज परताव्याची मागणी बँकेच्या प्रमानीकरणानुसार ( Bank verification ) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित महामंडळाच्या पोर्टलवर करण्यात यावी.

बचत गटास बँकेने मंजूर केलेल्या व्यवसायाचे फोटो वर्षातून किमान एक वेळा तसेच कर्ज परतफेडीच्या एकूण कालावधीमध्ये किमान तीन वेळा व्याज परतावा मागणी करताना हा फोटो वेब पोर्टल वर अपलोड करणे बंधनकारक राहील.

महिला बचत गट कर्ज योजना 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: